दौलतनगर
दि.२९:- उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाच्या हद्दीत असलेल्या
उरुल लघू पाटबंधारे तलावाकरीता भूसंपादन केलेल्या खातेदारांना त्यांच्या भूसंपादनाची
रक्कम मंजुर झाली नसल्याने ल.पा तलावाचे काम ब-याच वर्षापासून रखडले आहे.तालुक्याचे
आमदार शंभूराज देसाईंनी यामध्ये पुढाकार घेवून आपली राजकीय ताकद राज्याचे जलसंधारणमंत्री
यांचेकडे वापरुन गतवर्षी जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे यांचेकडे गतवर्षी पावसाळी अधिवेशनामध्ये
बैठक घेतल्याने खातेदारांच्या भूसंपादनाचा विषय मार्गी लागला असून आमदार शंभूराज देसाईंच्या
सातत्याच्या पाठपुराव्यामुळे उरुल ल.पा तलावातील उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या गांवातील
खातेदारांना एकूण ४ कोटी ५० लाख ८५ हजार ३०१ रुपयांची भूसंपादनाची रक्कम मंजुर झाली
आहे.त्यामुळे लवकरच उरुल लघू पाटबंधारे तलावाच्या कामालाही गती मिळणार आहे.
पाटण तालुक्यातील उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन
गांवाच्या हद्दीत उरुल लघू पाटबंधारे तलाव असून या तलावाचे काम हे या तीन गावातील बाधित
खातेदारांना भूसंपादनाची रक्कम न दिल्यामुळे अनेक वर्षापासून बंद होते व आजही बंद आहे.या
गावातील खातेदारांनी त्यांच्या भूसंपादनाची रक्कम लवकरात लवकर मिळावी याकरीता अनेक
वर्षे प्रयत्न केले मात्र सदरची रक्कम मिळू शकली नाही. प्रयत्न करुनही भूसंपादनाची
रक्कम मिळत नसल्याने या खातेदारांनी तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचेकडे पाठपुरावा
करण्यास सुरुवात केली. आमदार शंभूराज देसाईंनी येथील खातेदारांना बरोबर घेवून राज्याचे
जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे यांचेकडे गतवर्षी या कामांसंदर्भात पावसाळी अधिवेशनामध्ये
दि.०८.०८.२०१७ रोजी बैठक घेतली व या बैठकीत उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या गावातील खातेदारांच्या
भूसंपादनाचा विषय मांडला.यामध्ये उरुलचे एकूण १७.९५ हेक्टर आर क्षेत्र असून ठोमसे ४.५१
हेक्टर आर व बोडकेवाडी १२.२२ हेक्टर आर क्षेत्र आहे.यासंदर्भात अंतिम निवाडा ३०.११.२०१५
रोजी झाला आहे. उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाकरीता अनुक्रमे २ कोटी ९२ लाख १०
हजार ६६२ रुपये, ९४ लाख ७५ हजार ६४६ रुपये व ६३ लाख ९८ हजार ९९३ रुपये असे एकूण ४ कोटी
५० लाख ८५ हजार ३०१ रुपये भूसंपादनाची रक्कम होत आहे.ती ४ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम
तात्काळ देण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार शंभूराज देसाईंनी जलसंधारणमंत्री ना.राम
शिंदे यांचेकडे केल्यानंतर मंत्री ना.शिंदे यांनी यास तात्काळ मान्यता देवून जलसंधारण
विभागाच्या मंत्रालयीन अधिकारी यांना लवकरात लवकर उरुल लघू पाटबंधारे तलावाच्या कामातील
उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाच्या भूसंपादनाची रक्कम तात्काळ मंजुर करुन वाटप
करावी असे आदेश दिले होते.
त्यानुसार उरुल,ठोमसे व
बोडकेवाडी या तीन गांवाच्या भूसंपादनाची रक्कम ही संपादन मंडळाने दि.१२.०९.२०१८ रोजी
भूसंपादन विभाग १६ जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा यांचेकडे वर्ग केली आहे.बरेच वर्षे
रखडलेली भूसंपादनाची रक्कम मंजुर करुन घेतलेबद्दल उरुल,ठोमसे व बोडकेवाडी येथील संपादित
क्षेत्रातील बाधित खातेदारांनी आमदार शंभूराज देसाईंचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत.भूसंपादनाच्या
रक्कमेचे वाटप झालेनंतर लवकरच उरुल ल.पा.तलावाच्या कामांस सुरुवात करण्याकरीता आपण
कटीबध्द असल्याची ग्वाही आमदार शंभूराज देसाईंनी दिली आहे.उरुल लघू पाटबंधारे तलावाची
उंची २०.६० मीटर असून लांबी ६६० मीटर आहे. या तलावामध्ये १९०० स.घ.मी. इतका पाणीसाठा
अपेक्षित असून या तलावामुळे सुमारे २४३ हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. भूसंपादनाच्या
रक्कमेचे वाटप झालेनंतर लवकरच उरुल लघू पाटबंधारे तलावाच्या कामाला गती देण्याची ग्वाही
आमदार शंभूराज देसाईंनी दिली असल्यामुळे या विभागातील शेतक-यामध्ये आनंदाचे वातावरण
आहे.
चौकट:- आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत
शिबीर (कॅम्प) घेवून भूसंपादनाच्या रक्कमेचे वाटप.
संपादित क्षेत्रातील बाधित खातेदारांची
कागदपत्रे, बँक खात्याच्या तपशिलाची पुर्तता करुन ही रक्कम मंजुर करुन आणणेकरीता सातत्याने
पाठपुरावा करणारे आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत तलावाच्या ठिकाणी एकत्रित
शिबीर (कॅम्प) घेवून भूसंपादनाची रक्कम ही ऑनलाईन खातेदारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात
येणार आहे अशी माहिती भूसंपादन विभाग १६ जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा यांचेमार्फत
देण्यात आली आहे.
Congratulations
ReplyDeleteThank you Mr.shambhuraje shivajirao Desai,honourable member of legislative assembly, patan constituency. Dr.sanjaykumar vilasrao Nikam from Muscat, Oman.
ReplyDelete