पाटण तालुक्यातील केरा,मणदुरे व कोयना भागाने
याअगोदर माजी आमदार पाटणकरांना पोत्याने भरुन मते दिली. दिलेल्या मताच्या बदल्यात विकासाच्या
रुपाने पाटणकरांनी डोंगर पठारावरील जनतेला दिलेच आहे काय? याच डोंगर पठारावरील जनतेच्या
जमिनी कवडीमोल किंमतीने बढया बढया कंपन्यांना विकायला लावून देशाधडीला लावण्याचे काम
पाटणकरांनी केले आणि त्यांचे सुपुत्र चार दिवसापुर्वी याच डोंगरपठारावर येवून मी पवनचक्की
प्रकल्पाला, नवीन महाबळेश्वरला, पर्यटनाला विरोध केला व माजी आमदारांनी या डोंगर पठारावर
विकासाचा डोंगर उभा केल्याच्या बढाया मारुन गेले. माझा विरोध प्रकल्पांना नव्हता तर
तो शेतक-यांच्या जमिनी कवडीमोलाने खरेदी करणा-यांना होता. माजी आमदार पाटणकरांना आणि
त्यांच्या सुपुत्रांना तालुक्यातील डोंगर पठारावरील जनतेचा आणि शेतक-यांचा एवढाच कळवळा
आहे तर स्वत:च्या जमिनीप्रमाणे त्या शेतक-यांच्या जमिनी बढया बढया कंपन्यांना पवनचक्कीकरीता
विकत देण्याएैवजी भाडेकरारावर का दिल्या नाहीत? याचे उत्तर प्रथमत: माजी आमदार पुत्रांनी
डोंगरपठारावरील जनतेला दयावे व मगच बढाया माराव्यात आणि बढाया मारायला सत्यजितसिंह
पाटणकर आपले कर्तृत्व ते काय हे पहिल्यांदा सांगा तुम्हाला डोंगरी बरोबर हिरव्या पट्टयातील
जनतेनेही नाकारले असल्याचा प्रतिटोला आमदार शंभूराज देसाई यांनी लगाविला आहे.
घाणबी ता.पाटण याठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या आमदार
शंभूराज देसाई डोंगरी विभाग संघटनेच्या शाखेचे उदघाटन व यानिमित्ताने आमदार शंभूराज
देसाई यांचा आयोजीत जाहीर सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी संतोष पवार,रामचंद्र
पवार,शिवाजी सपकाळ,दिपक सपकाळ,बबन सपकाळ,धमेंद्र पवार,निलकंठ शिंदे,जगन्नाथ शिर्के,राजेश
पवार, बापुराव निकम,यशवंत निकम,या प्रमुख डोंगरी विभागातील पदाधिकारी यांचेसह काठी,अवसरी,रामेल,म्हारवंड,मरड,
जाईचीवाडी, घेरादातेगड व वाटोळे गावातील प्रमुख कार्यकर्ते तसेच बबनराव माळी, बबनराव
भिसे आणि घाणबी गावातील मोठया प्रमाणात महिला व युवक कार्यकर्ते मोठया संख्येने कार्यक्रमास
उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, मागील
महिन्यात पंधरा दिवसापुर्वी तालुक्याच्या डोंगर पठारावरील गांवाची आणि वाडयांची डोंगरी
परीषद आपण काठी याठिकाणी आयोजीत केली होती. या डोंगरी परीषदेकरीता डोंगरपठारावरील जनतेने
आणि महिलांनी नोदंविलेला सहभाग पाहून माजी आमदार पाटणकर यांच्या सुपुत्रांच्या पायाखालची
वाळू सरकल्याने चार दिवसापुर्वी त्यांनी याच पठारावर येवून काही बढाया मारल्या त्या
बढायामध्ये बोललेले किती खरे आणि किती खोटे हे या पठारावरील जनतेला चांगलेच माहिती
असल्याने आज या कार्यक्रमाकरीता याच पठारावरील
