दौलतनगर दि.12 (जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- गेल्या दोन
वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोविड 19
महामारीच्या अनुषंगाने विविध धार्मिक,राजकीय व विविध धर्माचे उत्सव यावर कडक
निर्बंध लागू करण्यात आले होते. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने
घालून दिलेल्या निर्बंधाची चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी करण्यात आल्याने तिसऱ्या लाटेचा संसर्ग
रोखण्यामध्ये यश आले आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची
जयंती शनिवार दि. 19
फेब्रुवारी रोजी साजरी होत असून छत्रपती
शिवाजी महाराज यांचा हा जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्याकरीता राज्य शासनाने
घातलेल्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात यावी अशी आग्रही विनंती महाराष्ट्र
राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे राज्याचे गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंनी लेखी पत्राव्दारे केली आहे.
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांना दिलेल्या लेखी विनंती पत्रामध्ये
गत दोन वर्षापासून राज्यात कोविड महामारीच्या अनुषंगाने विविध धार्मिक,राजकीय व
विविध धर्माचे उत्सव साजरे करणे यावर कडक निर्बंध लागू केले आहेत या सदरच्या
निर्बंधाची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यातील जनतेने यशस्वीपणे केली आहे.
त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यात राज्य शासनासह सर्वजण यशस्वी झालो आहोत. सध्या संक्रमणाचा दर कमी झाला
असला तरी खबरदारी म्हणून शासनाने काही निर्बंध हे आज देखील लागू केले आहेत.अशाच
पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती
शनिवार दि. 19
फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मोठया उत्साहात साजरी करण्याची भावना
शिवप्रेमींमध्ये आहे. मात्र कोविड महामारीच्या अनुषंगाने लागू असलेल्या
निर्बंधामुळे शिवप्रेमी व पोलीस विभागामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करणेबाबत तसेच शिवज्योत परवानगी
देणेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत काही निर्बंध व अटी शिथील केलेस
शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावण निर्माण होऊन शिवजयंती उत्साहात साजरी करणेस मदत
होईल याकरीता यंदाच्या वर्षीची शिवजयंती साजरी करताना शासनाने घालून दिलेल्या
निर्बंधामध्ये शासनाचे नियम पाळून थोडया फार प्रमाणात शिथीलता देण्यात यावी अशी
विनंती केली आहे.
No comments:
Post a Comment