Friday 15 June 2018

आमदार शंभूराज देसाईंचे प्रयत्नातून महिंद ल.पा.तलावाला सुधारित प्रशासकीय मान्यता. सुधारित प्रशासकीय मान्यता 11 कोटी 55 लक्ष रुपयांची.


                            

दौलतनगर दि. 15:  पाटण तालुक्यातील महिंद लघु पाटबंधारे योजनेच्या कामांस तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे विशेष प्रयत्नामुळे राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून सुमारे ११ कोटी ५५ लक्ष ३७ हजार इतक्या किंमतीस जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दि. 13 जून 2018 रोजीचे शासन निर्णयानुसार ही सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये अंदाजीत किमतींचा गोषवारा दिला असून भूसंपादनाबरोबर या प्रकल्पातील पुनर्वसित गावठाणांतील नागरी सुविधांबरोबर काही महत्वाची कामे हाती घेण्यात येणार असून  या ल.पा तलावाच्या दुरुस्तीच्या कामांकरीता शासनाने ७६.४१ लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला असून दुरुस्तीचे काम सुरु असल्याचीही माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकाव्दारे  दिली आहे.
आमदार शंभूराज देसाई यांनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील महिंद लघु पाटबंधारे योजनेकरीता राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने 03 कोटी 54 लक्ष 52 हजार इतक्या किंमतीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती.सदर प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव सन 1995-1996 च्या दरसुचीवर आधारित होता.प्रकल्पाचे काम सुरु असताना दरसुचीतील वाढ,भूसंपादन किंमतीतील वाढ,संकल्पचित्र बदामुळे वाढ,अपुरी तरतूद,इतर कारणांमुळे व अनुषंगिक खर्चातील वाढीमुळे सन 2009- 2010 ची दरसुची वापरुन सुधारित अंदाजपत्रक तयार करुन रुपये 11 कोटी 55 लाख 37 हजार इतक्या किंमतीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सातारा पाटबंधारे विभागामार्फत सादर करण्यात आला होता. सादर केलेल्या या प्रस्तावास व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात यावी याकरीता राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांचेकडे माझा सातत्याचा पाठपुरावा सुरु होता. दि. 15 फेब्रुवारी, 2018 रोजी शासन स्तरावर व्यय अग्रक्रम समितीची बैठक पार पडली या बैठकीत महिंद लघु पाटबंधारे योजनेच्या सदरच्या व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मांडण्यात आला यावेळी या प्रस्ताव मांडण्यात येवून या योजनेस व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या योजनेस व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता  देण्यात आली असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने दि. 13 जून 2018 रोजी पारित केला आहे. महिंद लघू पाटबंधारे तलावास देण्यात आलेल्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये अंदाजीत किमतींचा गोषवारा दिला असून भूसंपादनाबरोबर या प्रकल्पातील पुनर्वसित गावठाणांतील नागरी सुविधांबरोबर काही महत्वाची कामे हाती घेण्यात येणार यामध्ये प्राथमिक कामे, भू संपादन (जमिन), कामे धरण,सांडवा व चॅनेल,इमारती,विमोचक,कोल्हापूर पध्दतीचे बंधारे,संकीर्ण,वृक्षारोपन,देखभाल,दळणवळण या कामांचा समावेश असून कामांसाठी रु.1090.13 लक्ष व अनुषंगिक खर्चासाठी 65.24 लक्ष अशी विगतवारी करण्यात आली असून अनुषंगिक खर्चामधून या तलावामुळे पुर्नवसित झालेल्या मौजे चौगुलवाडी येथील पुर्नवसित गावठाणांतील नागरी सुविधांची कामे करण्यात येणार आहेत. योजनेची सिंचन क्षमता ही 304 हेक्टर असून सिंचन क्षेत्रामध्ये एकूण पाच गावांचा समावेश आहे. तलावाची पाणी साठवण क्षमता ही 2404 स.घ.मी इतकी असून सिंचन क्षेत्रामधील सळवे महिंद,बाचोली बनपुरी व सणबूर या पाच गांवामध्ये अनुक्रमे 21 हे.आर., 39 हे.आर., 70 हे.आर., 139 हे.आर. व ३५ हे.आर. क्षेत्र सिंचनाखाली येत असल्याचे म्हंटले असून व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेल्या या कामांना मंजुर करण्यात आलेला निधी लवकरच सुपुर्द करण्यात येणार असल्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी म्हंटले आहे. दरम्यान सदरची व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणेकरीता सातारा पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता विजयराव घोगरे यांचा माझेकडे सातत्याचा पाठपुरावा सुर होता असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात शेवठी म्हंटले आहे.


No comments:

Post a Comment