जनतेने आणि महिलांनी मोठया प्रमाणात हजेरी लावली आहे.कोण कारस्थाने करतय आणि कोण ढोंगीपणा
आणतय हे पठारावरील जनतेने ओळखले आहे त्यामुळे माजी आमदार पुत्रांनी पोकळच्या गप्पा
मारण्यापेक्षा स्वत: आपण या डोंगरपठारावरील जनतेला इतक्या वर्षात काय दिले आहे हे पहिल्यांदा
सांगावे. असे सांगून ते म्हणाले माजी आमदार पाटणकरांनी या विभागातील रस्ता केला तो
कशासाठी हे माझेपेक्षा तुम्हा मंडळीना जादा माहिती आहे. जनतेचा विकास म्हणून नव्हे
तर पवनचक्कीची वाहने जाणेकरीता हा रस्ता झाला त्यानंतर या रस्त्याची काय अवस्था होती
ते तुम्ही पाहिले आहे. यंदाच्या वर्षी सुमारे दोन कोटी रुपयांचा केर नाथाची पाग ते
कारवट हा रस्ता आपण केला तो पवनचक्कीची वाहने नेण्याकरीता नाही तर जनतेच्या सोईसाठी
हा त्यांच्यातील आणि माझेतील फरक आहे. एवढा मोठा रस्ता करुनही माजी आमदार सुपुत्र म्हणतात
की, खड्डे भरण्याचे काम केले. डोळयाला दिसून सुध्दा न दिसल्यासारखे करायचे ही पाटणकरांची
वृत्ती माझेसाठी नवीन नाही.जनतेचा बुध्दीभेद, संधीसाधूपणा यात माझेपेक्षा पाटणकर माहीर
आहेत. त्यांना कुठे संधी साधायची हे नक्की समजते. मी डोंगरी परीषद घेतली यात जनतेने
सुचविलेली कामे येणा-या काळात करण्याचा जाहीर शब्द मी दिला आहे मी दिलेला शब्द माजी
आमदारांप्रमाणे किंवा त्यांच्या सुपुत्रांप्रमाणे कधी मोडत नाही. मी जो शब्द दिला आहे
तो मी पुर्ण करणारच असे स्पष्ट करीत ते म्हणाले, सत्यजितसिंह पाटणकर म्हणतात डोंगरी
परीषदेकरीता हिरव्या पट्टयातील लोकांना गाडयातून घेवून डोंगरी परीषद घेतले. डोंगरी
परीषदेमध्ये समोर बसलेले कोण लोक होते हेच ज्यांना ओळखता येत नाहीत हे सत्यजितसिंह
पाटणकर तुमचे नव्हे डोंगरपठारावरील जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल.डोंगरपठारावरील जनता
भोळी भाबडी आहे तुमच्या आमिषांना यापुर्वी बळी पडली आता याच डोंगरपठारावरील जनतेने
तुमच्या आमिषांना बळी न पडण्याचा एकमुखाने निर्णय घेतला आहे त्यामुळे भविष्यात या जनतेमध्ये
दुफळी आणि बुध्दीभेद करण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नका डोंगरपठारावरील शेतक-यांच्या
जमिनी मोठमोठया कंपन्यांना विकण्याएैवजी त्या भाडेकरारावर कंपन्यांना दिल्या असत्या
तर आज येथील शेतक-यांवर याच पवनचक्की प्रकल्पावर वॉचमन म्हणून राहण्याची वेळ आली नसती.
वॉचमनच्या नोकरीत मिळणा-या पगाराच्या १० पटीने भाडेकराराची रक्कम त्या शेतक-यांना मिळाली
असती याची साधी समजही आपल्याला नाही आणि निघालेत बढाया मारायला. बढाया मारा परंतू त्या
जनतेला पटतील अशाच मारा असा सल्लाही त्यांनी यावेळी सत्यजितसिंहाना बोलताना दिला. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक शिवाजी सपकाळ यांनी केले व आभार बबनराव माळी यांनी मानले.
No comments:
Post a Comment