दौलतनगर
दि.०५ :- दि.२१ ऑक्टोंबर रोजी पाटण तालुक्यातील दिवशी
बु// याठिकाणी आपल्या आजोबाबरोबर शेतात गेलेला ॠषीकेश संदीप थोरात हा ५ वर्षाचा
मुलगा ओढयाला मोठया प्रमाणात पाणी आल्याने हात निसटून वाहून गेल्यांने मृत
झाल्याने त्याचे कुटुबिंयाना आमदार शंभूराज देसाईंच्या प्रयत्नामुळे एकूण ०४ लक्ष
रुपयांची मदत शासनामार्फत मंजुर झाली असून या मदतीचा धनादेश आज आमदार शंभूराज
देसाईंच्या हस्ते ॠषीकेश थोरात यांचे वडील संदीप,त्याचे आजोबा,आज्जी यांना देण्यात
आला यावेळी तहसिलदार रवींद्र माने,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे यांची
प्रमुख उपस्थिती होती.
दि.२० ऑक्टोंबर रोजी
पाटण विधानसभा मतदारसंघात मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमध्ये ओढयांना पाणी आले होते पाटण
तालुक्यातील दिवशी बु// येथील ॠषीकेश
संदीप थोरात हा ५ वर्षाचा मुलगा आपल्या आजोबाबरोबर शेतात गेला असताना त्याचा हात निसटून
तो मोठया प्रमाणात पाणी आलेल्या मारुती नावाच्या ओढयात वाहून जावून मृत झाला
होता.मृत ॠषीकेश संदीप थोरात याच्या कुटुंबियांची तालुक्याचे आमदार शंभूराज
देसाईंनी तात्काळ भेट घेवून या कुटुंबिंयाना शासनामार्फत तातडीची मदत मिळवून दिली
जाईल असे आश्वासन देवून पाटणचे तहसिलदार रवींद्र माने यांना थोरात कुटुंबिंयाना
शासनाकडून तातडीचे मदत मिळवून देणेकरीताचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे सादर
करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्यानुसार आमदार शंभूराज देसाईंच्या विशेष
प्रयत्नामुळे ॠषीकेश संदीप थोरात या मृत पाच वर्षाच्या थोरात कुटंबिंयाना शासनाने
०४ लक्ष रुपयांची तातडीची मदत मंजुर केली ही मदत आज आमदार शंभूराज देसाईंच्या
हस्ते थोरात कुटुंबियांना त्यांच्या दिवशी बु// ता. पाटण येथील घरी जावून आमदार
शंभूराज देसाईंनी दिली यावेळी दादासो जाधव यांच्यासह दिवशी बु// गावातील
ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती होती.
चौकट:- १५ च दिवसात आमदार
शंभूराज देसाईंनी केली मदत मंजुर.
दि.२१ ऑक्टोंबर रोजी दिवशी बु//
येथील ॠषीकेश संदीप थोरात हा ५ वर्षाचा मुलगा ओढयात वाहून जावून मृत झाल्याची
बातमी समजताच पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी मृत ॠषीकेश याच्या कुटुंबियांची
आचारसंहिता असताना देखील भेट घेवून या कुटुंबाला शासनाकडून तातडीची मदत मिळवून
देण्याचे आश्वासित केले होते. त्यानुसार तहसिलदार पाटण यांच्या मार्फत शासनाकडे
प्रस्ताव सादर करुन १५ च दिवसात आमदार शंभूराज देसाईंनी या थोरात कुटुबियांना ०४
लक्ष रुपयांची मदत मंजुर करुन दिली.
No comments:
Post a Comment