दौलतनगर दि.10 (जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- महाराष्ट्र
राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदेसाहेब हे खाजगी कार्यक्रमासाठी पाटणच्या
दौऱ्यावर आले असता त्यांचे काल दि. 09
फेब्रुवारी झालेल्या वाढदिवसानिमित्त पाटण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व राज्याचे
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण शासकीय विश्रामगृह येथे पाटण विधानसभा
मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने शाल, श्रीफळ व भेट वस्तू देवून जाहीर सत्कार
केला. दरम्यान काल वाढदिवसानिमित्त गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी ठाणे
येथे नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे निवास्थानस्थानी जावून शाल, श्रीफळ व
भेट वस्तू देवून सत्कार करीत अभिष्टचिंतन केले होते.
आज
दि. 10 रोजी महाराष्ट्र
राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदेसाहेब हे खाजगी कार्यक्रमासाठी पाटणच्या
दौऱ्यावर आले होते याप्रसंगी पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने पाटण
शासकीय विश्रामगृह येथे हा वाढदिवस अभीष्टचिंतन समारंभ करण्यात आला. यावेळी गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचेसह मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवसेना
जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचे चेअरमन
अशोकराव पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,संचालक सोमनाथ खामकर,शिवशाही सरपंच
संघाचे अध्यक्ष विजय शिंदे,बशीर खोंदू,भरत साळूंखे,पांडूरंग शिरवाडकर,नाना
पवार,गणीभाई चाफेरकर,नाना कुंभार, मनोज पाटील, बबनराव भिसे,विजय जंबुरे-देशमुख व
पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिवसैनिक मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment