Tuesday 24 November 2020

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंमुळे पाटण ग्रामीण रुग्णालय झाले उपजिल्हा रुग्णालय. रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास शासनाची मान्यता.

    



दौलतनगर दि.25 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-: राज्याचे गृह व अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात पाटण येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपातंर करुन येथे 100 खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा दि.06 मार्च,2020 रोजी अर्थसंकल्प मांडताना केली होती. ना.शंभूराज देसाईंच्या पुढाकारामुळे राज्य शासनाच्या सार्वजनीक आरोग्य विभागाने पाटण,जि.सातारा येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन तेथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करणेबाबत मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय दि. 24 नोव्हेंबर, 2020 रोजी पारित केला असून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंमुळे पाटण ग्रामीण रुग्णालय आता उपजिल्हा रुग्णालय, पाटण असे ओळखले जाणार आहे.

             सन 2004 साली पहिल्यांदा पाटण विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेनंतर मतदारसंघाचे आमदार म्हणून शंभूराज देसाईंनी पाटण ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपांतर करुन या रुग्णालयामध्ये 100 खाटांचे सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय होण्याकरीता राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.त्यांच्या या पाठपुराव्याला ते राज्याचे अर्थराज्यमंत्री झालेनंतर मुहुर्तस्वरुप प्राप्त झाले. राज्याचा पहिलाच अर्थसंकल्प मांडताना घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी या म्हणीप्रमाणे राज्याच्या अर्थसंकल्पातील काही वाटा आपल्या ग्रामीण आणि डोंगरी मतदारसंघाकरीता मिळावा याकरीता ते सातत्याने आग्रही राहिले आणि त्यांनी सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात पाटण येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपातंर करुन येथे 100 खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची  घोषणाही केली. त्यांच्या घोषणेमुळे पाटण ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपातंर करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या.विधानपरिषदेमध्ये  घोषणा करुन 15 दिवसांचा कालावधी पुर्ण होण्याच्या अगोदरच ना. शंभूराज देसाईंनी पाटण ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात 100 खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय उभारण्याकरीता कुठे जागा उपलब्ध आहे व कशाप्रकारे हे उपजिल्हा रुग्णालय उभे करता येईल याकरीता येथील परिसराची अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पहाणी देखील केली होती.

                  पाटण, जि.सातारा येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन तेथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता दिल्याचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाकडून  दि. 24 नोव्हेंबर,2020 रोजी पारित केला असल्यामुळे या कामांस गती प्राप्त झाली आहे.सदर रुग्णालयासाठी उपलब्ध असलेल्या जागेवर इमारतीचे बांधकाम करण्यासाठी अंदाज आराखडे तयार करुन प्रशासकीय मान्यता देण्याकरीता सादर करण्यात यावेत तसेच बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पदनिर्मितीचा प्रस्तावही शासनाकडे सादर करावा असे शासन निर्णयामध्ये नमुद करण्यात आले आहे.

           पाटण मतदारसंघ हा डोंगरी व दुर्गम असुन मतदारसंघातील जनतेला आरोग्य सुविधा घेणेकरीता कराड किंवा सातारा येथील उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयाकडे जावे लागत असल्याने ही आरोग्य सुविधा पाटण या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालय करुन मतदारसंघातील जनतेला मिळवून दयावी याकरीता ना.शंभूराज देसाईंची सातत्याची तळमळ होती. त्यांच्या प्रयत्नातून पाटण ग्रामीण रुग्णालयाचे रुपातंर आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये झाले असून हे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामुळे पाटण मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.पाटण ग्रामीण रुग्णालयाची ओळख उपजिल्हा रुग्णालय, पाटण अशी निर्माण करणारे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना त्यांनी घेतलेल्या या धोरणात्मक निर्णयामुळे मतदारसंघातील जनतेने धन्यवाद व्यक्त केले आहेत.

Friday 20 November 2020

स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब)यांची 77 वी जयंती साध्यापध्दतीने साजरी. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची प्रमुख उपस्थिती.

                        



दौलतनगर दि.20 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा 77 वा जयंती सोहळा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने दौलतनगर ता.पाटण येथे स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवानेते यशराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.

               दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा जयंती सोहळा प्रतिवर्षी कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा 77 वा जयंती सोहळा कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. जयंती सोहळयानिमित्त राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते कारखाना कार्यस्थळावरील स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास,समाधीस पुष्पचक्र व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.प्रतिवर्षाप्रमाणे स्व.(आबासाहेब) यांचे प्रतिमेसमोर भजनाचे आयोजन करण्यात आले  होते. यावेळी प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंतक यांची उपस्थिती होती.

Wednesday 18 November 2020

दि.20 रोजी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब)यांची 77 वी जयंती होणार साध्यापध्दतीने. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची प्रमुख उपस्थिती.

 

                  

दौलतनगर दि.18 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा 77 वा जयंती सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे शुक्रवार दि.20 नोव्हेंबर,2020 रोजी सकाळी 10.30 वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने दौलतनगर ता.पाटण येथे स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. हा जयंती सोहळा राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवानेते यशराज देसाई यांचे  प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आला आहे.

               प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा जयंती सोहळा प्रतिवर्षी कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात येतो. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा 77 वा जयंती सोहळा शुक्रवार दि.20 नोव्हेंबर,2020 रोजी सकाळी 10.30 वा. दौलतनगर ता.पाटण येथे आयोजीत केला आहे. कोरोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम अत्यंत साध्या पध्दतीने होणार आहे. जयंती सोहळयानिमित्त राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते कारखाना कार्यस्थळावरील स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास,समाधीस पुष्पचक्र व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.प्रतिवर्षाप्रमाणे स्व.(आबासाहेब) यांचे प्रतिमेसमोर भजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Friday 13 November 2020

दिवाळी आनंदात पण साधेपणाने साजरी करा,आरोग्याची काळजी घ्या ! गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे जनतेला आवाहन. दिवाळी सणाच्या दिल्या मतदारसंघ व जिल्हावासियांना शुभेच्छा.

 

 दौलतनगर दि.13 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-: वर्षभरात साजऱ्या होणाऱ्या विविध सणापैकी दिवाळी हा एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण.हा सण साजरा करण्यासाठी बाहेरगावी असलेली मंडळी आपल्या गावी परत येऊन कुटुंबासोबत एकत्रितपणे हा सण साजरा करतात.यावर्षी मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग सुरुच आहे.कोरोना संसर्गाच्या काळात यंदाची दिवाळी प्रत्येकाने आनंदात पण साधेपणाने साजरी करतांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई  यांनी पाटण विधानसभा मतदारसंघवासिय व सातारा जिल्हावासियांना केले आहे. 

            यंदाच्या दिवाळीत खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत जातांना प्रत्येकाने दक्षता घ्यावी. सामाजिक अंतर ठेवावे. कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी प्रत्येकाने तोंडावर मास्क लावावे. कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर हाताला सॅनीटायझर लावावे किंवा हात साबणाने स्वच्छ धुवावे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने दक्ष राहून प्रत्यक्ष भेटीगाठी न घेता समाज माध्यमातून शुभेच्छा संदेश द्यावे.कुठेही गर्दी होणार नाही याबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे प्रत्येकाने पालन करावे. ही दिवाळी घरगुती स्वरूपात मर्यादित राहील, याची पूर्ण दक्षता घ्यावी.

           दिवाळी हा सण दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या उत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. यावर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करतांना फटाके फोडणे टाळावे.फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम श्वसनावर होतो.त्यामुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करतांना दिव्यांची आरास करून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहनही शेवटी गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई केले असून त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वांना व सातारा जिल्हावासियांना दिपवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

 

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे पाठपुराव्यामुळे वांग मराठवाडी धरणप्रकल्पग्रस्तांची दिवाळी गोड. 09 गांवातील प्रकल्पग्रस्तांना उदरनिर्वाहाची 6 कोटी 60 लाखांची रक्कम अदा.

 



              ढेबेवाडी प्रतिनिधी दि.13 :- कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत वांग मराठवाडी धरण प्रकल्पातील 09 गांवातील प्रकल्पग्रस्तांना अनेक वर्षापासून उदरनिर्वाह भत्ता मिळणे बाकी होते. मागील पंचवार्षिकमध्ये आमदार असताना मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश आले असून ना.शंभूराज देसाईंच्या पाठपुराव्यामुळे वांग मराठवाडी धरणप्रकल्पातील 09 गांवातील प्रकल्पग्रस्तांची दिवाळी गोड झाली आहे. या 09 गांवातील प्रकल्पग्रस्तांना दिवाळीपुर्वी त्यांची उर्वरीत राहिलेली उदरनिर्वाहाची 06 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम सातारा लघू पाटबंधारे विभागाकडून अदा करण्यात आली आहे.

               पाटण विधानसभा मतदारसंघातील कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत वांग मध्यम धरण प्रकल्पात ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमीन पाण्याखाली बूडाल्या आहेत.धरणासाठी ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीतील माती उचलण्यात आली आहे तसेच ज्या प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप केले नाही.अशा सर्व प्रकल्पग्रस्तांना प्रतिमहा रु.400 या दराने उदरनिर्वाह भत्त्याचे वाटप होणे प्रलंबीत होते.या 09 गांवातील सर्व प्रकल्पग्रस्तांना त्यांचे उर्वरीत राहिलेले उदरनिर्वाह भत्त्याचे वाटप तात्काळ करावे याकरीता शंभूराज देसाई हे मागील पंचवार्षिकमध्ये आमदार असताना शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते.

                      त्यांच्या पाठपुराव्याला मंत्री झालेनंतर यश प्राप्त झाले असून ना.शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे शासनाने वांग मध्यम धरण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना  रु. 400 प्रतिमाह या दराने उदरनिर्वाह भत्त्याचे वाटप तात्काळ करण्याचे आदेश निर्गमित केले त्यानुसार या प्रकल्पातील 09 गांवातील  बाधित प्रकल्पग्रस्तांना अनुक्रमे मौजे उमरकांचन 446, मेंढ 314, घोटील कोतीज 57, घोटील ताईगडेवाडी 228, मराठवाडी 111, जाधववाडी 82, जिंती 131, निगडे 39, मेंढ केकतवाडी 26 अशा एकूण 1434 खातेदारांना 06 कोटी 59 लाख 53 हजार 335 रुपये रक्कमेचे वाटप सातारा लघू पाटबंधारे विभागाकडून दिवाळीपुर्वी करण्यात आले आहे.वांग मराठवाडी धरण प्रकल्पातील बाधित प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाह भत्त्याचा अनेक वर्षापासून प्रलंबीत असणारा प्रश्न तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या विशेष पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्यामुळे आमची यंदाची दिवाळी गोड झाली असल्याच्या प्रतिक्रिया या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांनी दिल्या असून उदरनिर्वाह भत्ता मिळालेल्या या 09 गांवातील सर्व प्रकल्पग्रस्तांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई व शासनाचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

Saturday 7 November 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई दि.17 नोव्हेंबरला वाढदिवस साजरा करणार नाहीत. वाढदिवसानिमित्त मतदारसंघात विविध उपक्रम होणार.

 



दौलतनगर दि.07 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे दि.17 नोव्हेंबरचा वाढदिवस साजरा करणार नाहीत.त्यांचे वाढदिवसानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामार्फत सामाजिक विविध उपक्रम राबविणार आहेत.प्रामुख्याने ना.शंभूराज देसाईंचे वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने राबविण्यात आलेल्या शिवसेना सदस्य नोंदणी या उपक्रमात पाटण मतदारसंघातून 01 लाख शिवसेना सदस्य नोंदणीची अनोखी भेट शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांना देण्याचे उदिष्ट ठरविण्यात आले आहे.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे दि.17 नोव्हेंबर रोजी वाढदिवसानिमित्त कुटुंबियांसमवेत बाहेरगांवी जाणार असल्याची पाटण विधानसभा मतदारसंघातील तसेच ना.शंभूराज देसाईप्रेमी जनतेने नोंद घ्यावी असे ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयामार्फत प्रसिध्दीस देण्यात आले आहे.

                राज्याचे विद्यमान गृहराज्यमंत्री व पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय जनमाणसातील आमदार ना.शंभूराज देसाई यांचा दि.17 नोव्हेंबर रोजीचा वाढदिवस हा पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेकरीता उत्साहाचा,प्रेरणेचा आणि जल्लोषाचा दिवस म्हणून पाटण मतदारसंघात प्रतिवर्षी साजरा होतो. प्रतिवर्षी ना.शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त पाटण मतदारसंघातील जनतेची जाहीर सभा कारखाना कार्यस्थळावर आयोजीत केली जाते या जाहीर सभेतून पुढील वर्षापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघात कोणकोणते उपक्रम तसेच मतदारसंघातील जनतेच्या हितार्थ कोणत्या योजना राबवायचा याचा एक संदेश आणि आदेश कार्यकर्ते व पदाधिकारी यांना ना.शंभूराज देसाईंच्या माध्यमातून मिळत असतो. यंदाच्या वर्षी संपुर्ण देशावर आणि आपले महाराष्ट्र राज्यावर कोरोना महामारीचे संकट कोसळले असल्यामुळे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी दि.17 नोव्हेंबरचा त्यांचा 54 वा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून  वाढदिवसानिमित्त कुटुंबियांसमवेत बाहेरगांवी जाणार आहेत.

               शिवसेना पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना सदस्य नोंदणी करण्याचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.सातारा जिल्हयाकरीता 03 लाख शिवसेना सदस्य नोंदणीचे उदिष्ट देण्यात आले आहे. त्यातील 01 लाख शिवसेना सदस्यांची नोंदणी एका पाटण विधानसभा मतदारसंघात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त करुन 01 लाख शिवसेना सदस्य नोंदणीचे फॉर्म दि.17 नोव्हेंबर रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख यांचेमार्फत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, मुंबईकडे बहाल करण्यात येणार आहेत. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या वाढदिवसानिमित्त 01 लाख शिवसेना सदस्य नोंदणी करुन एक अनोखी भेट  शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांना देण्याचे ना.शंभूराज देसाईंचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी ठरविले असल्याचेही पत्रकात म्हंटले आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत टप्पा 3 मध्ये पाटण मतदारसंघातील 07 रस्त्यांची कामे प्रस्तावित. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार.

 



दौलतनगर दि.07 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 मध्ये केंद्र शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचना (गाईडलाईन्स) नुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 07 प्रमुख रस्त्यांची कामे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत करण्याकरीता मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार केला असून सदरच्या 07 रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे मंजुरीकरीता सादर करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

          प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 मध्ये पाटण विधानसभा मतदारसंघाकरीता केंद्र शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचना (गाईडलाईन्स) नुसार 44.100 किलोमीटर अंतरापर्यंत रस्ते प्रस्तावित करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या निकषामध्ये बसणाऱ्या रस्त्यांचे सर्व्हेक्षण तसेच तपासणी करुन हा आराखडा तयार करण्यात आला आहे.ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करणे हे या योजनेचे मुख्य उद्ष्टि असून पात्र गांवे व वाडयावस्त्या यांना बारमाही रस्त्यांनी जोडण्याकरीताचा हा आराखडा तयार केला आहे.केंद्र शासनाच्या निकषानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील एमडीआर 29 ते बोंद्री रस्त्यातंर्गत पिपंळोशी ते बोंद्री 01.00 किमी, कातवडी पोहोच रस्ता 01.00 किमी, मेष्टेवाडी ते पिंपळोशी 03.00 किमी, बेलवडे खुर्द ते सांगवड ते पापर्डे ब्रु// 6.700 किमी, पापर्डे ते दिवशी ब्रु//  ते एमडीआर नाडे ढेबेवाडी जोडणारा रस्ता 06.00 किमी., बांबवडे ते गायमुखवाडी ते कळंबे 07.00 किमी, एमडीआर 37 ते केळोली फाटा ते केळोली वरची केळोली ते विरेवाडी रस्ता 06.00 किमी, सणबूर रुवले तामिणे वाल्मिकी रस्ता 14.00 किमी व खबालवाडी खालची ते खबालवाडी वरची रस्ता 3.100 किमी  असे एकूण  मतदारसंघातील प्रमुख  47.800 किमीचे 07 रस्ते आराखडयात समाविष्ठ करण्यात आले आहेत.

                  प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 आराखडा तयार करणेसंदर्भात महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था,साताराचे कार्यकारी अभियंता एस.पी.खलाटे,उपअभियंता विलास पानस्कर यांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची भेट घेवून ना.शंभूराज देसाईंचे सुचनेवरुन हा आराखडा तयार करण्यात आला आहे.उद्ष्टिानुसार सदरचे 07 रस्ते हे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तावित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाकडून प्रस्तावित रस्त्यांच्या कामांकरीता निधी उपलब्ध होणार असून रस्त्यांची कामे पुर्ण झालेनंतर 05 वर्षे या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांची जबाबदारी राज्य शासनाची राहणार आहे.

चौकट: 07 रस्त्यांच्या कामांना लवकर निधी मिळणेकरीता मुख्यमंत्री यांचेमार्फत केंद्र शासनाकडे

          पाठपुरावा करणार.

           प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 मध्ये प्रस्तावित केलेल्या पाटण मतदारसंघातील 07 रस्त्यांच्या कामांना लवकरात लवकर आवश्यक असणारा निधी मिळणेकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेमार्फत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.

Friday 6 November 2020

शेतकरी बांधवांनी कार्यक्षेत्रातील सर्व ऊस देसाई कारखान्यांस घालावा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे गळीत हंगाम शुभारंभात आवाहन.

 


दौलतनगर दि.06 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- केवळ ऊसाचे गाळप करुन साखर कारखाने चालविणे आता साखर कारखान्यांना अडचणीचे झाले आहे. केंद्राने एफआरपीचा कायदा बंधनकारक केला आहे. साखरेचे बाजारातील दर हे 3100 रुपये आहेत.आपले कारखान्याला यंदाच्या गळीत हंगामामध्ये 2807 रुपये एफआरपी बसत आहे. 2800 रु.एफआरपी धरल्यास कसरत करुन उत्पादन व्यवस्थापन खर्च 300 रुपयांमध्ये भागवावा लागणार आहे. मागील गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील सुमारे 01 लाख 20 हजार टन ऊस बाहेरच्या कारखान्यांना गेला. बाहेरच्या कारखान्यांच्या बरोबरीने आपण एफआरपीची रक्कम ऊस उत्पादकांना दिली आहे देत आहोत असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग समुहाचे मार्गदर्शक ना.शंभूराज देसाईंनी केले असून यंदाच्या वर्षी कार्यक्षेत्रातील सर्व ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांनी देसाई कारखान्यांस घालावा असे आवाहन त्यांनी केले आहे. 

                   दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा 47 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते,युवा नेते यशराजदादा देसाई मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी पार पडला.याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,जयराज देसाई, कारखान्याचे व्हा.चेअरमन राजाराम पाटील त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मंदाकिनी राजाराम पाटील कारखान्याचे सर्व संचालक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

             याप्रंसगी बोलताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते आपण प्रतिवर्षी गळीत हंगामाचा शुभारंभ करीत असतो परंतू कोरोना महामारी,पुणे पदवीधर निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर यंदाच्या वर्षीचा गळीत हंगाम आपण साध्या पध्दतीने करीत आहोत.साखर उद्योग प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखाने आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. देशात साखर उत्पादन करणारी संख्या 20 टक्के आणि साखर खाणाऱ्यांची संख्या 80 टक्के आहे.कोणतेही सरकार सत्तेत आले तरी साखर दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.सहकारी साखर कारखान्यांनी उपपदार्थाकडे गेले पाहिजे इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी ज्या सवलती  राज्य शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देता येतील त्या सवलती देण्याच्या सुचना मागील 15 दिवसापुर्वी देशाचे माजी कृषी मंत्री व साखर उद्योगाचा गाढा अभ्यास असणारे शरदचंद्रजी पवार साहेब यांचेबरोबर राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.वळसे पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत कारखान्यांची आर्थिक क्षमता पाहून साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प उभारण्याचे सुचित करण्यात आले.आपल्याही कारखान्याची आर्थिक क्षमता इथेनॉल प्रकल्प  उभारण्याची आहे. याकरीता राज्याचा वाटाही आपल्याला मिळेल.यासंदर्भात राज्य बँकेच्या वरीष्ठांशी माझी चर्चा देखील झाली परंतू आपल्याकडे साखर कारखाना लहान असल्यामुळे 8 हजार ते 10 हजार टन मोलॅासिस उपलब्ध होते. त्याकरीता वाढीव मोलॉसिसची गरज आहे.किमान गळीत हंगामात पाच लाख टन ऊसाचे गाळप आपल्याकडे होणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रातील ऊसक्षेत्र वाढविण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरु आहे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या तारळी,मोरणा गुरेघर व वांग मराठवाडी धरण प्रकल्पांमध्ये सुधारणा करुन लवादयाप्रमाणे वाढीव क्षेत्राला पाणी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे.तारळे प्रकल्पांच्या कामांस मंजुरी मिळाली आहे. मोरणा गुरेघरच्या कामांस सुधारित मान्यता घेण्याचे काम सुरु आहे.असे सांगून ते म्हणाले,आपल्या कारखान्याला केंद्राकडून 10.34 कोटी येणे बाकी आहे. ही रक्कम एक किंवा दोन टप्पयामध्ये आपल्याला मिळाली तर यातून कारखान्यांची आणखीन सुधारणा आपल्याला करता येईल. आपलेपणाने कारखान्याकडे पाहणे गरजेचे असून पिकवलेला सर्व ऊस आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी देसाई कारखान्याला घालून यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यास मदत करावी असेही ते शेवठी म्हणाले.

                   याप्रसंगी बोलताना युवानेते यशराजदादा देसाईंनी अभ्यासपुर्ण कारखान्यांच्या कामकाजासंदर्भात मांडणी करीत म्हणाले, कारखान्याच्या सन 2020-21 या गळीत हंगामासाठी नोंदविलेल्या संपुर्ण ऊसाचे गाळप पुर्ण करण्याच्या दृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेची तसेच कारखाना व्यवस्थापनाची पुर्वतयारी झाली आहे. कारखान्याची ओव्हर ऑइलिंगची कामे त्याचबरोबर मशिनरीमधील आवश्यक त्या दुरुस्तीची सुधारण्याची कामे पुर्ण झालेली आहेत. कारखान्यामध्ये आपण बहूतांशी प्रमाणात सुधारणा केलेल्या आहेत.याचा फायदा यंदाच्या गळीत हंगामामध्ये आपल्याला होईल.गत गळीत हंगामाची एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपण पूर्णपणे दिली आहे. यंदाचा गळीत हंगाम मागील हंगामाप्रमाणे यशस्वी करण्याचे आमचे नियोजन पुर्ण झाले आहे. आजपासूनच आपण कारखाना सुरु करीत आहोत.

              कार्यक्रमाचे प्रस्तावित कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी केली व उपस्थित्यांचे आभार संचालक गजानन जाधव यांनी मानले. दरम्यान कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेवून तसेच सामाजिक अंतराचे पालन करुन गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.