Friday 13 November 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे पाठपुराव्यामुळे वांग मराठवाडी धरणप्रकल्पग्रस्तांची दिवाळी गोड. 09 गांवातील प्रकल्पग्रस्तांना उदरनिर्वाहाची 6 कोटी 60 लाखांची रक्कम अदा.

 



              ढेबेवाडी प्रतिनिधी दि.13 :- कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत वांग मराठवाडी धरण प्रकल्पातील 09 गांवातील प्रकल्पग्रस्तांना अनेक वर्षापासून उदरनिर्वाह भत्ता मिळणे बाकी होते. मागील पंचवार्षिकमध्ये आमदार असताना मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश आले असून ना.शंभूराज देसाईंच्या पाठपुराव्यामुळे वांग मराठवाडी धरणप्रकल्पातील 09 गांवातील प्रकल्पग्रस्तांची दिवाळी गोड झाली आहे. या 09 गांवातील प्रकल्पग्रस्तांना दिवाळीपुर्वी त्यांची उर्वरीत राहिलेली उदरनिर्वाहाची 06 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम सातारा लघू पाटबंधारे विभागाकडून अदा करण्यात आली आहे.

               पाटण विधानसभा मतदारसंघातील कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत वांग मध्यम धरण प्रकल्पात ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमीन पाण्याखाली बूडाल्या आहेत.धरणासाठी ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीतील माती उचलण्यात आली आहे तसेच ज्या प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप केले नाही.अशा सर्व प्रकल्पग्रस्तांना प्रतिमहा रु.400 या दराने उदरनिर्वाह भत्त्याचे वाटप होणे प्रलंबीत होते.या 09 गांवातील सर्व प्रकल्पग्रस्तांना त्यांचे उर्वरीत राहिलेले उदरनिर्वाह भत्त्याचे वाटप तात्काळ करावे याकरीता शंभूराज देसाई हे मागील पंचवार्षिकमध्ये आमदार असताना शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते.

                      त्यांच्या पाठपुराव्याला मंत्री झालेनंतर यश प्राप्त झाले असून ना.शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे शासनाने वांग मध्यम धरण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना  रु. 400 प्रतिमाह या दराने उदरनिर्वाह भत्त्याचे वाटप तात्काळ करण्याचे आदेश निर्गमित केले त्यानुसार या प्रकल्पातील 09 गांवातील  बाधित प्रकल्पग्रस्तांना अनुक्रमे मौजे उमरकांचन 446, मेंढ 314, घोटील कोतीज 57, घोटील ताईगडेवाडी 228, मराठवाडी 111, जाधववाडी 82, जिंती 131, निगडे 39, मेंढ केकतवाडी 26 अशा एकूण 1434 खातेदारांना 06 कोटी 59 लाख 53 हजार 335 रुपये रक्कमेचे वाटप सातारा लघू पाटबंधारे विभागाकडून दिवाळीपुर्वी करण्यात आले आहे.वांग मराठवाडी धरण प्रकल्पातील बाधित प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाह भत्त्याचा अनेक वर्षापासून प्रलंबीत असणारा प्रश्न तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या विशेष पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्यामुळे आमची यंदाची दिवाळी गोड झाली असल्याच्या प्रतिक्रिया या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांनी दिल्या असून उदरनिर्वाह भत्ता मिळालेल्या या 09 गांवातील सर्व प्रकल्पग्रस्तांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई व शासनाचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

1 comment: