यंदाच्या
दिवाळीत खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत जातांना प्रत्येकाने दक्षता घ्यावी. सामाजिक
अंतर ठेवावे. कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी प्रत्येकाने तोंडावर मास्क
लावावे. कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर हाताला सॅनीटायझर लावावे किंवा हात
साबणाने स्वच्छ धुवावे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोना पूर्णपणे गेलेला
नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने दक्ष राहून
प्रत्यक्ष भेटीगाठी न घेता समाज माध्यमातून शुभेच्छा संदेश द्यावे.कुठेही गर्दी
होणार नाही याबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे प्रत्येकाने पालन करावे. ही दिवाळी घरगुती स्वरूपात
मर्यादित राहील, याची पूर्ण दक्षता घ्यावी.
दिवाळी हा सण
दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या उत्सवात दरवर्षी
मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. यावर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त
साजरी करतांना फटाके फोडणे टाळावे.फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट
परिणाम श्वसनावर होतो.त्यामुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे ही दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करतांना दिव्यांची आरास करून हा उत्सव
साजरा करावा, असे आवाहनही शेवटी गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई केले असून
त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वांना व सातारा जिल्हावासियांना दिपवाळीच्या
हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
my blessing wishes always with you in your social work...!
ReplyDelete