दौलतनगर दि.15 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-पाटण तालुक्यातील
मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या मल्हारपेठ ता.पाटण येथील पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन
करुन याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन करण्याच्या अनेक
वर्षांच्या मागणीला
राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दि.07 ऑक्टोंबर, 2020 रोजी मंजुरी मिळवत याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन व
निवासस्थान इमारतीची प्रक्रिया सुरु केली केवळ दोन महिन्यातच ना.शंभूराज
देसाईंच्या पुढाकाराने नवीन पोलीस स्टेशन व निवासस्थान इमारतीची 19.23 कोटींची
निविदाही महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ,मुंबई यांनी दि.08
डिसेंबर,2020 रोजी प्रसिध्द केली असून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी बोलले
ते करुन दाखविले आहे.
पाटण
तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस औटपोस्टचे
अपग्रेडेशन करुन याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन करण्याची अनेक वर्षांची मागणी होती. ना.शंभूराज देसाईंनी गृहराज्यमंत्री
झाल्या झाल्या अनेक वर्षाच्या या मागणीला मुहुर्तस्वरुप देत त्यांनी व्यक्तीश:
पुढाकार घेत महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाकडून मान्यता घेतली यासंदर्भात राज्य
शासनाचे गृहविभागाने मंजूरी दिल्याचा शासन निर्णयही दि.
07 ऑक्टोंबर, 2020 रोजी पारित केला. नवीन पोलीस स्टेशनची मान्यता
मिळालेनंतर ना.शंभूराज देसाईंनी यास गती देत याठिकाणी
नवीन पोलीस स्टेशन व निवासस्थान इमारतीची प्रक्रिया सुरु केली आणि केवळ दोन
महिन्यातच पोलीस स्टेशन व निवासस्थान इमारत बांधकामांची निविदाही महाराष्ट्र राज्य
पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ,मुंबई यांचेवतीने प्रसिध्द करण्यात आली आहे.
मल्हारपेठ नवीन पोलीस स्टेशन व
निवासस्थान इमारतीच्या बांधकामांमध्ये खालील बाबींचा समावेश असून 19.23 कोटीं रुपयांच्या निविदेमध्ये
जी पल्स वन अशाप्रकारे पोलीस स्टेशनची 10 हजार चौ.फुटाची इमारत उभारण्यात येणार आहे
तसेच पोलीस कर्मचारी यांच्याकरीता 28 हजार चौ.फुट 500 चौ.फुटप्रमाणे 56 निवासस्थाने
तसेच पोलीस अधिकारी यांच्याकरीता 5 हजार चौ.फुटाचे 04 निवासस्थाने असे एकूण 43 हजार
चौ.फुटाचे बांधकाम करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर याठिकाणी आवश्यक असणाऱ्या पायाभूत
सुविधांचाही या निविदेमध्ये समावेश करण्यात आला आहे.संरक्षक भिंत (वॉल कंमपाँड), बागबगीचा,
लॅन्डस्केंपिंग इत्यादी बाबी करण्यात येणार आहेत. मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ,मुंबई यांचे
या बांधकामावर नियंत्रण राहणार आहे.
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या विशेष प्रयत्नामुळे
पाटण तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नवीन
पोलीस स्टेशन व निवासस्थानाची देखणी इमारत उभी राहणार असून या इमारतीमुळे
मल्हारपेठ व विशेष करुन पाटण तालुक्याच्या वैभवात भर पडणार आहे. सदरचे नवीन पोलीस
स्टेशनला मंजुरी व आता नवीन पोलीस स्टेशन व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे
निवासस्थान इमारत उभारण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा सातत्याचा
पाठपुरावा असल्याने हे सर्व शक्य झाले आहे.याचा या विभागातील नागरिकांना अभिमान
असून या प्रकल्पाबाबत या विभागातील नागरिकांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे विशेष आभार
व्यक्त केले आहेत.
चौकट:- राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी
ठाकरे यांचे शुभहस्ते होणार या प्रकल्पाचे
भूमिपुजन.
येत्या महिन्याभरात
मल्हारपेठ नवीन पोलीस स्टेशन व
पोलीस अधिकारी,कर्मचारी यांचे निवासस्थानाच्या बांधकामाची सर्व निविदा प्रक्रिया
पुर्ण करुन घेण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट कमी होताच राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब
यांचे शुभहस्ते या प्रकल्पाचे भूमिपुजन करण्याचा मानस गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी
व्यक्त केला आहे.