Monday 4 June 2018

कराडचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राज्यातील मॉडेल कार्यालय. - आमदार शंभूराज देसाईंकडून कार्यालयाचे कौतुक.


                                                        


दौलतनगर दि. 04:
कराड आणि पाटण तालुक्याकरीता स्वतंत्रपणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारणेकरीता राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे आग्रही होते. कार्यालयाकरीता जागेचा प्रश्न गंभीर असताना त्यांनी तो सोडवून कराड आणि पाटण तालुक्याच्या मध्यावधी ठिकाणी विजयनगर येथे उभारलेले हे कार्यालय या कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्या पुढाकाराने संपुर्ण राज्यामध्ये नावारुपास आले असून कमी वेळात वाहनधारकांना सेवा देणारे कार्यालयाचे कामकाज त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे राज्यातील मॉडेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणून कराड कार्यालयाकडे पाहिले जात असल्याचे प्रतिपादन पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी करुन कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व कामकाज कौतुकास्पद असल्याचे गौरवउद्गार त्यांनी काढले.
आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते कराड व पाटण तालुक्यातील लायसन्सधारकांना लायसन्स स्मार्टकार्ड तसेच वाहन नोंदणीचे नोंदणी स्मार्टकार्ड वाटप करण्याचा कार्यक्रम उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,कराड यांच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. सुरवातीस आमदार शंभूराज देसाई यांचे या कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी कार्यालयातील सहाययक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निलकंट पाटील, प्रभारी सहाययक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ऋृषिकेश कोराणे, मोटार वाहन निरीक्षक एस.डी.राजमाने, संतोष काटकर, संदीप देसाई, अरविंद देसाई, आकाश गालिंदे, सहाययक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती उज्वला देसाई या अधिकारी वर्गांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,मी स्वत: माझे स्वत:चे वाहन चालविण्याचे लायसन्स नुतनीकरण करुन घेणेकरीता कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये आलो आहे. या कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्या पुढाकाराने या कार्यालयाने या क्षेत्रातील नवनवीन उपक्रम आमंलात आणून वाहनधारकांना कमी कालावधीत चांगली सेवा देणेकरीता आधार कार्डाच्या सहाययाने हस्तदेय लायसन्स्, वाहन नोंदणी स्मार्टकार्ड देण्याचे उपक्रम राबविले आहेत. सुरवातीस या कार्यालयाची सुरुवात होताना या कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दराडे त्यानंतर डॉ.स्टीवन अल्वारिस व आता अजित शिंदे या अधिका-यांनी या कार्यालयाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ज्याला आपण सर्व जण आरटीओ ऑफीस म्हणतो याची प्रतिमा समाजामध्ये पिळवणूक करणारे कार्यालय म्हणून आजपर्यंत एैकीवात होती मात्र आज या कार्यालयामध्ये माझेहस्ते अत्यंत कमी कालावधीत लायसन्स्, वाहन नोंदणी स्मार्टकार्ड देण्याचे कामकाज पाहून मी समाधानी झालो. शासकीय दिरंगाईमुळे अनेकदा आरटीओ ऑफीस हे टिकेचे धनी झाल्याचे पहावयास मिळाले परंतू या कार्यालयातील कामकाजाचे मी मनापासून कौतुक करतो.कौतुक करण्यासारखे कामकाज या कार्यालयातील सर्वांकडून होत असून परिवहन विभागात नवनवीन संकल्पना राबविणे याकरीता राज्याचे परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते हे नेहमी आग्रही असतात त्यांच्या संकल्पनेनुसार या कार्यालयात कार्यालयाचे प्रमुख म्हणून काम पहाणारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी त्यांच्या सहकार्याना सोबत घेवून नवनवीन संकल्पानांचा पायंडा जो पाडला आहे तो कौतुकास्पद आहे.एक मॉडेल कार्यालय म्हणून या कार्यालयाने राज्यामध्ये नावलौकीक मिळविला आहेच यापुढेही या कार्यालयाकडून चांगले कार्य व्हावे अशा शुभेच्छा देवून आमदार शंभूराज देसाई यांनी या कार्यालयाकडून काही अपेक्षाही यावेळी बोलताना व्यक्त केल्या.ते म्हणाले, आरटीओ ऑफीस व पोलीस विभागाचे वाहतूक नियंत्रण कक्ष यांच्या संयुक्त विद् माने वाहनचालकांना स्वयंस्थितीचे धडे देणे आवश्यक आहे. वाहतूकीला शिस्त लागणेकरीता सर्व वाहनधारकांना हे धडे देणे गरजेचे असून प्रामुख्याने युवकांच्या मध्ये जागृती निर्माण करणेकरीता प्रयत्न करावा.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना कोल्हापुर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी म्हणून प्रभारी पदभार देण्यात आलेबद्दल आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत सहाययक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निलकंट पाटील यांनी करुन आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment