दौलतनगर दि.२९:- राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांचे
नेतृत्व मानणा-या पिंपळोशी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.विमल ज्ञानदेव निकम यांनी
राष्ट्रवादी पक्षाला जाहिरपणे रामराम ठोकून पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे
नेतृत्व मान्य करीत देसाई गटामध्ये जाहिर प्रवेश केला आहे. प्रवेश करणा-या सरपंच सौ.विमल
ज्ञानदेव निकम व कार्यकर्ते यांचा आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ
देवून सत्कार करण्यात येवून देसाई गटामध्ये स्वागत करण्यात आले.
पिंपळोशी ता.पाटण येथील गावातील स्थानिक राष्ट्रवादी
पक्षाच्या काही कार्यकर्त्यांच्या मनमानी कारभाला कंटाळून ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.निकम
यांनी तालुक्याचे दमदार आमदार शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करण्याचा
आम्ही कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांसमवेत आम्ही देसाई गटामध्ये
प्रवेश करीत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी सरपंच सौ. विमल निकम, ज्ञानदेव निकम, विशाल
जगन्नाथ निकम,अस्लम गणी सय्यद यांनी जाहिरपणे आमदार देसाई गटामध्ये प्रवेश केला. पिंपळोशी
गावच्या सरपंच व ग्रामस्थ यांचे देसाई गटामध्ये सहर्ष स्वागत असून यापुढे पिंपळोशी
गावाच्या विकासासाठी आमदार म्हणून माझे सर्वोत्परी सहकार्य राहील असे आश्वासन आमदार
शंभूराज देसाई यांनी पिंपळोशीच्या सरपंच व ग्रामस्थांना दिले.
No comments:
Post a Comment