दौलतनगर दि.14 (जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- महाराष्ट्राचे
आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवार दि. 19
फेब्रुवारी रोजी साजरी होत असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा जयंती सोहळा
उत्साहात साजरा करण्याकरीता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे
यांनी राज्य शासनाने कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर घातलेल्या निर्बंधामध्ये
विशेषबाब म्हणून अनुमती दिली आहे. शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्याकरीता
राज्य शासनाने घातलेल्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात यावी याबाबत महाराष्ट्र
राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे लेखी पत्राव्दारे ना.शंभूराज
देसाई यांनी केलेल्या आग्रही विनंतीवरुन आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती
निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या
शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि
जन्मोत्सव सोहळयाकरीता पाचशे जणांना सहभागी होता येणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री
ना.उध्दवजी ठाकरे यांनी शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी विशेष बाब म्हणून अनुमती
दिल्याबद्दल तमाम शिवप्रेमी यांचेवतीने मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आभार
मानले.
गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण
महाराष्ट्र राज्यात कोविड 19
महामारीच्या अनुषंगाने विविध धार्मिक,राजकीय उत्सव यावर कडक निर्बंध लागू करण्यात
आले होते. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या
निर्बंधाची चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी
करण्यात आल्याने तिसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यामध्ये यश आले.सध्या संक्रमणाचा
दर कमी झाला असला तरी खबरदारी म्हणून शासनाचे काही निर्बंध हे आज देखील आहेत.अशाच
पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती
शनिवार दि. 19
फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मोठया उत्साहात साजरी करण्याची शिवप्रेमींमध्ये
असलेली भावना लक्षात घेऊन कोविड
महामारीच्या अनुषंगाने लागू असलेल्या काही निर्बंध व अटी शिथील केलेस
शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावण निर्माण होऊन शिवजयंती उत्साहात साजरी करणेस मदत
होईल. याकरीता यंदाच्या वर्षीची शिवजयंती साजरी करताना शासनाने घालून दिलेल्या
निर्बंधामध्ये शासनाचे नियम पाळून थोडया फार प्रमाणात शिथीलता देण्यात यावी अशी
आग्रही विनंती राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई यांनी लेखी पत्राव्दारे केली होती.त्या
अनुषंगाने शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून
अनुमती देण्याचे प्रस्ताव गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्याचे
मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे सादर केला होता. त्यानुसार
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळयाकरीता पाचशे जणांना सहभागी
होण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी मान्यता दिली असून याबाबत
सर्व यंत्रणांनाही सुचित करण्यात आले आहे.या जयंती उत्सवासाठी विविध शिव
प्रेरणास्थळांवरून शिवज्योती आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योती दौडीत दोनशे
जणांना सहभागी होता येईल तसेच शिवजयंती सोहळा पाचशेच्या उपस्थिती मर्यादेत साजरा
करता येणार असून कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि
स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जयंती सोहळ्याचे क्षण साजरे करण्याचे आवाहन
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment