दौलतनगर दि.२७:- पाटण आणि सातारा तालुक्याच्या
हद्दीवर वसलेल्या पाटण तालुक्यातील वरची केळेवाडी या वाडीस गत अनेक वर्षापासून
बारमाही रस्ताच नसल्याने येथील ग्रामस्थ,महिला आणि युवकांची मोठया प्रमाणात होणारी
गैरसोय लक्षात घेवून पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी युती शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री
ग्रामसडक योजनेमध्ये कडवे खुर्द ते खालची केळेवाडी ते वरची केळेवाडी असा ५ किलोमीटरच्या
रस्त्याकरीता सुमारे ५ कोटी १४ लाख ३४ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिलेबद्दल केळेवाडी
येथील वयोवृध्द ग्रामस्थ व युवकांनी आमदार शंभूराज देसाईंची सदिच्छा भेट घेवून त्यांचे
आभार व्यक्त करीत त्यांचा यथोचित सत्कारही
केला.
पाटण तालुक्यातील तालुक्याचे शेवटचे
टोकावर डोंगरावर वरची केळेवाडी ही वाडी वसलेली असून कडवे खुर्द ग्रामपंचायतीच्या अंतर्गत
ही वाडी येते या वाडीला जाणारा कडवे खुर्द ते खालची केळेवाडी ते वरची केळेवाडी
असा डोंगरातून रस्ता असून तो रस्ता पक्का नसल्याने येथील ग्रामस्थ,महिला आणि युवकांची
मोठया प्रमाणात होणारी गैरसोय या गांवातील रहिवाशी तसेच मुंबई रहिवाशी यांनी लक्षात
घेवून गटातटाचे
राजकारण केल्यास आपला रस्ता कधीच होणार नाही याकरीता गटातटाचे राजकारण बाजूला ठेवत
एकी साधली व आपल्या आजूबाजूचे मोठमोठे रस्ते तालुक्याचे आमदार शंभूराज
देसाईंनी केले तेच आपला रस्ता करु शकतात आपल्या गावाचा रस्ता कोणत्याही परिस्थितीत करायचाच या
ध्येयाने प्रेरित होऊन या वाडीतील युवकांनी तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई
यांचेकडे आपली कैफियत मांडून पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांच्या व युवकांच्या एक
ते दोन भेटीतच आमदार शंभूराज देसाईंनी आपले आद्य कर्तव्य समजून रस्त्याची लांबी जास्त
आहे सदरचा रस्ता करणेकरीता जादा निधीची गरज भासणार आहे परंतू काळजी करु नका तुमचा रस्ता
कुठल्याही परिस्थितीत यंदाच्या वर्षीच करुन देणार असा शब्द देवून सदरच्या कडवे
खुर्द ते खालची केळेवाडी ते वरची केळेवाडी या रस्त्याचा समावेश युती शासनाने सुरु केलेल्या
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये सन २०१८-१९ मधील आराखडयात केला व या रस्त्याच्या कामांस
मंजुरी घेतली. या रस्त्याच्या कामांस आमदार शंभूराज देसाईंनी या योजनेतंर्गत सुमारे
५ कोटी १४ लाख ३४ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे. वरची केळेवाडी ही वाडी ७०
घरांची असून वाडीची ४५० इतकी लोकसंख्या आहे. ४५० लोकसंख्येकरीता सुमारे
५ कोटी १४ लाख ३४ हजार रुपयांचा निधी देणारे आमदार शंभूराज देसाई हे पहिलेच आमदार असून
पाच कोटी रुपयांचा निधी म्हणजे आमदारांचा अडीच वर्षाचा आमदार निधी एवढा मोठा निधी एका
वाढीकरीता देवून आमची रस्त्याची कैफियत दुर केलीत आमदारसाहेब आमी काय, आमच्या पुढच्या
पिढयाही तुमच्याच सोबत राहणार असून आपले आद्य कर्तव्य असले तरी आमच्यावर आपले न फिटणारे ऋृण
आहे असा शब्दच उपस्थित वयोवृध्दांनी आमदार शंभूराज देसाईंना देत
रस्त्याच्या कामांचा निधी मंजुरीचा शासन निर्णय आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते स्विकारत
वयोवृध्द ग्रामस्थ व युवकांनी आमदार शंभूराज देसाईंची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा यथोचित सत्कार
केला.
चौकट:- पाटणकरांकडे बांधकाम मंत्री असताना ४० ते ५० वेळा हेलपाटे मारुनही रस्ता नाही,
तुम्ही नुसते आमदार आहात तर आमचा
रस्ता दिला. वयोवृध्दांनी केले कौतुक.
आमच्या वरची केळेवाडी या वाडीस
बारमाही रस्ता करा याकरीता वाडीतील आम्ही वयोवृध्द नागरिक बायका पोरांसह माजी आमदारांकडे
ते राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री असताना चाळीस ते पन्नास वेळा कैफियत मांडायला
गेलो होतो.माजी बांधकाम मंत्र्याकडे चाळीस ते पन्नास वेळा हेलपाटे घालून,पाठपुरावा
करुनही आमचे रस्त्याचे काम माजी बांधकाम मंत्र्यांच्याकडून झाले नाही.आमदारसाहेब,तुम्ही नुसते आमदार
आहात आमची कैफियत तुम्ही एैकली आणि दुस-याच भेटीत आमच्या रस्त्याला निधी मंजुर केल्याचे
पत्र आपण आम्हाला दिले. आम्ही वयोवृध्द नागरिक भरुन पावलो.वयोवृध्द नागरिकांनी असे
सांगून आमदार शंभूराज देसाईंच्या कामांचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment