दौलतनगर दि.२७:- राज्याचे जलसंपदामंत्री
ना.गिरीश महाजन हे गेली दोन दिवस सातारा,कोल्हापुर जिल्हयाच्या दौ-यावर होते.त्यांनी
विधानसभेतील त्यांचे सहकारी सातारा जिल्हयातील युतीतील पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज
देसाई यांच्या सातारा येथील कोयना दौलत या निवासस्थानी आपल्या कुटुंबिंयासमवेत सदिच्छा
भेट दिली. देसाई कुटुंबिंया कडून ना.महाजन व त्यांचे कुटुंबियांचे यथोचित असे स्वागत
यावेळी करण्यात आले.
बुधवारी रात्री सातारा जिल्हयातील विविध कार्यक्रम
उरकुन पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील पहाणी करुन कोल्हापुर महालक्ष्मीचे दर्शन घेतलेनंतर
कास पठारावरील फुलांची पहाणी करणेकरीता सातारा याठिकाणी गुरुवारी दुपारी ना.गिरीश महाजन
हे त्यांचे कुटुंबियांसमवेत आले होते यावेळी त्यांनी आमदार शंभूराज देसाईंच्या सातारा
येथील कोयना दौलत निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.भेटीकरीता आलेले ना.गिरीश महाजन व त्यांच्या
कुटुंबियांचा प्रारंभी यथोचित असा सत्कार आमदार शंभूराज देसाईंचे चिरंजीव,युवा नेते
यशराज देसाई यांचे हस्ते तसेच त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार सौ.स्मितादेवी देसाई यांच्या
हस्ते मानाची शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला.यावेळी आमदार शंभूराज देसाई
यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच राज्य उत्पादन शुल्क च्या आयुक्त श्रीमती अश्विनी
जोशी यांचीही उपस्थिती होती.
राज्याचे जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन
व आमदार शंभूराज देसाई यांची सन २००४ पासून मैत्री असून २००४ ते २००९ या कालावधीत महाराष्ट्र
विधानमंडळातील लोकलेखा समितीतील विधानसभा सदस्यांचा जम्मूकाश्मीरचा दौरा आयोजीत केला
होता त्यावेळी ना.गिरीश महाजन व आमदार शंभूराज देसाई या दोघांचे कुटुंबिंयही दौ-यामध्ये
सहभागी होवून ते दौ-यावर एकत्रित होते.त्यापासून त्यांचे कौटुंबिक संबध आहेत. सातारा
येथील आमदार शंभूराज देसाई यांचे निवासस्थानी भेट देण्याचा ना.गिरीश महाजन यांचा दौरा
पुर्वनियोजीत होता.यावेळी दोन्ही कुटुंबियांकडून जम्मूकाश्मीर दौ-याच्या जुन्या आठवणींना
उजाळा दिला.देसाई यांच्या निवासस्थानी यथोचित मानसन्मान झालेनंतर ना.गिरीश महाजन व
आमदार शंभूराज देसाई यांनी त्यांच्या कुटुंबिंयासमवेत कास पठाराची पहाणी केली.
No comments:
Post a Comment