Thursday 28 June 2018

पाटण बसस्थानकाच्या नुतनीकरणाच्या कामाचे परिवहन मंत्री यांचे हस्ते दि.30 जुन रोजी भूमिपुजन. आमदार शंभूराज देसाई


दौलतनगर दि. २8:  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पाटण या तालुक्याच्या ठिकाणचे बसस्थानकाच्या इमारतीचे व बसस्थानकाच्या परिसराचे नुतनीकरण करणेकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर करणेबाबत राज्याचे परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते यांचेकडे मागणी केलेप्रमाणे त्यांनी राज्य परिवहन महामंडळाकडून आवश्यक असणारा सुमारे ७ कोटी रुपयांच्या निधीस तत्वत: मान्यता दिली असून या कामाचा भूमिपुजन समारंभ परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते यांचे हस्ते शनिवार दि.30 जुन,2018 रोजी सकाळी 10.00 वा पाटण बसस्थानक परिसरात आयोजीत केला असल्याची माहिती या कामाकरीता भरघोस निधीस मान्यता आणणारे पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकात म्हंटले आहे की,पाटण हे तालुक्याचे ठिकाण असून तालुक्याच्या ठिकाणच्या बसस्थानकाच्या इमारतीची तसेच बसस्थानक परिसराची मोठया प्रमाणात दुरावस्था झाल्याने पाटण बसस्थानकाच्या इमारतीचे व बसस्थानकाच्या परिसराचे नुतनीकरण करणेकरीता आवश्यक असणारा निधी राज्य परिवहन महामंडळाकडून मंजुर करावा अशी मागणी सन 2014 ला पाटण मतदारसंघाचा आमदार झालेनंतर मी राज्याचे परिवहन मंत्री व राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष ना.दिवाकर रावते यांचेकडे केली होती.परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते यांनी सन 2015-16 मध्ये राज्य परिवहन महामंडळाकडून या कामाकरीता आवश्यक असणा-या सुमारे 7 कोटी रुपयांच्या निधीस तत्वत: मान्यता दिली आहे.पहिल्या टप्प्यात बसस्थानकाचे आधुनिकीकरण करणे व दर्जावाढ करणेच्या कामांस मागील वर्षी 1 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता.मात्र बसस्थानकाच्या परिसराची दुरावस्था पहाता बसस्थानकाच्या इमारतीचे व बसस्थानकाच्या परिसराचे नुतनीकरण करणे ही सर्वच कामे एकत्रित करणेकरीता आवश्यक असणारा सुमारे ७ कोटी रुपयांच्या निधीस एकाच टप्प्यात मान्यता देवून या कामांस लवकरात लवकर सुरुवात व्हावी असा आग्रह मंत्री ना.दिवाकर रावते यांचेकडे करुन पाटण बसस्थानकाची सध्याची परिस्थिती परिवहनमंत्री यांचे निदर्शनास आणून दिलेनंतर त्यांनी एकाच टप्प्यात पाटण बसस्थानकाच्या प्रस्तावित व मागणी असणा-या सर्व कामांच्याकरीता आवश्यक असणारा सुमारे ७ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली असून पाटण बसस्थानकाच्या इमारतीचे व बसस्थानकाच्या परिसराचे नुतनीकरण ही सर्व कामे एकाच टप्प्यात हाती घेण्यात येणार असून नुतनीकरण करणेच्या कामांमध्ये मान्यता देण्यात आलेल्या ७ कोटी रुपयांच्या निधीमधून बसस्थानक इमारतीमध्ये वाढ करुन सहा फलाटांची संख्या वाढविणे,इमारतीचे पाणी पुरवठा व इतर पाईप लाईन नुतनीकरण करणे,जादा पाणीसाठा होणेसाठी अंडरग्राऊंड वॉटर टँन्क बांधणे,बससस्थानकाच्या संपुर्ण वाहनतळाचे एकूण क्षेत्र असणा-या 6000 चौ.मीटर  क्षेत्राचे काँक्रीटीकरण करणे,बसस्थानकाच्या सर्व बाजूंनी संरक्षक भिंतींची उभारणी करणे,वाहनतळाचे क्षेत्रफळ सोडून उर्वरित क्षेत्रफळाचे कठिणीकरण करणे,भुयारी आर.सी.सी.गटरचे बांधकाम करणे,स्वच्छतागृहासाठी नवीन सेप्टीक टॅन्क बांधणे,बसस्थानकामध्ये कमान उभारुन इन-आऊट गेट बांधणे व बसस्थानकाचे इमारतीस संपुर्ण विद्युत संच नव्याने बसविणे या कामांचा समावेश करण्यात आला आहे.परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते यांचे शुभहस्ते शनिवार दि.30 जुन,2018 रोजी या कामांचे भूमिपुजन झालेनंतर तात्काळ या नुतनीकरणाच्या कामांना सुरुवात करण्याच्या सुचना संबधितांना करण्यात आल्या असून पाटण बसस्थानकाचे नुतनीकरणाच्या कामांमुळे पाटण बसस्थानकाचे रुपडेच पालटणार असून प्रवाशांची होणारी गैरसोय यामुळे दुर होणार असल्याचा विश्वास आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केला असून या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या समारंभाचे आयोजक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सातारा विभागाचे विभाग नियंत्रक यांचेवतीने करण्यात आले आहे.

2 comments: