दौलतनगर दि.07 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री
कार्यालय):- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर
राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे दि.17 नोव्हेंबरचा वाढदिवस साजरा करणार
नाहीत.त्यांचे वाढदिवसानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामार्फत
सामाजिक विविध उपक्रम राबविणार आहेत.प्रामुख्याने ना.शंभूराज देसाईंचे वाढदिवसानिमित्त
शिवसेना पक्षाच्या वतीने राबविण्यात आलेल्या शिवसेना सदस्य नोंदणी या उपक्रमात पाटण
मतदारसंघातून 01 लाख शिवसेना सदस्य नोंदणीची अनोखी भेट शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे
मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांना देण्याचे उदिष्ट ठरविण्यात आले आहे.गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई हे दि.17 नोव्हेंबर रोजी वाढदिवसानिमित्त कुटुंबियांसमवेत बाहेरगांवी
जाणार असल्याची पाटण विधानसभा मतदारसंघातील तसेच ना.शंभूराज देसाईप्रेमी जनतेने नोंद
घ्यावी असे ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयामार्फत प्रसिध्दीस देण्यात आले आहे.
राज्याचे विद्यमान
गृहराज्यमंत्री व पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय जनमाणसातील आमदार ना.शंभूराज
देसाई यांचा दि.17 नोव्हेंबर रोजीचा वाढदिवस हा पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेकरीता
उत्साहाचा,प्रेरणेचा आणि जल्लोषाचा दिवस म्हणून पाटण मतदारसंघात प्रतिवर्षी साजरा होतो.
प्रतिवर्षी ना.शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त पाटण मतदारसंघातील जनतेची जाहीर
सभा कारखाना कार्यस्थळावर आयोजीत केली जाते या जाहीर सभेतून पुढील वर्षापर्यंत पाटण
विधानसभा मतदारसंघात कोणकोणते उपक्रम तसेच मतदारसंघातील जनतेच्या हितार्थ कोणत्या योजना
राबवायचा याचा एक संदेश आणि आदेश कार्यकर्ते व पदाधिकारी यांना ना.शंभूराज देसाईंच्या
माध्यमातून मिळत असतो. यंदाच्या वर्षी संपुर्ण देशावर आणि आपले महाराष्ट्र राज्यावर
कोरोना महामारीचे संकट कोसळले असल्यामुळे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी दि.17
नोव्हेंबरचा त्यांचा 54 वा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून वाढदिवसानिमित्त कुटुंबियांसमवेत बाहेरगांवी जाणार
आहेत.
शिवसेना पक्षाच्या
वतीने महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना सदस्य नोंदणी करण्याचा उपक्रम राबविण्यास सुरुवात
केली आहे.सातारा जिल्हयाकरीता 03 लाख शिवसेना सदस्य नोंदणीचे उदिष्ट देण्यात आले आहे.
त्यातील 01 लाख शिवसेना सदस्यांची नोंदणी एका पाटण विधानसभा मतदारसंघात गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त करुन 01 लाख शिवसेना सदस्य नोंदणीचे
फॉर्म दि.17 नोव्हेंबर रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख यांचेमार्फत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय,
मुंबईकडे बहाल करण्यात येणार आहेत. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या वाढदिवसानिमित्त
01 लाख शिवसेना सदस्य नोंदणी करुन एक अनोखी भेट
शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांना देण्याचे
ना.शंभूराज देसाईंचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी ठरविले असल्याचेही पत्रकात म्हंटले
आहे.
ग्रेट
ReplyDeleteGreat
ReplyDeleteGreat
ReplyDelete