Monday 30 September 2019

शंभूराज देसाईंना इतक्या भरघोस मताधिक्क्याने विजयी करा की,विरोधकांचे पुन्हा आमदारकी लढविण्याचे धाडस झाले नाही पाहिजे. सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे पाटण तालुका मुंबई रहिवाशींना आवाहन.



           
               दौलतनगर दि.२९:- आमदार शंभूराज देसाई हे करारी माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू आहेत लोकप्रतिनिधी कसा असावा,आमदार कसा असावा तर तो आमदार शंभूराज देसाईंसारखा,आमदार शंभूराज देसाईंचे विधानसभेतील आणि विधानसभेच्या बाहेरील कार्य मी जवळून पाहिले आहे.आपल्या मतदारसंघातील कामांकरीता राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून राज्याच्या सचिव,उपसचिवापर्यंत सातत्याने शासनाकडे स्वत: फाईली हातात घेवून पाठपुरावा करणारे आणि आमदारकीच्या पाहिल्याच टर्ममध्ये उत्कृष्ट संसदपटू आमदार म्हणून सन्मान झालेले आमदार पाटण विधानसभा मतदारसंघाला मिळाले आहेत हा मतदारसंघाचा अभिमान आणि स्वाभिमान आहे. आज याठिकाणी जमलेल्या गर्दीने शंभूराज देसाई हे आमदारकीची हॅट्रीक करणार हे नक्की झाले असून आमदार शंभूराज देसाईंना इतक्या भरघोस मताधिक्कयाने पुन्हा विजयी करा, त्यांचा विजय पाहून विरोधकांनी पुन्हा आमदारकी लढविण्याचे धाडस केले नाही पाहिजे असे जाहीर आवाहन राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे केले.
                कोपरखैरणे नवी मुंबई येथील शेतकरी समाज हॉल याठिकाणी आमदार शंभूराज देसाईंच्या प्रचारार्थ पाटण तालुका मुंबई रहिवाशींचा महाविजय जाहिर मेळावा राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष ना.नरेंद्र पाटील,आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले.
                   यावेळी बोलताना सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे म्हणाले,आज याठिकाणी पाटण तालुका मुंबई रहिवाशींची गर्दी पाहून येणाऱ्या २४ तारखेला पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे तिसऱ्यांदा आमदार होवून हॅट्रीक मारणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही.मी त्यांना आताच तिसऱ्यांदा आमदार होणार याच्या शुभेच्छा देतो. आमदार शंभूराज देसाई हे मतदारसंघातील जनतेशी नाळ जोडलेले,जनतेची कणव असणारे आमदार आहेत.लोकप्रतिनिधी आणि आपला आमदार कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे शंभूराज आहेत.लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने दिलेली जबाबदारी कशी पार पाडावी याची शिकवण त्यांना त्यांच्या आजोबांकडून मिळाली आहे.पाटण मतदारसंघात त्यांनी १८०६ कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन नेला याचे कौतुक करावे एवढे थोडेच आहे.त्यांचे कौतुक तर केलेच पाहिजे कारण त्यांनी आमदार म्हणून आपल्या तालुक्यातील गांवागांवात विकासकामे पोहचविण्याचे काम केले आहे.एक तडफदार आमदार म्हणून त्यांचे विधानसभेतील कामकाज वाखणण्याजोगे आहे.अनेकदा त्यांना विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणूनही निवड झाली तेव्हा त्यांनी संसदीय कामकाजाला कुठेही धक्का लागणार नाही याची दक्षता घेत विधानसभेचे कामकाज चालविले शिवसेना पक्षाची बाजू सभागृहात योग्य प्रकारे मांडण्याची भूमिका शंभूराज देसाई पार पडतात म्हणूनच शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी त्यांच्यावर विधानसभेतील पक्षप्रतोदाची जबाबदारी दिली ती त्यांनी लिलया पेलली.शिवसेना पक्षात प्रत्येकाच्या कामकाजाची कदर केली जाते. आपल्या आमदारांचे कामच एवढे मोठे आहे त्यांचे काम पाहून पक्षप्रमुखांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी दयावी याकरीता माझ्या त्यांना सदिच्छा आहेत.एकाच जिल्हयातील असून मी कायम शंभूराज यांचेशी पाठीशी ठाम आहे.परंतू आपल्याला गाफील राहून चालणार नाही विरोधकांना कायमचा धडा शिकवायचा असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आपण याठिकाणचे मतदारांनी जबाबदारीने गांवाकडे जावून मतदान करणे आवश्यक आहे माझे तर आपणां सर्वांना आवाहन आहे की,आमदार शंभूराज देसाईंना इतक्या भरघोस मताधिक्कयाने पुन्हा विजयी करा की, विरोधकांनी पुन्हा आमदारकी लढविण्याचे धाडसच केले नाही पाहिजे असे त्यांनी शेवठी सांगितले.
               याप्रसंगी बोलताना ना.नरेंद्र पाटील यांनी आमदार शंभूराज देसाई हे सातारा जिल्हयातील पाटण विधानसभा मतदारसंघाचे तडफदार आमदार आहेत. सातारा जिल्हयात सर्वांधिक निधी पाटण विधानसभा मतदारसंघात त्यांनी आणला आहे याचा अनुभव मी स्वत: लोकसभेची निवडणूक लढताना घेतला आहे.प्रत्येक गाववस्तीवर त्यांनी या पाच वर्षात विविध विकासकामे केली आहेत.जी विरोधकांना जमली नाहीत.कामासाठी विधानसभेत भांडणारा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे म्हणूनच मतदारसंघाचा कायापालट करण्यात त्यांना यश मिळाले आहे.लोकसभेच्या निवडणूकीत मला सर्वाधिक मताधिक्कय आमदार शंभूराज देसाईंनी मिळवून दिले आहे आता विधानसभा निवडणूकीत जास्तीचे सर्वाधिक मताधिक्कय देण्याची जबाबदारी माझी आहे.
               यावेळी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,ज्या विश्वासाने २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत मला चांगले मताधिक्कय देवून आपण सर्वांनी मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्या संधीचे सोने करण्याचे काम मी पाच वर्षात केले. जनतेच्या भरघोस पाठींबामुळेच मतदारसंघात न होणारी अनेक कामे करण्याकरीता तसेच प्रलंबीत अनेक कामांना मला भरघोस असा १८०६ कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणता आला. आपण प्रत्येकजण याचे साक्षीदार आहात. येणारी निवडणूक ही आपण विकासकामांच्या मुद्दावरच लढणार असून याकरीता मला आपणा सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. विरोधकांकडे बोलण्यासारखे काही नाही त्यामुळे केवळ दिशाभूल करण्याचा उद्योग त्यांच्याकडून सुरु असून याकडे कुणीही लक्ष न देता आपल्या गावाच्या, वाडीच्या विकासाकरीता काम करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे आपण खंबीरपणे उभे रहावे  पाटण तालुका मुंबई रहिवाशी यांचे माझेवर किती प्रेम, माया आहे याचा प्रत्यय आज या मेळाव्याला जमलेल्या गर्दीवरुन लक्षात आले. आपला पाठींबा असाच मला मिळावा अशी मी आपणांकडे अपेक्षा व्यक्त करतो.असे आमदार शंभूराज देसाई शेवठी म्हणाले.उपस्थितांचे स्वागत पंचायत समितीचे माजी उपसभापती डी.आर.पाटील यांनी केले.याप्रसंगी सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख जयंवतराव शेलार, नगरसेविका दमयंती आचरे यांची भाषणे झाली.
चौकट:- आमदार शंभूराज देसाईंची मुंबईची उंच्चाकी सभा, मुंबई रहिवाशींचा उत्स्फुर्त प्रतिसाद.
            पाटण तालुका मुंबईकर रहिवाशी बंधू भगिनींनो मी येतोय आपल्या भेटीला, आपल्याशी संवाद साधायला असे आवाहन करणारे  आमदार शंभूराज देसाईंची कोपरखैरणे नवी मुंबई येथील महाविजय संकल्प सभा मोठया उत्साहात आणि उच्चांकी गर्दीने पार पडली, मुंबई रहिवाशींना उत्स्फुर्त प्रतिसाद देत आम्ही मुंबईकर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशीच ग्वाही आमदार देसाईंना दिली.शेतकरी समाज हॉलमध्ये आयोजीत सभेस मोठया प्रमाणात उच्चांकी गर्दी झाल्याने वेळप्रसंगी कार्यकर्त्यांनी हॉलच्या मोकळया जागेत बसून,उभे राहून लावण्यात आलेल्या स्क्रीनच्या माध्यमातून संपुर्ण सभा एैकली. या उच्चांकी गर्दीमुळे पाटण तालुका मुंबई रहिवाशी यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment