Monday 28 February 2022

विकासाच्या बाबतीत पाटण विधानसभा मतदारसंघ रोल मॉडेल बनविणार -गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई

 

 दौलतनगर दि.28 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण विधानसभा मतदारसंघात मतदारसंघाचा आमदार म्हणून सन 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या कालावधीत कोटयावधी रुपयांचा निधी शासनाकडून मंजुर करुन आणत मतदारसंघातील अनेक प्रलंबीत विकासकामे आपण मार्गी लावली.राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी माझेवर राज्याच्या पाच खात्याची जबाबदारी दिली आहे.त्यात वित्त विभागाची जबाबदारी माझेवर दिली असून या विभागाच्या माध्यमातून पाटण मतदारसंघात गत दोन वर्षात कोटयावधी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. विकासकामांच्या बाबतीत पाटण विधानसभा मतदारसंघ रोल मॉडेल बनविणार असल्याची ग्वाही  गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिली.

         गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत पाटण विधानसभा मतदारंसघात अर्थसंकल्पीय अधिवेशापुर्वी गत दोन दिवसापासून पुर्ण झालेल्या मोठमोठया कामांचे उदघाटन व मंजुर झालेल्या विविध विकासकामांची भूमिपुजनांचा कार्यक्रमांचा धडाका सुरु असून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे शुभहस्ते सांगवड येथील कोयना नदीकाठच्या संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ता, ग्रामपंचायत कार्यालय, अर्थसंकल्पातून मंजुर सूर्यंवंशीवाडी ते पापर्डे, माळवस्ती ते गव्हाणवाडी व मारुलहवेली ते तालुका हद्द साजूर रस्ता याचे भूमिपुजन शनिवारी पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे ग्वाही दिली.

            याप्रसंगी कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, शिवदौलत बँकेचे माजी चेअरमन ॲड मिलींद पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, माजी सदस्य बशीर खोंदू, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, माजी सदस्य ॲड दिपक जाधव तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

           याप्रसंगी बोलताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, सलग तिसऱ्यांदा पाटण विधानसभा मतदारसंघाचा आमदार होण्याची संधी मतदारसंघातील जनतेने मला दिली. जनतेचा विश्वास सार्थ करण्याचे काम पाटण मतदारसंघाचा आमदार म्हणून केले. आमदार म्हणून शासनाच्या तिजोरीतून कोटयावधी रुपयांचा निधी पाटण मतदारसंघातील विविध प्रलंबीत विकासकामांकरीता मंजुर करुन आणला. आज प्रत्यक्षात मोठया प्रमाणात प्रलंबीत राहिलेली विकासकामे मार्गी लागलेली आपणांस दिसून येत आहे. दोन वर्षापुर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी मला राज्याचे राज्यमंत्री करुन माझेवर राज्याच्या प्रमुखस पाच खात्यांची जबाबदारी दिली. ही जबाबदारी मी लिलया पेलत असून मंत्रीपदाचा फायदा मतदारसंघातील नागरिकांना तसेच जनतेच्या विकासकामांकरीता झाला पाहिजे या दृष्टीने आपण मतदारसंघात काम करीत आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्याचा वित्त राज्यमंत्री म्हणून मतदारसंघाला झुकते माप देण्याचा माझा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. दोन वर्षात कोटयावधी रुपयांचा निधी मतदारसंघातील विविध विकासकामांकरीता आणण्यात मला यश मिळाले आहे. गांवोगांवी, वाडीवस्तीवर विकासकाम पोहचविण्याचे काम आपण करीत असून पाटण मतदारसंघ हे विकासकामांच्या बाबतीत रोल मॉडेल बनविण्याकरीता माझा सातत्यांने प्रयत्न सुरु आहे. आज मागील पंचवार्षिकमध्ये तसेच मागील दोन वर्षात शासनाकडून मंजुर करुन आणलेल्या विविध कामे मोठया संख्येने मार्गी लागत आहेत याचा जनतेला लाभ होत आहे हे पाहून अत्यानंद होत आहे. मागेल त्या गावाला, वाडीवस्तीला काम देण्याचा आमदार आणि आता मंत्री म्हणून प्रयत्न राहिला आहे. या विविध विकासकामांच्या माध्यमातून गावे, वाडयावस्त्यांचा कायापालट झाल्याचे आपणांस दिसून येत आहे. गांवो गावी मोठया प्रमाणात एकी झाल्याने प्रलंबीत विकासकामे मार्गी लागण्यास चांगली मदत होत आहे. डोळयाला दिसेल असे काम करुन पाटण मतदारसंघ विकासकामांत अग्रेसर ठेवण्याकरीता अजुनही आवश्यक असणारा निधी मंजुर करुन प्रलंबीत सर्व कांमे मार्गी लावली जातील याकरीता आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

