Tuesday, 3 November 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईकडून कोळेकरवाडी डेरवण रस्त्याचा प्रश्न मार्गी. वनविभागाच्या मान्यतेसह 88 लाख रुपयांचा निधीची तरतूद करणार.

 


दौलतनगर दि.03 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- चाफळ विभागातील कोळेकरवाडी डेरवण या डोंगरपठारावर दुर्गम भागात वसलेल्या गांवाला गावपोहोच रस्त्याची सोयच नसल्याने येथील ग्रामस्थांना  अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता.कोळेकरवाडी डेरवण ग्रामस्थांची रस्त्याची ही गैरसोय मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दुर केली असून कोळेकरवाडी डेरवण रस्त्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला आहे.या रस्त्याकरीता वनविभागाची मान्यता देण्यासह आवश्यक असणारा 88 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करणार असल्याचे ना.शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.

              गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोळेकरवाडी डेरवण रस्त्याचे कामांसंदर्भात व या रस्त्यास घ्यावयाच्या वनविभागाच्या मान्यतेसंदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीत वरीलप्रमाणे ना.शंभूराज देसाईंनी निर्णय घेत या रस्त्याच्या कामांस वनविभागाची मान्यता देवून निधीची तरतूद करण्यासंदर्भात सुचित केले.बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपवनसंरक्षक डॉ.भारतसिंह हाडा,जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एन. एम. वेदफाटक,जिल्हा परीषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता एन.टी.भोसले, वनाधिकारी विलास काळे व उपअभियंता आर.एस.भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

              बैठकीमध्ये ग्रामस्थांच्या मागणीनुसार शिंगणवाडी ते कोळेकरवाडी डेरवण ता.पाटण पोहोच रस्ता करणेबाबत निर्णय घेण्यात आला या रस्त्याअंतर्गत 0/00 ते 120 असे 120 मीटर क्षेत्र शिंगणवाडी ग्रामपंचायत हद्दीतील क्षेत्र आहे तर 0/120 ते 0/920 मीटर असे सुमारे 800 मीटर लांबीचे क्षेत्र वनविभागातील आहे. आणि उर्वरित 0/920 ते 1/320 मीटर असे सुमारे 400 मीटर लांबीचे क्षेत्र डेरवण ग्रामपंचायती हद्दीतील क्षेत्र आहे. करावयाच्या रस्त्याची एकूण लांबी सुमारे 1320 मीटर इतकी असून रुंदी 7.50 मीटर इतकी आहे. त्याप्रमाणे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून याकरीता सुमारे रक्कम रु. 87 लाख 77 हजार इतक्या निधीची आवश्यकता आहे.प्रथमत: या रस्त्याच्या कामांकरीता 800 मीटर वनविभागाच्या लांबी क्षेत्रास मान्यता देवून आवश्यक असणारा 88 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. लवकरात लवकर वनविभागाची मान्यता घेण्याकरीता जिल्हाधिकारी यांच्यासमवेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेवून यास तात्काळ मान्यता देण्यात यावी अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी अधिकाऱ्यांना दिल्या. वनविभागाची मान्यता लवकर दया आवश्यक असणारा निधी देण्याचे काम मी करतो असे सांगून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी चाफळ विभागातील कोळेकरवाडी डेरवण या अनेक वर्षापासून रखडलेल्या दुर्गम भागातील रस्त्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला आहे.लवकरच चाफळ विभागातील कोळेकरवाडी डेरवण या रस्त्यांच्या कामांकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आवश्यक निधी उपलब्ध देण्याचे मान्य केल्याने कोळेकरवाडी ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.बैठकीस कोळेकरवाडी डेरवण येथील प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment