दौलतनगर दि.06 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- केवळ
ऊसाचे गाळप करुन साखर
कारखाने चालविणे आता साखर
कारखान्यांना अडचणीचे झाले आहे. केंद्राने
एफआरपीचा कायदा बंधनकारक केला
आहे.
साखरेचे बाजारातील दर हे 3100 रुपये
आहेत.आपले कारखान्याला यंदाच्या
गळीत हंगामामध्ये 2807 रुपये एफआरपी
बसत आहे. 2800 रु.एफआरपी धरल्यास
कसरत करुन उत्पादन व व्यवस्थापन खर्च 300 रुपयांमध्ये भागवावा
लागणार आहे. मागील गळीत
हंगामात कार्यक्षेत्रातील सुमारे 01 लाख 20 हजार
टन ऊस बाहेरच्या कारखान्यांना
गेला. बाहेरच्या कारखान्यांच्या बरोबरीने
आपण एफआरपीची रक्कम ऊस उत्पादकांना
दिली आहे व देत
आहोत असे प्रतिपादन राज्याचे
गृहराज्यमंत्री व लोकनेते बाळासाहेब
देसाई उद्योग समुहाचे मार्गदर्शक
ना.शंभूराज
देसाईंनी केले असून यंदाच्या
वर्षी कार्यक्षेत्रातील सर्व
ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांनी देसाई
कारखान्यांस घालावा असे आवाहन
त्यांनी केले आहे.
दौलतनगर
ता.पाटण
येथील लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी साखर कारखान्याचा 47 व्या गळीत
हंगामाचा शुभारंभ राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाई यांच्या शुभहस्ते,युवा नेते
यशराजदादा देसाई व मोरणा
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज
देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत
शुक्रवारी पार पडला.याप्रसंगी कारखान्याचे
चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन
डॉ.दिलीपराव
चव्हाण,जयराज देसाई, कारखान्याचे व्हा.चेअरमन राजाराम
पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मंदाकिनी राजाराम पाटील व कारखान्याचे
सर्व संचालक मंडळ यांची
प्रमुख उपस्थिती होती.
याप्रंसगी
बोलताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाई म्हणाले,ज्येष्ठ सभासदांच्या
हस्ते आपण प्रतिवर्षी गळीत
हंगामाचा शुभारंभ करीत असतो
परंतू कोरोना महामारी,पुणे पदवीधर
निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर यंदाच्या
वर्षीचा गळीत हंगाम आपण
साध्या पध्दतीने करीत आहोत.साखर उद्योग प्रतिकूल परिस्थितीतून
वाटचाल करीत आहे. राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखाने आर्थिक विवंचनेत
सापडले आहेत. देशात साखर उत्पादन करणारी संख्या 20
टक्के आणि साखर
खाणाऱ्यांची संख्या 80 टक्के आहे.कोणतेही सरकार सत्तेत आले तरी साखर दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न
केला जातो.सहकारी साखर कारखान्यांनी उपपदार्थाकडे गेले पाहिजे इथेनॉल
प्रकल्प उभारण्यासाठी ज्या सवलती राज्य
शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देता येतील त्या सवलती देण्याच्या सुचना
मागील 15 दिवसापुर्वी देशाचे माजी कृषी मंत्री व साखर उद्योगाचा गाढा
अभ्यास असणारे शरदचंद्रजी पवार साहेब यांचेबरोबर राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.वळसे पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत कारखान्यांची आर्थिक क्षमता
पाहून साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प उभारण्याचे सुचित करण्यात आले.आपल्याही कारखान्याची आर्थिक क्षमता
इथेनॉल प्रकल्प उभारण्याची आहे.
याकरीता
राज्याचा वाटाही आपल्याला मिळेल.यासंदर्भात राज्य बँकेच्या वरीष्ठांशी माझी चर्चा देखील
झाली परंतू आपल्याकडे साखर कारखाना लहान असल्यामुळे 8
हजार ते 10
हजार टन
मोलॅासिस उपलब्ध होते. त्याकरीता वाढीव मोलॉसिसची गरज आहे.किमान गळीत हंगामात पाच लाख टन ऊसाचे
गाळप आपल्याकडे होणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रातील ऊसक्षेत्र
वाढविण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरु आहे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या
तारळी,मोरणा
गुरेघर व वांग मराठवाडी धरण प्रकल्पांमध्ये सुधारणा करुन लवादयाप्रमाणे वाढीव
क्षेत्राला पाणी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे.तारळे प्रकल्पांच्या कामांस मंजुरी
मिळाली आहे. मोरणा गुरेघरच्या कामांस सुधारित मान्यता घेण्याचे काम सुरु
आहे.असे
सांगून ते म्हणाले,आपल्या कारखान्याला केंद्राकडून 10.34
कोटी येणे बाकी
आहे. ही
रक्कम एक किंवा दोन टप्पयामध्ये आपल्याला मिळाली तर यातून कारखान्यांची आणखीन
सुधारणा आपल्याला करता येईल. आपलेपणाने कारखान्याकडे पाहणे गरजेचे
असून पिकवलेला सर्व ऊस आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी देसाई कारखान्याला
घालून यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यास मदत करावी असेही ते शेवठी म्हणाले.
याप्रसंगी
बोलताना युवानेते यशराजदादा देसाईंनी
अभ्यासपुर्ण कारखान्यांच्या कामकाजासंदर्भात मांडणी करीत म्हणाले, कारखान्याच्या सन 2020-21 या गळीत
हंगामासाठी नोंदविलेल्या संपुर्ण
ऊसाचे गाळप पुर्ण करण्याच्या
दृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेची
तसेच कारखाना व्यवस्थापनाची पुर्वतयारी
झाली आहे. कारखान्याची ओव्हर
ऑइलिंगची कामे त्याचबरोबर मशिनरीमधील
आवश्यक त्या दुरुस्तीची व सुधारण्याची
कामे पुर्ण झालेली आहेत. कारखान्यामध्ये आपण बहूतांशी प्रमाणात सुधारणा केलेल्या आहेत.याचा फायदा यंदाच्या गळीत हंगामामध्ये
आपल्याला होईल.गत गळीत हंगामाची एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना
आपण पूर्णपणे दिली आहे. यंदाचा गळीत हंगाम मागील हंगामाप्रमाणे यशस्वी करण्याचे
आमचे नियोजन पुर्ण झाले आहे. आजपासूनच आपण कारखाना सुरु करीत आहोत.
कार्यक्रमाचे प्रस्तावित कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील
यांनी केली व उपस्थित्यांचे आभार संचालक गजानन जाधव यांनी मानले.
दरम्यान कोरोना
विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी
आवश्यक ती सर्व दक्षता
घेवून तसेच सामाजिक अंतराचे
पालन करुन गळीत हंगामाचा
शुभारंभ करण्यात आला.
All the best
ReplyDeleteAll the best
ReplyDeleteAll the best
ReplyDeleteAll the best
ReplyDelete