Tuesday 22 February 2022

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा मंत्रालयीनस्तरावर बैठकांचा धडाका. मुंबईतून मतदारसंघातील विविध घटनांवर बारकाईने लक्ष.

 

 

 मुंबई दि.23 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- गेले दोन दिवस राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी राज्यमंत्री म्हणून शासनाच्या वतीने विधानसभा सभागृहात देण्यात आलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्याकरीता मंत्रालयीनस्तरावर शासकीय बैठकांचा धडाकाच लावला होता.या बैठकांमधून दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्याच्या दृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करीत अनेक धोरणात्मक निर्णय ही घेतले आहेत. तसेच तीनचार दिवसापुर्वी मतदारसंघातील जनतेच्या समस्या जाणून घेणेकरीता जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सेाबत घेवून त्यांचे अध्यक्षतेखाली जनता दरबारही झाला यात त्यांनी जनतेच्या समस्यांची जागेवर सोडवणूक केली. दरबारात तब्बल 353 लेखी निवेदने दाखल झाली असून त्यावर कार्यवाही सुरु आहे.बैठकांकरीता मुंबईत असूनही त्यांचे मतदारसंघातील विविध घटनांवर बारकाईने लक्ष आहे.सोमवारी पाटण येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करुन तपास करण्याच्या तसेच दोषींवर कठोरात कठोर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर व पोलीस अधीक्षक सातारा यांना दिल्या आहेत. 

          मंत्रालयीन स्तरावर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकांमध्ये राज्य शासकीय कर्मचारी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबाला निवृत्ती वेतन आणि वैद्यकिय कारणास्तव कर्मचाऱ्यांने निवृत्ती घेतल्यास रुग्णता निवृत्ती वेतन लागू करणे. तसेच केंद्र शासनाच्या सेवानिवृत्ती योजनाप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही योजना लागू करण्यासंदर्भात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे या अभ्यासगटाच्या बैठकीत या अभ्यासगटाद्वारे वरील विषयासंदर्भात साकल्याने विचार करून निवृत्ती वेतन योजनेतील त्रुटी आणि शासनावर येणारा आर्थिक भार यासदंर्भात शासनास शिफारस करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईनी बैठकीत सविस्तर चर्चा करुन यावेळी सांगितले. राज्य शासनाच्या सेवेत सन 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन (NPS) योजनेतील (पूर्वीच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना- DCPS) त्रुटीचा अभ्यास करण्यासाठी  वित्त विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांचे अध्यक्षतेखाली हा अभ्यासगट शासनाच्या वतीने स्थापन करण्यात आला आहे.

                तसेच पोलीस पाटलांच्या शासनाकडे विविध प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भातही गृहराज्यमंत्री यांनी बैठक घेऊन राज्यातील पोलीस पाटील संघटनांच्या विविध मागण्यांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा केली.यामध्ये पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये वाढ करणे,शासनामार्फत विमा योजना सुरु करणे,निवृत्तीचे वय 60 वरुन 65 करणे,निवृत्ती नंतर ठोस रक्कम अथवा पेन्शन मिळणे,अनुकंपा तत्व लागू करणे,कर्तव्य बजावत असताना शहिद झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देणे,कोरोना काळात कर्तव्य बजावताना मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देणे,पोलीस पाटलांची रिक्त पदे भरती प्रक्रिया तातडीने राबविणे,पोलीस पाटलांचे मानधन वेळेत अदा करणे,उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस पाटलांना पुरस्कार देणे या विविध प्रमुख मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा पोलीस पाटील राज्य संघटनेच्यावतीने गृहराज्यमंत्री यांचेशी झाली.याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कार्यवाही करु असे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सांगीतले.या बैठकीस गृहमंत्री ना.दिलीपराव वळसे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

               त्याचबरोबर विधानसभा सभागृहात दिलेल्या आश्वासनानुसार पाटण मतदारसंघात कोयनानगर,ता.पाटण येथे लवकरात लवकर राज्य आपत्ती बचाव दलाची (SDRF) स्थापना करण्यासंदर्भात मंत्रालयस्तरावर  बैठक घेवून त्यांनी या प्रस्तावाचा सविस्तर आढावा घेतला यावेळी या बैठकीस मुख्य सचिव (सचिव) श्री.नितीन करीरसो, अप्पर पोलीस महासंचालक.(प्रशिक्षण) श्री.संजय कुमार, अप्पर पोलीस महासंचालक (नियोजन व समन्वय)संजय कुमार वर्मा, विशेष पोलिस महासंचालक(कायदा व सुव्यवस्था) श्री.सुहास वारके व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment