Thursday 28 June 2018

पाटण बसस्थानकाच्या नुतनीकरणाच्या कामाचे परिवहन मंत्री यांचे हस्ते दि.30 जुन रोजी भूमिपुजन. आमदार शंभूराज देसाई


दौलतनगर दि. २8:  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पाटण या तालुक्याच्या ठिकाणचे बसस्थानकाच्या इमारतीचे व बसस्थानकाच्या परिसराचे नुतनीकरण करणेकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर करणेबाबत राज्याचे परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते यांचेकडे मागणी केलेप्रमाणे त्यांनी राज्य परिवहन महामंडळाकडून आवश्यक असणारा सुमारे ७ कोटी रुपयांच्या निधीस तत्वत: मान्यता दिली असून या कामाचा भूमिपुजन समारंभ परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते यांचे हस्ते शनिवार दि.30 जुन,2018 रोजी सकाळी 10.00 वा पाटण बसस्थानक परिसरात आयोजीत केला असल्याची माहिती या कामाकरीता भरघोस निधीस मान्यता आणणारे पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकात म्हंटले आहे की,पाटण हे तालुक्याचे ठिकाण असून तालुक्याच्या ठिकाणच्या बसस्थानकाच्या इमारतीची तसेच बसस्थानक परिसराची मोठया प्रमाणात दुरावस्था झाल्याने पाटण बसस्थानकाच्या इमारतीचे व बसस्थानकाच्या परिसराचे नुतनीकरण करणेकरीता आवश्यक असणारा निधी राज्य परिवहन महामंडळाकडून मंजुर करावा अशी मागणी सन 2014 ला पाटण मतदारसंघाचा आमदार झालेनंतर मी राज्याचे परिवहन मंत्री व राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष ना.दिवाकर रावते यांचेकडे केली होती.परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते यांनी सन 2015-16 मध्ये राज्य परिवहन महामंडळाकडून या कामाकरीता आवश्यक असणा-या सुमारे 7 कोटी रुपयांच्या निधीस तत्वत: मान्यता दिली आहे.पहिल्या टप्प्यात बसस्थानकाचे आधुनिकीकरण करणे व दर्जावाढ करणेच्या कामांस मागील वर्षी 1 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता.मात्र बसस्थानकाच्या परिसराची दुरावस्था पहाता बसस्थानकाच्या इमारतीचे व बसस्थानकाच्या परिसराचे नुतनीकरण करणे ही सर्वच कामे एकत्रित करणेकरीता आवश्यक असणारा सुमारे ७ कोटी रुपयांच्या निधीस एकाच टप्प्यात मान्यता देवून या कामांस लवकरात लवकर सुरुवात व्हावी असा आग्रह मंत्री ना.दिवाकर रावते यांचेकडे करुन पाटण बसस्थानकाची सध्याची परिस्थिती परिवहनमंत्री यांचे निदर्शनास आणून दिलेनंतर त्यांनी एकाच टप्प्यात पाटण बसस्थानकाच्या प्रस्तावित व मागणी असणा-या सर्व कामांच्याकरीता आवश्यक असणारा सुमारे ७ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली असून पाटण बसस्थानकाच्या इमारतीचे व बसस्थानकाच्या परिसराचे नुतनीकरण ही सर्व कामे एकाच टप्प्यात हाती घेण्यात येणार असून नुतनीकरण करणेच्या कामांमध्ये मान्यता देण्यात आलेल्या ७ कोटी रुपयांच्या निधीमधून बसस्थानक इमारतीमध्ये वाढ करुन सहा फलाटांची संख्या वाढविणे,इमारतीचे पाणी पुरवठा व इतर पाईप लाईन नुतनीकरण करणे,जादा पाणीसाठा होणेसाठी अंडरग्राऊंड वॉटर टँन्क बांधणे,बससस्थानकाच्या संपुर्ण वाहनतळाचे एकूण क्षेत्र असणा-या 6000 चौ.मीटर  क्षेत्राचे काँक्रीटीकरण करणे,बसस्थानकाच्या सर्व बाजूंनी संरक्षक भिंतींची उभारणी करणे,वाहनतळाचे क्षेत्रफळ सोडून उर्वरित क्षेत्रफळाचे कठिणीकरण करणे,भुयारी आर.सी.सी.गटरचे बांधकाम करणे,स्वच्छतागृहासाठी नवीन सेप्टीक टॅन्क बांधणे,बसस्थानकामध्ये कमान उभारुन इन-आऊट गेट बांधणे व बसस्थानकाचे इमारतीस संपुर्ण विद्युत संच नव्याने बसविणे या कामांचा समावेश करण्यात आला आहे.परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते यांचे शुभहस्ते शनिवार दि.30 जुन,2018 रोजी या कामांचे भूमिपुजन झालेनंतर तात्काळ या नुतनीकरणाच्या कामांना सुरुवात करण्याच्या सुचना संबधितांना करण्यात आल्या असून पाटण बसस्थानकाचे नुतनीकरणाच्या कामांमुळे पाटण बसस्थानकाचे रुपडेच पालटणार असून प्रवाशांची होणारी गैरसोय यामुळे दुर होणार असल्याचा विश्वास आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केला असून या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या समारंभाचे आयोजक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सातारा विभागाचे विभाग नियंत्रक यांचेवतीने करण्यात आले आहे.

Friday 15 June 2018

आमदार शंभूराज देसाईंचे प्रयत्नातून महिंद ल.पा.तलावाला सुधारित प्रशासकीय मान्यता. सुधारित प्रशासकीय मान्यता 11 कोटी 55 लक्ष रुपयांची.


                            

दौलतनगर दि. 15:  पाटण तालुक्यातील महिंद लघु पाटबंधारे योजनेच्या कामांस तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे विशेष प्रयत्नामुळे राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून सुमारे ११ कोटी ५५ लक्ष ३७ हजार इतक्या किंमतीस जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दि. 13 जून 2018 रोजीचे शासन निर्णयानुसार ही सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये अंदाजीत किमतींचा गोषवारा दिला असून भूसंपादनाबरोबर या प्रकल्पातील पुनर्वसित गावठाणांतील नागरी सुविधांबरोबर काही महत्वाची कामे हाती घेण्यात येणार असून  या ल.पा तलावाच्या दुरुस्तीच्या कामांकरीता शासनाने ७६.४१ लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला असून दुरुस्तीचे काम सुरु असल्याचीही माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकाव्दारे  दिली आहे.
आमदार शंभूराज देसाई यांनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील महिंद लघु पाटबंधारे योजनेकरीता राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने 03 कोटी 54 लक्ष 52 हजार इतक्या किंमतीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती.सदर प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव सन 1995-1996 च्या दरसुचीवर आधारित होता.प्रकल्पाचे काम सुरु असताना दरसुचीतील वाढ,भूसंपादन किंमतीतील वाढ,संकल्पचित्र बदामुळे वाढ,अपुरी तरतूद,इतर कारणांमुळे व अनुषंगिक खर्चातील वाढीमुळे सन 2009- 2010 ची दरसुची वापरुन सुधारित अंदाजपत्रक तयार करुन रुपये 11 कोटी 55 लाख 37 हजार इतक्या किंमतीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सातारा पाटबंधारे विभागामार्फत सादर करण्यात आला होता. सादर केलेल्या या प्रस्तावास व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात यावी याकरीता राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांचेकडे माझा सातत्याचा पाठपुरावा सुरु होता. दि. 15 फेब्रुवारी, 2018 रोजी शासन स्तरावर व्यय अग्रक्रम समितीची बैठक पार पडली या बैठकीत महिंद लघु पाटबंधारे योजनेच्या सदरच्या व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मांडण्यात आला यावेळी या प्रस्ताव मांडण्यात येवून या योजनेस व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या योजनेस व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता  देण्यात आली असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने दि. 13 जून 2018 रोजी पारित केला आहे. महिंद लघू पाटबंधारे तलावास देण्यात आलेल्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये अंदाजीत किमतींचा गोषवारा दिला असून भूसंपादनाबरोबर या प्रकल्पातील पुनर्वसित गावठाणांतील नागरी सुविधांबरोबर काही महत्वाची कामे हाती घेण्यात येणार यामध्ये प्राथमिक कामे, भू संपादन (जमिन), कामे धरण,सांडवा व चॅनेल,इमारती,विमोचक,कोल्हापूर पध्दतीचे बंधारे,संकीर्ण,वृक्षारोपन,देखभाल,दळणवळण या कामांचा समावेश असून कामांसाठी रु.1090.13 लक्ष व अनुषंगिक खर्चासाठी 65.24 लक्ष अशी विगतवारी करण्यात आली असून अनुषंगिक खर्चामधून या तलावामुळे पुर्नवसित झालेल्या मौजे चौगुलवाडी येथील पुर्नवसित गावठाणांतील नागरी सुविधांची कामे करण्यात येणार आहेत. योजनेची सिंचन क्षमता ही 304 हेक्टर असून सिंचन क्षेत्रामध्ये एकूण पाच गावांचा समावेश आहे. तलावाची पाणी साठवण क्षमता ही 2404 स.घ.मी इतकी असून सिंचन क्षेत्रामधील सळवे महिंद,बाचोली बनपुरी व सणबूर या पाच गांवामध्ये अनुक्रमे 21 हे.आर., 39 हे.आर., 70 हे.आर., 139 हे.आर. व ३५ हे.आर. क्षेत्र सिंचनाखाली येत असल्याचे म्हंटले असून व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेल्या या कामांना मंजुर करण्यात आलेला निधी लवकरच सुपुर्द करण्यात येणार असल्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी म्हंटले आहे. दरम्यान सदरची व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणेकरीता सातारा पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता विजयराव घोगरे यांचा माझेकडे सातत्याचा पाठपुरावा सुर होता असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात शेवठी म्हंटले आहे.


Thursday 7 June 2018

आपत्ती काळात व्यवस्थापनेकरीता तालुका प्रशासनाने अगोदरच जागृत रहावे. हलगर्जीपणा करु नये. - आमदार शंभूराज देसाईंच्या तालुका प्रशासनाला सुचना.




दौलतनगर दि. 07:  सातारा जिल्हयात सर्वात जास्त महाबळेश्वरबरोबर पाटण तालुक्याला प्रतिवर्षी आपत्तीचा सामना करावा लागतो.आपले तालुका प्रशासनाला तालुक्यातील आपत्ती परिस्थितीची कल्पना आहे.आपत्ती आलेनंतर तातडीने करावयाच्या उपाययोजना करणेकरीता आपण प्रतिवर्षी आपत्ती व्यवस्थापन व नियोजनाची बैठक घेत असतो.आपत्तीच्या काळात तालुका प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा करु नये,जागृत रहावे अशा सुचना आमदार शंभूराज देसाई यांनी तालुका प्रशासनाला दिल्या.
        आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालयाच्या प्रतिक्षालय इमारतीत लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहात आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात तालुका प्रशासनाची बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी पाटणचे महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,उपविभागीय पोलीस अधिकारी निता पाडवी,पाटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजीव गायकवाड,कोयना धरण व्यवस्थापनाचे अभियंता मोरे,सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश अहिरे,वसंत खाडे,जिल्हा बांधकाम विभागाचे उपअभियंता श्रीकांत माने,पाटणचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे,उंब्रज पोलीस निरीक्षक गुजंवटे,तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे, गटशिक्षणाधिकारी निकम,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक साळुंखे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शुक्ल तसेच तालुकास्तरीय सर्व विभागांचे विभागप्रमुख यांची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.
    याप्रसंगी प्रारंभी आमदार शंभूराज देसाईंनी कोयना धरण व्यवस्थापनाच्या अधिका-यांकडून मान्सुन काळात पडणा-या पावसामुळे कोयना धरणात होणा-या पाणीसाठयासंदर्भात व पुर्ण क्षमतेने पाणीसाठा झालेनंतर पाणी विर्सगासंदर्भातील सविस्तर माहिती घेवून धरणातील जलसाठयाच्या निर्णयात आम्हाला कोणाला हस्तक्षेप करावयाचा नाही परंतू कोयना धरण व्यवस्थापनाने योग्य नियोजन करावे असे सांगत उपविभागीय अधिकारी,तहसिलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे नियंत्रणाखाली तहसिल कार्यालय याठिकाणी २४ तास आपतकालीन व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे.आपत्ती काळात तालुक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी काही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ या कक्षामध्ये माहिती देण्याचे काम अधिकारी यांनी करावयाचे असून यावर तात्काळ तोडगा काढून आपतकालीन परिस्थिती दुर करावयाची आहे.आपले विभागाकडील अधिकारी,कर्मचारी यांची नेमणूक आपआपल्या कार्यालयामध्ये संबधित अधिकारी वर्गाने करावयाची असून संबधित अधिकारी व कर्मचारी यांचे दुरध्वनी क्रमांक तहसिलदार यांचेकडे देवून आपण काय काय व्यवस्था केली आहे याची माहिती सादर करावयाची आहे.आपतकालीन व्यवस्थापन कक्षामध्ये एक जबाबदार अधिकारी आणि कर्मचा-याची नेमणूक करण्यात यावी असे सांगून त्यांनी तहसिलदार यांनी मंडलाधिकारी,तलाठी यांचेमार्फत कोयना नदीकाठच्या गावांना या काळात सतर्क राहण्याच्या सुचना कराव्यात तसेच गटविकास अधिकारी यांनी ग्रामविस्तार अधिकारी,ग्रामसेवक यांना त्या त्या विभागातील वैद्यकीय अधिकारी यांच्या संपर्कात राहून मान्सुन काळात साथीचे रोग पसरणार नाहीत याकरीताच्या उपाययोजना कराव्यात,पावसाळयामध्ये ग्रामीण आणि डोंगरी भागामध्ये साथीच्या रोगाबरोबर सर्पदंशाचे प्रमाण मोठया प्रमाणात पहावयास मिळत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र,ग्रामीण रुग्णालय याठिकाणी यावरचा औषधसाठा आताच करुन ठेवावा.प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी डोंगरी भागात याकाळात आरोग्य शिबीराचे नियोजन करावे असे सांगत आमदार शंभूराज देसाई यांनी वीज वितरण विभागाचा आढावा घेतला. हा आढावा घेताना या विभागाने प्रामुख्याने दक्ष आणि जागृत रहावे अशा सुचना त्यांनी दिल्या ते म्हणाले,पाऊस येणार असे वातावरण होण्याअगोदरच वीज वितरण विभागाचे अधिकारी काम लागेल म्हणून वीज बंद करीत आहेत या अगोदर उभ्या पावसात कधी वीज गेली नव्हती जिथे खरोखर अडचण जाणवत आहे त्याठिकाणी वीज बंद करण्यास हरकत नाही परंतू पाऊस पडायच्या आतच वीज बंद करणे चुकीचे आहे यासंदर्भात अनेक ठिकाणच्या तक्रारीदेखील आल्या आहेत त्यात वीज विभागाच्या अधिका-यांनी सुधारणा करावी. असे सांगून ते म्हणाले सध्या कराड चिपळुण या राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्याचे काम सुरु आहे अनेक ठिकाणी रस्त्यावरील मोठमोठया पुलांची कामे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून याकरीता रस्त्याचा मार्ग वळविण्यात आला आहे. त्याठिकाणी दक्षता म्हणून दक्षता फलक लावण्याचे काम करण्याच्या तसेच या मार्गावर पावसाळयात पश्चिमेच्या बाजूस झाडे पडण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात त्यामुळे पडणारी झाडे तात्काळ दुर करुन वाहतूक सुरळीत राहणेकरीता या विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी यंत्रणा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना देणारा पत्रव्यवहार तात्काळ करावा असेही आमदार शंभूराज देसाई यांनी सांगून आपत्ती काळात तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी यांनी योग्य ते नियोजन करावे विनाकारण कारवाई करण्याची वेळ कुणी आणू नये असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
चौकट:- पाटण शहरातील स्वच्छता पहिल्यांदा करुन घ्या.
  पाटण हे तालुक्याचे ठिकाण आहे. पाटणमध्ये ठिकठिकाणी कच-यांचे ढिग असून या ढिगांमुळे दुर्गंधी, दुर्गंधीमुळे साथीचे रोग पसरत असून पाटणच्या अस्वच्छतेच्या संदर्भात वृत्तपत्रात रोज रखाणेच्या रखाणे भरुन येत आहेत.पाटण नगरपंचायत  झाली आहे. शासनाच्या नगरोत्थानमधून भरघोस निधी येत आहे. त्यातुन ही स्वच्छता पहिल्यांदा करुन घ्या. नगरपंचायतीकडे दोनच घंटागाडया असतील तर अजुन मागवून घ्या आमची काय मदत लागली तरीही सांगा असेही आमदार शंभूराज देसाई म्हणाले.


Monday 4 June 2018

कराडचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राज्यातील मॉडेल कार्यालय. - आमदार शंभूराज देसाईंकडून कार्यालयाचे कौतुक.


                                                        


दौलतनगर दि. 04:
कराड आणि पाटण तालुक्याकरीता स्वतंत्रपणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारणेकरीता राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे आग्रही होते. कार्यालयाकरीता जागेचा प्रश्न गंभीर असताना त्यांनी तो सोडवून कराड आणि पाटण तालुक्याच्या मध्यावधी ठिकाणी विजयनगर येथे उभारलेले हे कार्यालय या कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्या पुढाकाराने संपुर्ण राज्यामध्ये नावारुपास आले असून कमी वेळात वाहनधारकांना सेवा देणारे कार्यालयाचे कामकाज त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे राज्यातील मॉडेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणून कराड कार्यालयाकडे पाहिले जात असल्याचे प्रतिपादन पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी करुन कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व कामकाज कौतुकास्पद असल्याचे गौरवउद्गार त्यांनी काढले.
आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते कराड व पाटण तालुक्यातील लायसन्सधारकांना लायसन्स स्मार्टकार्ड तसेच वाहन नोंदणीचे नोंदणी स्मार्टकार्ड वाटप करण्याचा कार्यक्रम उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,कराड यांच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. सुरवातीस आमदार शंभूराज देसाई यांचे या कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी कार्यालयातील सहाययक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निलकंट पाटील, प्रभारी सहाययक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ऋृषिकेश कोराणे, मोटार वाहन निरीक्षक एस.डी.राजमाने, संतोष काटकर, संदीप देसाई, अरविंद देसाई, आकाश गालिंदे, सहाययक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती उज्वला देसाई या अधिकारी वर्गांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,मी स्वत: माझे स्वत:चे वाहन चालविण्याचे लायसन्स नुतनीकरण करुन घेणेकरीता कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये आलो आहे. या कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्या पुढाकाराने या कार्यालयाने या क्षेत्रातील नवनवीन उपक्रम आमंलात आणून वाहनधारकांना कमी कालावधीत चांगली सेवा देणेकरीता आधार कार्डाच्या सहाययाने हस्तदेय लायसन्स्, वाहन नोंदणी स्मार्टकार्ड देण्याचे उपक्रम राबविले आहेत. सुरवातीस या कार्यालयाची सुरुवात होताना या कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दराडे त्यानंतर डॉ.स्टीवन अल्वारिस व आता अजित शिंदे या अधिका-यांनी या कार्यालयाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ज्याला आपण सर्व जण आरटीओ ऑफीस म्हणतो याची प्रतिमा समाजामध्ये पिळवणूक करणारे कार्यालय म्हणून आजपर्यंत एैकीवात होती मात्र आज या कार्यालयामध्ये माझेहस्ते अत्यंत कमी कालावधीत लायसन्स्, वाहन नोंदणी स्मार्टकार्ड देण्याचे कामकाज पाहून मी समाधानी झालो. शासकीय दिरंगाईमुळे अनेकदा आरटीओ ऑफीस हे टिकेचे धनी झाल्याचे पहावयास मिळाले परंतू या कार्यालयातील कामकाजाचे मी मनापासून कौतुक करतो.कौतुक करण्यासारखे कामकाज या कार्यालयातील सर्वांकडून होत असून परिवहन विभागात नवनवीन संकल्पना राबविणे याकरीता राज्याचे परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते हे नेहमी आग्रही असतात त्यांच्या संकल्पनेनुसार या कार्यालयात कार्यालयाचे प्रमुख म्हणून काम पहाणारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी त्यांच्या सहकार्याना सोबत घेवून नवनवीन संकल्पानांचा पायंडा जो पाडला आहे तो कौतुकास्पद आहे.एक मॉडेल कार्यालय म्हणून या कार्यालयाने राज्यामध्ये नावलौकीक मिळविला आहेच यापुढेही या कार्यालयाकडून चांगले कार्य व्हावे अशा शुभेच्छा देवून आमदार शंभूराज देसाई यांनी या कार्यालयाकडून काही अपेक्षाही यावेळी बोलताना व्यक्त केल्या.ते म्हणाले, आरटीओ ऑफीस व पोलीस विभागाचे वाहतूक नियंत्रण कक्ष यांच्या संयुक्त विद् माने वाहनचालकांना स्वयंस्थितीचे धडे देणे आवश्यक आहे. वाहतूकीला शिस्त लागणेकरीता सर्व वाहनधारकांना हे धडे देणे गरजेचे असून प्रामुख्याने युवकांच्या मध्ये जागृती निर्माण करणेकरीता प्रयत्न करावा.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना कोल्हापुर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी म्हणून प्रभारी पदभार देण्यात आलेबद्दल आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत सहाययक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निलकंट पाटील यांनी करुन आभार व्यक्त केले.

Friday 1 June 2018

सत्यजितसिंह पाटणकर स्वत:चे कर्तृत्व सांगा, पोत्याने भरुन मते देणा-या जनतेला तुमच्याकडून इतक्या वर्षात मिळालेच काय? सत्यजितसिंह पाटणकरांना डोंगरी बरोबर हिरव्या पट्टयातील जनतेनेही नाकारले आहे.-आमदार शंभूराज देसाईंचा प्रतिटोला.




पाटण तालुक्यातील केरा,मणदुरे व कोयना भागाने याअगोदर माजी आमदार पाटणकरांना पोत्याने भरुन मते दिली. दिलेल्या मताच्या बदल्यात विकासाच्या रुपाने पाटणकरांनी डोंगर पठारावरील जनतेला दिलेच आहे काय? याच डोंगर पठारावरील जनतेच्या जमिनी कवडीमोल किंमतीने बढया बढया कंपन्यांना विकायला लावून देशाधडीला लावण्याचे काम पाटणकरांनी केले आणि त्यांचे सुपुत्र चार दिवसापुर्वी याच डोंगरपठारावर येवून मी पवनचक्की प्रकल्पाला, नवीन महाबळेश्वरला, पर्यटनाला विरोध केला व माजी आमदारांनी या डोंगर पठारावर विकासाचा डोंगर उभा केल्याच्या बढाया मारुन गेले. माझा विरोध प्रकल्पांना नव्हता तर तो शेतक-यांच्या जमिनी कवडीमोलाने खरेदी करणा-यांना होता. माजी आमदार पाटणकरांना आणि त्यांच्या सुपुत्रांना तालुक्यातील डोंगर पठारावरील जनतेचा आणि शेतक-यांचा एवढाच कळवळा आहे तर स्वत:च्या जमिनीप्रमाणे त्या शेतक-यांच्या जमिनी बढया बढया कंपन्यांना पवनचक्कीकरीता विकत देण्याएैवजी भाडेकरारावर का दिल्या नाहीत? याचे उत्तर प्रथमत: माजी आमदार पुत्रांनी डोंगरपठारावरील जनतेला दयावे व मगच बढाया माराव्यात आणि बढाया मारायला सत्यजितसिंह पाटणकर आपले कर्तृत्व ते काय हे पहिल्यांदा सांगा तुम्हाला डोंगरी बरोबर हिरव्या पट्टयातील जनतेनेही नाकारले असल्याचा प्रतिटोला आमदार शंभूराज देसाई यांनी लगाविला आहे.
घाणबी ता.पाटण याठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या आमदार शंभूराज देसाई डोंगरी विभाग संघटनेच्या शाखेचे उदघाटन व यानिमित्ताने आमदार शंभूराज देसाई यांचा आयोजीत जाहीर सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी संतोष पवार,रामचंद्र पवार,शिवाजी सपकाळ,दिपक सपकाळ,बबन सपकाळ,धमेंद्र पवार,निलकंठ शिंदे,जगन्नाथ शिर्के,राजेश पवार, बापुराव निकम,यशवंत निकम,या प्रमुख डोंगरी विभागातील पदाधिकारी यांचेसह काठी,अवसरी,रामेल,म्हारवंड,मरड, जाईचीवाडी, घेरादातेगड व वाटोळे गावातील प्रमुख कार्यकर्ते तसेच बबनराव माळी, बबनराव भिसे आणि घाणबी गावातील मोठया प्रमाणात महिला व युवक कार्यकर्ते मोठया संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, मागील महिन्यात पंधरा दिवसापुर्वी तालुक्याच्या डोंगर पठारावरील गांवाची आणि वाडयांची डोंगरी परीषद आपण काठी याठिकाणी आयोजीत केली होती. या डोंगरी परीषदेकरीता डोंगरपठारावरील जनतेने आणि महिलांनी नोदंविलेला सहभाग पाहून माजी आमदार पाटणकर यांच्या सुपुत्रांच्या पायाखालची वाळू सरकल्याने चार दिवसापुर्वी त्यांनी याच पठारावर येवून काही बढाया मारल्या त्या बढायामध्ये बोललेले किती खरे आणि किती खोटे हे या पठारावरील जनतेला चांगलेच माहिती असल्याने  आज या कार्यक्रमाकरीता याच पठारावरील जनतेने आणि महिलांनी मोठया प्रमाणात हजेरी लावली आहे.कोण कारस्थाने करतय आणि कोण ढोंगीपणा आणतय हे पठारावरील जनतेने ओळखले आहे त्यामुळे माजी आमदार पुत्रांनी पोकळच्या गप्पा मारण्यापेक्षा स्वत: आपण या डोंगरपठारावरील जनतेला इतक्या वर्षात काय दिले आहे हे पहिल्यांदा सांगावे. असे सांगून ते म्हणाले माजी आमदार पाटणकरांनी या विभागातील रस्ता केला तो कशासाठी हे माझेपेक्षा तुम्हा मंडळीना जादा माहिती आहे. जनतेचा विकास म्हणून नव्हे तर पवनचक्कीची वाहने जाणेकरीता हा रस्ता झाला त्यानंतर या रस्त्याची काय अवस्था होती ते तुम्ही पाहिले आहे. यंदाच्या वर्षी सुमारे दोन कोटी रुपयांचा केर नाथाची पाग ते कारवट हा रस्ता आपण केला तो पवनचक्कीची वाहने नेण्याकरीता नाही तर जनतेच्या सोईसाठी हा त्यांच्यातील आणि माझेतील फरक आहे. एवढा मोठा रस्ता करुनही माजी आमदार सुपुत्र म्हणतात की, खड्डे भरण्याचे काम केले. डोळयाला दिसून सुध्दा न दिसल्यासारखे करायचे ही पाटणकरांची वृत्ती माझेसाठी नवीन नाही.जनतेचा बुध्दीभेद, संधीसाधूपणा यात माझेपेक्षा पाटणकर माहीर आहेत. त्यांना कुठे संधी साधायची हे नक्की समजते. मी डोंगरी परीषद घेतली यात जनतेने सुचविलेली कामे येणा-या काळात करण्याचा जाहीर शब्द मी दिला आहे मी दिलेला शब्द माजी आमदारांप्रमाणे किंवा त्यांच्या सुपुत्रांप्रमाणे कधी मोडत नाही. मी जो शब्द दिला आहे तो मी पुर्ण करणारच असे स्पष्ट करीत ते म्हणाले, सत्यजितसिंह पाटणकर म्हणतात डोंगरी परीषदेकरीता हिरव्या पट्टयातील लोकांना गाडयातून घेवून डोंगरी परीषद घेतले. डोंगरी परीषदेमध्ये समोर बसलेले कोण लोक होते हेच ज्यांना ओळखता येत नाहीत हे सत्यजितसिंह पाटणकर तुमचे नव्हे डोंगरपठारावरील जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल.डोंगरपठारावरील जनता भोळी भाबडी आहे तुमच्या आमिषांना यापुर्वी बळी पडली आता याच डोंगरपठारावरील जनतेने तुमच्या आमिषांना बळी न पडण्याचा एकमुखाने निर्णय घेतला आहे त्यामुळे भविष्यात या जनतेमध्ये दुफळी आणि बुध्दीभेद करण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नका डोंगरपठारावरील शेतक-यांच्या जमिनी मोठमोठया कंपन्यांना विकण्याएैवजी त्या भाडेकरारावर कंपन्यांना दिल्या असत्या तर आज येथील शेतक-यांवर याच पवनचक्की प्रकल्पावर वॉचमन म्हणून राहण्याची वेळ आली नसती. वॉचमनच्या नोकरीत मिळणा-या पगाराच्या १० पटीने भाडेकराराची रक्कम त्या शेतक-यांना मिळाली असती याची साधी समजही आपल्याला नाही आणि निघालेत बढाया मारायला. बढाया मारा परंतू त्या जनतेला पटतील अशाच मारा असा सल्लाही त्यांनी यावेळी सत्यजितसिंहाना बोलताना दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी सपकाळ यांनी केले व आभार बबनराव माळी यांनी मानले.