चौक्ट:- एकाच दिवशी 15 कोटी 55 लक्ष रुपयांच्या विकासकामांची भूमिपुजने.

             शनिवारी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या हस्ते मारुलहवेली विभागातील विविध विकासकामांची एकाच दिवशी 15 कोटी 55 लक्ष रुपयांच्या निधीची विकासकामांची भूमिपुजने करण्यात आली. एवढया मोठया निधीमुळे जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

Tuesday 22 February 2022

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा मंत्रालयीनस्तरावर बैठकांचा धडाका. मुंबईतून मतदारसंघातील विविध घटनांवर बारकाईने लक्ष.

 

 

 मुंबई दि.23 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- गेले दोन दिवस राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी राज्यमंत्री म्हणून शासनाच्या वतीने विधानसभा सभागृहात देण्यात आलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्याकरीता मंत्रालयीनस्तरावर शासकीय बैठकांचा धडाकाच लावला होता.या बैठकांमधून दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्याच्या दृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करीत अनेक धोरणात्मक निर्णय ही घेतले आहेत. तसेच तीनचार दिवसापुर्वी मतदारसंघातील जनतेच्या समस्या जाणून घेणेकरीता जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सेाबत घेवून त्यांचे अध्यक्षतेखाली जनता दरबारही झाला यात त्यांनी जनतेच्या समस्यांची जागेवर सोडवणूक केली. दरबारात तब्बल 353 लेखी निवेदने दाखल झाली असून त्यावर कार्यवाही सुरु आहे.बैठकांकरीता मुंबईत असूनही त्यांचे मतदारसंघातील विविध घटनांवर बारकाईने लक्ष आहे.सोमवारी पाटण येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करुन तपास करण्याच्या तसेच दोषींवर कठोरात कठोर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर व पोलीस अधीक्षक सातारा यांना दिल्या आहेत. 

          मंत्रालयीन स्तरावर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकांमध्ये राज्य शासकीय कर्मचारी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबाला निवृत्ती वेतन आणि वैद्यकिय कारणास्तव कर्मचाऱ्यांने निवृत्ती घेतल्यास रुग्णता निवृत्ती वेतन लागू करणे. तसेच केंद्र शासनाच्या सेवानिवृत्ती योजनाप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही योजना लागू करण्यासंदर्भात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे या अभ्यासगटाच्या बैठकीत या अभ्यासगटाद्वारे वरील विषयासंदर्भात साकल्याने विचार करून निवृत्ती वेतन योजनेतील त्रुटी आणि शासनावर येणारा आर्थिक भार यासदंर्भात शासनास शिफारस करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईनी बैठकीत सविस्तर चर्चा करुन यावेळी सांगितले. राज्य शासनाच्या सेवेत सन 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन (NPS) योजनेतील (पूर्वीच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना- DCPS) त्रुटीचा अभ्यास करण्यासाठी  वित्त विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांचे अध्यक्षतेखाली हा अभ्यासगट शासनाच्या वतीने स्थापन करण्यात आला आहे.

                तसेच पोलीस पाटलांच्या शासनाकडे विविध प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भातही गृहराज्यमंत्री यांनी बैठक घेऊन राज्यातील पोलीस पाटील संघटनांच्या विविध मागण्यांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा केली.यामध्ये पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये वाढ करणे,शासनामार्फत विमा योजना सुरु करणे,निवृत्तीचे वय 60 वरुन 65 करणे,निवृत्ती नंतर ठोस रक्कम अथवा पेन्शन मिळणे,अनुकंपा तत्व लागू करणे,कर्तव्य बजावत असताना शहिद झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देणे,कोरोना काळात कर्तव्य बजावताना मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देणे,पोलीस पाटलांची रिक्त पदे भरती प्रक्रिया तातडीने राबविणे,पोलीस पाटलांचे मानधन वेळेत अदा करणे,उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस पाटलांना पुरस्कार देणे या विविध प्रमुख मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा पोलीस पाटील राज्य संघटनेच्यावतीने गृहराज्यमंत्री यांचेशी झाली.याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कार्यवाही करु असे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सांगीतले.या बैठकीस गृहमंत्री ना.दिलीपराव वळसे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

               त्याचबरोबर विधानसभा सभागृहात दिलेल्या आश्वासनानुसार पाटण मतदारसंघात कोयनानगर,ता.पाटण येथे लवकरात लवकर राज्य आपत्ती बचाव दलाची (SDRF) स्थापना करण्यासंदर्भात मंत्रालयस्तरावर  बैठक घेवून त्यांनी या प्रस्तावाचा सविस्तर आढावा घेतला यावेळी या बैठकीस मुख्य सचिव (सचिव) श्री.नितीन करीरसो, अप्पर पोलीस महासंचालक.(प्रशिक्षण) श्री.संजय कुमार, अप्पर पोलीस महासंचालक (नियोजन व समन्वय)संजय कुमार वर्मा, विशेष पोलिस महासंचालक(कायदा व सुव्यवस्था) श्री.सुहास वारके व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Tuesday 15 February 2022

गृहराज्य मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या जनता दरबारात जागेवरच झाला निवेदनांचा निपटारा दरबारात तब्बल 353 लेखी निवेदने दाखल.जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद.टॉप प्रायोरिटीने दखल घेण्याचे ना.देसाई यांचे अधिकाऱ्यांना आदेश

 


दौलतनगर दि.15 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- राज्याचे गृहराज्यमंत्री आणि पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी ना. शंभूराज देसाई यांच्या मंत्रिपदाच्या कालावधीतील पहिल्याच जनता दरबारात  जिल्हास्तरीय व तालुकास्तीय शासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत झालेल्या जनता दरबारात तब्बल 353 लेखी निवेदने दाखल झाली. यापैकी बहुतांशी निवेदनांचा जागेवरच निपटारा झाल्याने नागरिकांनी या दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.दरम्यान सदर तक्रारी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टॉप प्रायोरिटीने दखल घेण्याचे अधिकाऱ्यांना आदेश मंत्री ना. देसाई यांनी देऊन एक महिन्याच्या आत सदर निवेदनांची कार्यवाही पूर्ण करावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा  ही मंत्री देसाई यांनी शासकीय विभागांना दिला.

             यावेळी  मोरणा शिक्षण संस्थेचे रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई,जिल्हाधिकारी शेखर सिंह,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,पोलीस अधीक्षक अजय बन्सल,पाटण चे उपविभागीय अधिकारी सुनील गाडे,उप विभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील ,तहसीलदार रमेश पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,सुरेश पानस्कर,भरत साळूंखे,अभिजित पाटील,बबनराव भिसे,विजयराव जंबुरे,बशीर खोंदू,बबनराव माळी,सुरेश जाधव, तसेच जिल्ह्यातील आरोग्य,बांधकाम,शिक्षण,वन,परिवहन तसेच विविध शासकीय विभागातील जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी  उपस्थित होते.

                पाटण तालुक्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जनता दरबार उपक्रमास नागरिकांमधून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे.कारण विविध शासकीय पातळीवर प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांची जनता दरबारात जागेवरच सोडवणूक होत असल्याने या दरबाराला तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांमधून अनन्य साधारण महत्व आहे. दरम्यान कोविड काळामुळे  दोन वर्षे पाटण तालुक्यतील जनता दरबार रखडला होता.मात्र मंगळवारी  पुन्हा पाटण तालुक्यातील मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या मंत्री पदाच्या काळातील पहिला आणि आजपर्यंतचा पाचवा जनता दरबार  पाटण येथे तहसीलदार कार्यालय प्रांगणात संपन्न झाला.

               जिल्हास्तरीय विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित आणि  मंत्री शंभूराज देसाई यांच्या समवेत  पार पडलेल्या या जनता   दरबारात विविध अशा एकूण  353 लेखी  निवेदने दरबारात दाखल झाल्या. यापैकी काही निवेदनांचा जागेवरच निपटारा करण्यात आला तर काही निवेदनां संदर्भात संबंधीत अधिकार्यांनी एक महिन्याच्या आत कार्यवाही करून सदर समस्या सोडविली असल्याची माहिती मला द्यावी असे आदेश देऊन पुरवठा विभागसंदर्भात सर्वाधिक निवेदने प्राप्त झाले असून या संदर्भात स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे ही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.दरम्यान बहुतांशी निवेदनांचा निपटारा जागेवरच करणेत यश मिळाले.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

   चौकट: जनता दरबार मुळे एसटी होणार सुरू..!

          विविध कारणांमुळे पाटण तालुक्यातील जळव मणदुरे पाटण ही एसटी सेवा बंद असल्याने परिसरातील शालेय विद्यार्थ्यी आणि ग्रामस्थांचे हाल होत असल्याने काही शालेय विद्यार्थिनींनी जनता दरबारात मंत्री देसाई यांचेकडे गाऱ्हाणे मांडताच मंत्री देसाई यांनी जिल्हा नियंत्रक सातारा यांना मार्गावरील एसटी तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले.यावेळी उद्या बुधवार पासून या मार्गावरील एस.टी. सुरू होईल अशी माहिती विभाग नियंत्रक यांनी दरबारात दिली.

  चौकट :अन शेवटचा माणूस जाईपर्यंत मंत्री देसाई थांबले..!

         जनता दरबार कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात लेखी निवेदने दाखल झाले. जो पर्यंत जनता दरबारात निवेदने घेऊन आलेला शेवटचा माणूस जात नाही तो पर्यंत मी कुठेही जाणार नाही  सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन त्याचे समाधान होईपर्यंत  आपण इथेच थांबणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई  यांनी  सांगितले.आणि खरोखरच मंत्री देसाई शेवटच्या नागरिकाचे समाधान होईपर्यंत तब्बल सहा तास एकाच ठिकाणी या जनता दरबारात थांबले आणि  नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले.

चौकट:एक महिन्यात पूर्ण करा.. अन्यथा...!

जनता दरबारात मी मंत्री म्हणून जनतेच्या निवेदनांवर शेरे दिले आहे. ज्या विभागातील अधिकाऱ्यांच्या संबंधित निवेदन असेल त्या अधिकाऱ्यांनी टॉप प्रायोरिटी म्हणून सदर बाबीची एक महिन्याच्या आत कार्यवाही पूर्ण करावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी जनता दरबारात दिला.

Monday 14 February 2022

मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडून शिवजयंती उत्सव साजरा करण्यास विशेषबाब म्हणून अनुमती. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे पाठपुराव्याला यश.

 



दौलतनगर दि.14 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवार दि. 19 फेब्रुवारी रोजी साजरी होत असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्याकरीता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी राज्य शासनाने कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर घातलेल्या निर्बंधामध्ये विशेषबाब म्हणून अनुमती दिली आहे. शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्याकरीता राज्य शासनाने घातलेल्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात यावी याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे लेखी पत्राव्दारे ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या आग्रही विनंतीवरुन आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या  शिवज्योत दौडीत दोनशे जण  आणि जन्मोत्सव सोहळयाकरीता पाचशे जणांना सहभागी होता येणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी विशेष बाब म्हणून अनुमती दिल्याबद्दल तमाम शिवप्रेमी यांचेवतीने मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  आभार मानले.

               गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोविड 19 महामारीच्या अनुषंगाने विविध धार्मिक,राजकीय उत्सव यावर कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाची चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी  करण्यात आल्याने तिसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यामध्ये यश आले.सध्या संक्रमणाचा दर कमी झाला असला तरी खबरदारी म्हणून शासनाचे काही निर्बंध हे आज देखील आहेत.अशाच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवार दि. 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मोठया उत्साहात साजरी करण्याची शिवप्रेमींमध्ये असलेली भावना लक्षात घेऊन  कोविड महामारीच्या अनुषंगाने लागू असलेल्या काही निर्बंध व अटी शिथील केलेस शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावण निर्माण होऊन शिवजयंती उत्साहात साजरी करणेस मदत होईल. याकरीता यंदाच्या वर्षीची शिवजयंती साजरी करताना शासनाने घालून दिलेल्या निर्बंधामध्ये शासनाचे नियम पाळून थोडया फार प्रमाणात शिथीलता देण्यात यावी अशी आग्रही विनंती राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी लेखी पत्राव्दारे केली होती.त्या अनुषंगाने शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचे प्रस्ताव गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे सादर केला होता. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या  शिवज्योत दौडीत दोनशे जण  आणि जन्मोत्सव सोहळयाकरीता पाचशे जणांना सहभागी होण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी मान्यता दिली असून याबाबत सर्व यंत्रणांनाही सुचित करण्यात आले आहे.या जयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योती दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल तसेच शिवजयंती सोहळा पाचशेच्या उपस्थिती मर्यादेत साजरा करता येणार असून कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जयंती सोहळ्याचे क्षण साजरे करण्याचे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले आहे.

Saturday 12 February 2022

यंदाच्या वर्षीचे शिवजयंतीचे निर्बंध शिथिल करा. मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची आग्रही विनंती.


 

दौलतनगर दि.12 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोविड 19 महामारीच्या अनुषंगाने विविध धार्मिक,राजकीय व विविध धर्माचे उत्सव यावर कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाची चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी  करण्यात आल्याने तिसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यामध्ये यश आले आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवार दि. 19 फेब्रुवारी  रोजी साजरी होत असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्याकरीता राज्य शासनाने घातलेल्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात यावी अशी आग्रही विनंती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी लेखी पत्राव्दारे केली आहे.

         गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांना दिलेल्या लेखी विनंती पत्रामध्ये गत दोन वर्षापासून राज्यात कोविड महामारीच्या अनुषंगाने विविध धार्मिक,राजकीय व विविध धर्माचे उत्सव साजरे करणे यावर कडक निर्बंध लागू केले आहेत या सदरच्या निर्बंधाची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यातील जनतेने यशस्वीपणे केली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यात राज्य शासनासह सर्वजण  यशस्वी झालो आहोत. सध्या संक्रमणाचा दर कमी झाला असला तरी खबरदारी म्हणून शासनाने काही निर्बंध हे आज देखील लागू केले आहेत.अशाच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवार दि. 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मोठया उत्साहात साजरी करण्याची भावना शिवप्रेमींमध्ये आहे. मात्र कोविड महामारीच्या अनुषंगाने लागू असलेल्या निर्बंधामुळे शिवप्रेमी व पोलीस विभागामध्ये शिवजयंती  उत्सव साजरा करणेबाबत तसेच शिवज्योत परवानगी देणेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत काही निर्बंध व अटी शिथील केलेस शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावण निर्माण होऊन शिवजयंती उत्साहात साजरी करणेस मदत होईल याकरीता यंदाच्या वर्षीची शिवजयंती साजरी करताना शासनाने घालून दिलेल्या निर्बंधामध्ये शासनाचे नियम पाळून थोडया फार प्रमाणात शिथीलता देण्यात यावी अशी विनंती केली आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला. अपघातग्रस्त कुटुंबियांना केली मदत.

 


दौलतनगर दि.12 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे तत्पर व धाडसी तसेच तातडीने मदतीला धावून जाणारे मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. मग तो प्रसंग कोणताही असो, अडचणीच्या काळी ना.शंभूराज देसाई हे मदतीला नेहमी धावून जातात याचा अनेकदा प्रत्यय आला असून असाच अपघाताचा प्रसंग काल मुंबई पुणे महामार्गावर खोपोली येथे घडला,या महामार्गावरुन साताऱ्याकडे येणारे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई अपघात झाल्याचे पहाताच आपल्या वाहनांचा ताफा थांबवत ते तत्परतेने अपघातग्रस्तांच्या मदतीला धावत गेले.

               काल दि.11 रोजी सकाळी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा ताफा मुंबईवरुन साताऱ्याच्या दिशेने येत असताना मुंबई पुणे महामार्गावर खोपोली येथे अपघात झाला असल्याचे ना.शंभूराज देसाईंच्या निदर्शनास आल्या नंतर तात्काळ त्यांनी आपल्या गाडयांचा ताफा बाजूला केला. धावत त्या अपघातस्थळी जात त्यांनी अपघात झालेल्या कुटुंबियांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.अपघातामध्ये कुणाला गंभीर दुखापत वगैरे झाली आहे का? याची खात्री करुन त्यांनी तातडीने स्वत: हायवे पोलीस विभागातील संबंधित अधिकारी यांना फोन केला आणि तात्काळ अपघातस्थळी पोहचून अपघातग्रस्त कुटुंबियांना तातडीने आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना केल्या.तसेच अपघात झालेले वाहन हे संबधित यंत्रणेमार्फत मुंबईकडे नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचेही त्यांनी सांगीतले. मुंबई ते सातारा असा प्रवास करताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या सतर्कतेमुळे खोपोली येथील महामार्गावर अपघात झालेल्या कुटुंबियांना तात्काळ आवश्यक ती मदत झाल्याने अपघातग्रस्त कुटुंबियांनी ना.शंभूराज देसाई यांचे आभार मानले.यावेळी अपघातग्रस्त कुटुबियांना काळजी घ्या असेही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यावेळी म्हणाले.

 

Thursday 10 February 2022

नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघाचे वतीने गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केला जाहीर सत्कार.

 

 

दौलतनगर दि.10 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदेसाहेब हे खाजगी कार्यक्रमासाठी पाटणच्या दौऱ्यावर आले असता त्यांचे काल दि. 09 फेब्रुवारी झालेल्या वाढदिवसानिमित्त पाटण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण शासकीय विश्रामगृह येथे पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने शाल, श्रीफळ व भेट वस्तू देवून जाहीर सत्कार केला. दरम्यान काल वाढदिवसानिमित्त गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी ठाणे येथे नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे निवास्थानस्थानी जावून शाल, श्रीफळ व भेट वस्तू देवून सत्कार करीत अभिष्टचिंतन केले होते.

          आज दि. 10 रोजी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदेसाहेब हे खाजगी कार्यक्रमासाठी पाटणच्या दौऱ्यावर आले होते याप्रसंगी पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने पाटण शासकीय विश्रामगृह येथे हा वाढदिवस अभीष्टचिंतन समारंभ करण्यात आला. यावेळी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेसह मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,संचालक सोमनाथ खामकर,शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे,बशीर खोंदू,भरत साळूंखे,पांडूरंग शिरवाडकर,नाना पवार,गणीभाई चाफेरकर,नाना कुंभार, मनोज पाटील, बबनराव भिसे,विजय जंबुरे-देशमुख व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिवसैनिक मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

Wednesday 9 February 2022

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली मंगळवार दि. 15 फेब्रुवारीला पाटणला जनता दरबार. जनता दरबारास जिल्हास्तरीय अधिकारी राहणार उपस्थित. जनता दरबारामध्ये आम जनतेने समस्यांचे लेखी निवेदन घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन.

 


दौलतनगर दि.09 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी, समस्या जागेवर सोडविण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली  मंगळवार दि.15 फेब्रुवारी,2022 सकाळी 11.30 वा.पाटण येथील तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.कोविड संसर्गानंतर राज्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांचे अध्यक्षतेखाली पहिलाच जनता दरबार होत असून या जनता दरबारामध्ये ना.शंभूराज देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघातील सुपने मंडलसह जनतेच्या समस्या व विकास कामासंदर्भातील अडी-अडचणी जाणून घेणार आहेत.ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखालील जनता दरबारास जिल्हास्तरीय अधिकारी यांचेसह पाटण व कराड तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांचे खातेप्रमुख यांनाही निमंत्रित केले आहे.मतदारसंघातील जनतेने आपल्या समस्यांची लेखी निवेदने घेऊन मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन ना.शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दी पत्रकाव्दारे करण्यात आले  आहे.

        राज्याचे विद्यमान गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रथमत: पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार झालेनंतर सन २००४ ते २००९  व 2014 ते 2019 या कालावधीत पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनतेच्या तालुका व जिल्हास्तरावरील असणाऱ्या प्रलंबित समस्या व विकास कामांसंदर्भातील अडी-अडचणी या जागेवर सोडवून देणेकरीता सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेवून जनतेच्या जनता दरबार आयोजित करण्याची नविन संकल्पना राबविली होती.या जनता दरबारामध्ये मतदारसंघातील जनतेच्या अडी-अडचणींचा निपटारा जागेवरच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर होत होता.जनतेचे प्रश्न जागेवरच मार्गी लागत असल्यामुळे आम जनतेमध्ये समाधानाचे वातावरण पहावयास मिळत होते जनता दरबारास मतदारसंघातील जनतेने उत्स्फुर्त प्रतिसादही दिला होता. मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी ही संकल्पना सलग 10 वर्षे अखंडीत राबविली. पाटण मतदारसंघातील कराड तालुक्यातील सुपने मंडलकरीताही त्यांनी स्वतंत्र्य जनता दरबाराचे आयोजन करुन या विभागातील जनतेचे प्रश्न जागेवर मार्गी लावले होते.गत दोन वर्षामध्ये कोविड 19 चे संसर्गामुळे शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे जनता दरबारचे आयोजन करण्यात आले नव्हते.

       आमदार शंभूराज देसाई हे राज्याचे नामदार झालेनंतर पहिल्यांदाच मंगळवार दि. 15 फेब्रुवारी,2022 रोजी आयोजित केलेल्या जनता दरबारास जिल्हास्तरीय सर्व यंत्रणांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता तहसिल कार्यालय,पाटण च्या प्रांगणात  आयोजित केलेल्या जनता दरबारास पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व व सुपने मंडलसह आम जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहून आप-आपले प्रलंबित प्रश्न,समस्या तसेच विकासकामांबाबतच्या अडचणींचा तातडीने निपटारा करुन घेणेसाठी आपल्या समस्यांची लेखी निवेदने या जनता दरबारामध्ये सादर करावीत,असे आवाहनही शेवटी पत्रकांत केले आहे.

 

 

Wednesday 2 February 2022

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखाली मरळी सोसायटी निवडणुक बिनविरोध. नवनिर्वाचित संचालक मंडळाचा मा.यशराज देसाई यांनी केला सत्कार.

 

दौलतनगर दि.03 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- मरळी,ता.पाटण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची  पंचवार्षिक निवडणूक नुकतिच बिनविरोध पार पडली.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली नूतन संचालक मंडळामध्ये चंद्रकांत तानाजीराव देसाई,प्रविण लक्ष्मण पाटील,शंकर गणपत कदम,रामचंद्र खाशाबा कदम, भगवान परशूराम माने,संजय आण्णा कदम,सतिश किसनराव पाटील,श्रीपती पांडूरंग सुतार,शकुंतला बाळकृष्ण पवार,विमल तुकाराम गव्हाणे,ज्ञानदेव पांडूरंग गोसावी,शामराव विठ्ठल कांबळे,तुकाराम साधू पाटसुते हे नवनिर्वाचित संचालक बिनविरोध झाले.बिनविरोध झालेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार युवा नेते मा.यशराज देसाई याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मरळी विकास सेवा सोसायटीचे पंचवार्षिक निवडणूकीमध्ये बिनविरोध संचालकांचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते मा.यशराज देसाई,शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हा.चेअरमन राजाराम पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲङमिंलिंद पाटील,जिल्हा परिषद सदस्‍य विजय पवार,सुग्रा बशीर  खोंदू,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई,सुरेश पानस्कर,संतोष गिरी,सीमा मोरे,निर्मला देसाई,सुभद्रा शिरवाडकर,शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी अभिनंदन केले. मरळी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य जालंदर पाटील,पंचायत समिती सदस्य संतोष‍ गिरी,सरपंच राजेंद्र माळी,उपसरपंच विनोद कदम, भरत साळूंखे,गजानन पाटील,दिलीप कदम,साईनाथ सुतार,संजय सणस, सरपंच दिपक गव्हाणे,प्रशांत देसाई,विलास कदम,लक्ष्मण पवार, एकनाथ साळूंखे,सुनील साळूंखे,चंद्रकांत कदम,अशेाक कदम, ए.डी.पाटील,किरण सुतार,बाबूराव पाटील,सुखदेव गुरव,ज्ञानदेव चोपडे,सतिश कदम,शशिकांत चन्नने,दत्तात्रय पाटील,बळवंत कदम,आनंदराव देसाई,अनिल देसाई,अमोल मोहिते,राजेंद्र भालेकर,अर्जुन सत्रे,मच्छिंद्र साळूंखे,सुरेखा पाटील,मोहन गव्हाणे, संतोष देसाई,संजय पवार,संतोष पाटसुते आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.