Monday 28 February 2022

विकासाच्या बाबतीत पाटण विधानसभा मतदारसंघ रोल मॉडेल बनविणार -गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई

 

 दौलतनगर दि.28 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण विधानसभा मतदारसंघात मतदारसंघाचा आमदार म्हणून सन 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या कालावधीत कोटयावधी रुपयांचा निधी शासनाकडून मंजुर करुन आणत मतदारसंघातील अनेक प्रलंबीत विकासकामे आपण मार्गी लावली.राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी माझेवर राज्याच्या पाच खात्याची जबाबदारी दिली आहे.त्यात वित्त विभागाची जबाबदारी माझेवर दिली असून या विभागाच्या माध्यमातून पाटण मतदारसंघात गत दोन वर्षात कोटयावधी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. विकासकामांच्या बाबतीत पाटण विधानसभा मतदारसंघ रोल मॉडेल बनविणार असल्याची ग्वाही  गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिली.

         गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत पाटण विधानसभा मतदारंसघात अर्थसंकल्पीय अधिवेशापुर्वी गत दोन दिवसापासून पुर्ण झालेल्या मोठमोठया कामांचे उदघाटन व मंजुर झालेल्या विविध विकासकामांची भूमिपुजनांचा कार्यक्रमांचा धडाका सुरु असून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे शुभहस्ते सांगवड येथील कोयना नदीकाठच्या संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ता, ग्रामपंचायत कार्यालय, अर्थसंकल्पातून मंजुर सूर्यंवंशीवाडी ते पापर्डे, माळवस्ती ते गव्हाणवाडी व मारुलहवेली ते तालुका हद्द साजूर रस्ता याचे भूमिपुजन शनिवारी पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे ग्वाही दिली.

            याप्रसंगी कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, शिवदौलत बँकेचे माजी चेअरमन ॲड मिलींद पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, माजी सदस्य बशीर खोंदू, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, माजी सदस्य ॲड दिपक जाधव तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

           याप्रसंगी बोलताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, सलग तिसऱ्यांदा पाटण विधानसभा मतदारसंघाचा आमदार होण्याची संधी मतदारसंघातील जनतेने मला दिली. जनतेचा विश्वास सार्थ करण्याचे काम पाटण मतदारसंघाचा आमदार म्हणून केले. आमदार म्हणून शासनाच्या तिजोरीतून कोटयावधी रुपयांचा निधी पाटण मतदारसंघातील विविध प्रलंबीत विकासकामांकरीता मंजुर करुन आणला. आज प्रत्यक्षात मोठया प्रमाणात प्रलंबीत राहिलेली विकासकामे मार्गी लागलेली आपणांस दिसून येत आहे. दोन वर्षापुर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी मला राज्याचे राज्यमंत्री करुन माझेवर राज्याच्या प्रमुखस पाच खात्यांची जबाबदारी दिली. ही जबाबदारी मी लिलया पेलत असून मंत्रीपदाचा फायदा मतदारसंघातील नागरिकांना तसेच जनतेच्या विकासकामांकरीता झाला पाहिजे या दृष्टीने आपण मतदारसंघात काम करीत आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्याचा वित्त राज्यमंत्री म्हणून मतदारसंघाला झुकते माप देण्याचा माझा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. दोन वर्षात कोटयावधी रुपयांचा निधी मतदारसंघातील विविध विकासकामांकरीता आणण्यात मला यश मिळाले आहे. गांवोगांवी, वाडीवस्तीवर विकासकाम पोहचविण्याचे काम आपण करीत असून पाटण मतदारसंघ हे विकासकामांच्या बाबतीत रोल मॉडेल बनविण्याकरीता माझा सातत्यांने प्रयत्न सुरु आहे. आज मागील पंचवार्षिकमध्ये तसेच मागील दोन वर्षात शासनाकडून मंजुर करुन आणलेल्या विविध कामे मोठया संख्येने मार्गी लागत आहेत याचा जनतेला लाभ होत आहे हे पाहून अत्यानंद होत आहे. मागेल त्या गावाला, वाडीवस्तीला काम देण्याचा आमदार आणि आता मंत्री म्हणून प्रयत्न राहिला आहे. या विविध विकासकामांच्या माध्यमातून गावे, वाडयावस्त्यांचा कायापालट झाल्याचे आपणांस दिसून येत आहे. गांवो गावी मोठया प्रमाणात एकी झाल्याने प्रलंबीत विकासकामे मार्गी लागण्यास चांगली मदत होत आहे. डोळयाला दिसेल असे काम करुन पाटण मतदारसंघ विकासकामांत अग्रेसर ठेवण्याकरीता अजुनही आवश्यक असणारा निधी मंजुर करुन प्रलंबीत सर्व कांमे मार्गी लावली जातील याकरीता आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

चौक्ट:- एकाच दिवशी 15 कोटी 55 लक्ष रुपयांच्या विकासकामांची भूमिपुजने.

             शनिवारी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या हस्ते मारुलहवेली विभागातील विविध विकासकामांची एकाच दिवशी 15 कोटी 55 लक्ष रुपयांच्या निधीची विकासकामांची भूमिपुजने करण्यात आली. एवढया मोठया निधीमुळे जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

No comments:

Post a Comment