Wednesday, 29 January 2020

गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई जनतेच्या दरबारी. मतदारसंघात आलेनंतर विभागा-विभागामध्ये जावून जनतेच्या प्रश्नांची करत आहेत सोडवणूक.




            दौलतनगर दि.28 :- महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्री झालेनंतर मतदारसंघात सत्कार किंवा स्वागत समारंभांना वेळ न देता मंत्रालयीन कामकाज संपवुन मतदारसंघात आलेनंतर विभागा-विभागामध्ये जावून जनतेच्या भेटी-गाठी घेत जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.मागील आठवडयात त्यांनी तारळे व कालच ढेबेवाडी विभागात जावून जनतेच्या भेटी गाठी घेत जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली.राज्यमंत्री म्हणून राज्यभर वावरताना मतदारसंघातील जनतेची असणारी नाळ त्यांनी कायम ठेवली असून त्यांच्या या उपक्रमाचे पाटण मतदारसंघातील जनतेकडून कौतुक  केले जात आहे.
                              अलर्ट आमदार म्हणून ख्याती असणारे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई आता अलर्ट नामदार म्हणून ओळखले जावू लागले आहेत. राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेनंतर मंत्रालयीन कामकाजाबरोबर शासकीय बैठका, वाशिम जिल्हयाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर तेथील शासकीय बैठका, तेथील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठका घेवून त्यांच्या असणाऱ्या समस्या मार्गी लावणे याचबरोबर सातारा जिल्हयातील शासकीय बैठकांना उपस्थिती व जिल्हयातील पक्षसंघटना वाढीसाठी पक्षाच्या पदाधिकारी व शिवसेना पक्षाचे  कार्यकर्ते यांच्या बैठका घेण्याकरीता वेळ देण्याबरोबर त्यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेचेही प्रश्न सोडविण्या करीता मोठया प्रमाणात वेळ देत आहेत.मुंबईहून मंत्रालयीन कामकाज उरकल्यानंतर थेट मतदारसंघ गाठणारे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे विभागा-विभागामध्ये जावून मतदारसंघातील जनतेला वेळ देत आहेत त्यांच्या समस्या समजून घेवून जागेवरुनच संबधित अधिकाऱ्यांना सुचना देत संबधित जनतेचे प्रश्न मार्गी लावत आहेत. मागील आठवडयामध्ये त्यांनी तारळे विभागातील तर काल ढेबेवाडी विभागातील जनतेच्या त्या त्या विभागात जावून भेटी-गाठी घेतल्या.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई आपल्या भेटीसाठी विभागात येत आहेत म्हणून त्या त्या विभागातील अनेक गांवानी प्रथमत: ना.शंभूराज देसाई यांची राज्यमंत्रीपदी निवड झालेबद्दल त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करीत  आपल्या समस्या त्यांचेपुढे मांडून त्या जागेवरच सोडवूण घेतल्या. ना.शंभूराज देसाईंच्या तारळे आणि ढेबेवाडी विभागातील भेटीमध्ये जनता दरबाराचे स्वरुप पहावयास मिळाले.
                          यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताना शासकीय बैठका, राज्यभरातील दौरे, पक्षवाढीसाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचे नियोजन असले तरी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विविध कामांना न्याय मिळवून देणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नासाठी आठवडयातील दोन तीन दिवस मतदारसंघातच राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. मतदारसंघातील जनतेच्या पाठीब्यांमुळे आपल्याला मंत्रीपद मिळाले आहे त्यांच्याशी असणारी नाळ ही कायम राहिली पाहिजे.आपला हक्काचा आमदार जनतेला पहिल्यांदा उपलब्ध झाला पाहिजे.या भूमिकेतुनच माझी भविष्यातील वाटचाल सुरु राहणार आहे. तुमचा हक्काचा आमदार म्हणून आणि राज्याचा  राज्यमंत्री म्हणून पाटण मतदारसंघातील जनतेला वेळ देवून त्यांच्या समस्या, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याकरीता माझे प्राधान्य राहणार आहे. मी आपल्या भेटीकरीता कायम उपलब्ध आहे परंतू ज्या ज्या वेळी मंत्रालयीन कामकाजाबरोबर, मंत्रालयीन बैठकाकरीता मला मुंबई अथवा मतदारसंघाबाहेर उपस्थित रहावे लागेल तेव्हा जनतेने आपल्या समस्या मला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्यानंतर आर्वजुन सांगाव्यात त्या समस्या सोडविण्यासाठी मी कटीबध्द आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

1 comment: