दौलतनगर दि.१८:- राष्ट्रकुल संसदीय मंडळ,महाराष्ट्र
राज्य यांचेवतीने आयोजित लोकलेखा समितीचा इंग्लंड, नेदरलँड व फ्रान्सचा शासकीय दौरा
फलदायी झाला.या दौ-यामध्ये या तिन्ही देशांच्या संसदीय प्रणालीचा अभ्यास करता आला.आपली
संसदीय प्रणाली आणि या तिन्ही देशांची संसदीय प्रणाली याची तुलनात्मक माहिती घेत असताना
या दौ-यात खुप काही शिकण्यास मिळाले असल्याने आपण समाधानी असल्याची प्रतिक्रिया लोकलेखा
समितीचे अभ्यासू सदस्य उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली असून
ब्रिटीश पार्लमेंट मध्ये ब्रिटनच्या महिला पंतप्रधान यांचे भाषण ऐकण्याचा,पार्लमेंटमधील
त्यांचे कामकाज पाहण्याची संधी मिळाली यातून खुप काही शिकण्यासारखे आणि घेण्यासारखे
आहे.आपली संसदीय प्रणाली यामध्ये सरस आहे ही बाब अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी म्हंटले
आहे.
इंग्लंड,नेदरलँड व फ्रान्स या शासकीय दौ-याहून आलेनंतर आमदार शंभूराज देसाईंनी
दिलेल्या प्रतिक्रयेत म्हंटले आहे,राष्ट्रकूल संसदीय मंडळ महाराष्ट्र राज्य यांचेवतीने
महाराष्ट्र विधानसभेतील नऊ विधानसभा सदस्यांची इंग्लंड,नेंदरलँड व फ्रान्स या तीन देशांच्या
अभ्यास दौ-याकरीता निवड केली होती.एकूण नऊ दिवसांच्या दौ-यामध्ये तीन देशामध्ये ब्रिटीश पार्लमेंटसह एकूण
सात ठिकाणी येथील शिष्टमंडळाबरोबर महाराष्ट्र लोकलेखा समितीच्या बैठका झाल्या.या तिन्ही
देशांच्या लोकलेखा तसेच वित्त समितीच्या सदस्याबरोबर झालेल्या बैठकामधून आपली व या
देशांच्या संसदीय कामकाजाची तुलनात्मक अशी माहिती आम्हा नऊ सदस्यांना घेता आली.सर्वात
महत्वाचे म्हणजे ब्रिटनच्या महिला पंतप्रधान यांचे पार्लमेंटमधील भाषण ऐकण्याची तसेच
ब्रिटीश पार्लमेंटचे कामकाज कशाप्रकारे चालते हे पाहण्याची आम्हांस संधी मिळाली.संसदीय
कार्यप्रणालीचा अभ्यास करणे हा या तीन देशाच्या
दौ-याचा मुख्य हेतु होता.या तिन्ही
देशांचे सरकार या देशामध्ये कशाप्रकारे विकासात्मक योजना राबविते.तसेच पार्लमेंटमध्ये
कशाप्रकारे देशाच्या हिताचे ठराव संमत करुन याची अंमलबजावणी करते याचे सुक्ष्म निरीक्षण
या दौ-यामध्ये करता आले या तिन्ही देशाच्या
अभ्यास दौ-यामध्ये विविध बैठकांच्या माध्यमातून येथील लोकलेखा,वित्त समितीच्या सदस्याकडून
महाराष्ट्र लोकलेखा अभ्यास समितीच्या सर्व सदस्यांचे यथोचित असे आपुलकीने स्वागत करण्यात
आले.
भारतीय संसदेची रचना ज्या धर्तीवर
करण्यात आली आहे त्या ब्रिटीश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्स(लोकसभा)मध्ये आम्हा सदस्यांची
ब्रिटीश लोकसभा अध्यक्ष व ब्रिटीश खासदारांसोबत लंडनमधील संसदेची इमारत असणा-या वेन्टमिन्स्टर
या ठिकाणी पहिली बैठक झाली.त्यांनतर नेदरलँड (हेज) संसदेस तसेच नॅशनल असेम्बली ऑफ फ्रांन्स
येथे भेट दिली.लंडन,नेदरलँड व फ्रांन्स येथील पार्लमेंट,असेम्बली भेटीबरोबर या तिन्ही
देशात झालेल्या लोकलेखा व वित्त समितीच्या एकूण सात बैठकामध्ये ब्रिटीश संसदेच्या हाऊस
ऑफ कॉमनचे लोकसभा अध्यक्ष आर.टी.ढोलकिया,स्टेव्ह पॉऊंड,रुट कॅडबरी,युनी फॉरुज,फिलीप
हेलोबिनी हे ब्रिटीश खासदार. समितीप्रमुख मेग हिलर,लोकलेखा सचिव रिचर्ड कुकी,नेदरलँड
संसदेचे उपसिचव लुक वॅनल्युईक,फ्रांन्स वित्त समितीचे सिनेट सिनेटर युवॉन कोलीण तसेच
प्रेसिडेन्स ऑफ द फेंन्डशीप ग्रुप अँड व्हाईस चेअर ऑफ सिनेट कमिटी त्याचबरोबर नॅशनल
ॲसेम्बली ऑफ फ्रांन्सचे फ्रेन्डशिप ग्रुप्स ऑफ वित्त सेलिन कलावेज यांची प्रमुख उपस्थिती
होती.ब्रिटीश खासदार,सिनेट सदस्य यांच्याबरोबर आमचे समितीने या तिन्ही देशाचे भारतीय
राजदूत वाय.के.सिन्हा,वेणू राजामोनी, भारताचे उपाआयुक्त अकन बॅनर्जी यांचीही भेट घेऊन
त्याच्याबरोबर चर्चा केली. अभ्यास दौ-याबरोबर समिती सदस्यांनी या तिन्ही देशातील महत्वाच्या
अनेक प्रेक्षणीय स्थळांनाही सदिच्छा भेट दिली व येथील प्रेक्षणिय स्थळांचा मनमुराद
आनंद लुटला.
लंडन,नेदरलँड व फ्रांन्स हा तीन देशाचा
लोकलेखा समिती सदस्यांकरीता राष्ट्रकुल संसदीय मंडळाने आयोजित केलेला दौरा अभ्यासपुर्ण
आणि फलदायी झाला असून या दौ-याबाबत आपण खुप समाधानी असल्याचेही आमदार शंभूराज देसाई
यांनी शेवटी म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment