दौलतनगर दि.01:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर साखर कारखान्याची सन 2022-23 ते
2027-28 या कालावधीतील पंचावार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहिर
झाली होता. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आ.शंभूराज देसाई यांचे
नेतृत्वाखाली स्व.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलमधून 17 जागांसाठी 30 अर्ज दाखल झाले
होते.सोमवार दि.27 रोजी उमेदवारी अर्जांचे छाणणीमध्ये दाखल झालेले सर्व अर्ज वैध करण्यात
आले होते.तर दि.28 व 29 जून या अर्ज माघार घेण्याच्या पहिल्या दोन दिवशी 11 उमेदवारांनी
उमेदवारी अर्ज माघारी घेतले असल्याने लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे
संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूकीत 17 जागांसाठी 17 च अर्ज राहिल्यामुळे बिनविरोध
होण्याची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे.
दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक
मंडळाची पंचवार्षिक निवडणूकीकरीता सोमवार दि. 20 जून रोजी उमेदवारी अर्ज सादर करण्यास
सुरुवात झाली होती. दरम्यान या निवडणूकीसाठी ना.शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखाली स्व.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलमधून 17 जागांसाठी
केवळ 30 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवार दि. 27 जून रोजी झालेल्या उमेदवारी
अर्जांची छाननीत सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले. तर मंगळवार दि. 28 व बुधवार
दि. 29जून रोजी पहिल्या दोन दिवसांत 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने
ऊस उत्पादक सभासद प्रतिनिधींच्या 11 जागांसाठी आ.शंभूराज
शिवाजीराव देसाई,यशराज शंभूराज देसाई,अशोकराव अनंत पाटील,सोमनाथ हिंदुराव खामकर,प्रशांत
व्यंकटराव पाटील,शशिकांत मोहनराव निकम,सर्जेराव लक्ष्मण जाधव,पांडूरंग आण्णासो नलवडे,प्रशांत
राजाराम पाटील, सुनील शिवराम पानस्कर,बळीराम शंकर साळूंखे,महिला राखीव मधून दिपाली
विश्वास पाटील,जयश्री रामचंद्र कवर तर अनुसुचित जाती जमाती गटातून विजय मधुकर सरगडे , इतर मागासवर्गीय जागेसाठी शंकरराव
गणपतराव पाटील, विमुक्त जाती-भटक्या जमातीमधून एका जागेसाठी भागुजी विठ्ठल शेळके तर
सहकारी संस्था गटातून डॉ.दिलीपराव बापूराव चव्हाण या उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत.त्यामुळे
आता 17 जागांसाठी फक्त 17 उमेदवारी अर्ज राहिले
असल्याने लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख आ.शंभूराज
देसाई यांचे मार्गदर्शनाखाली प्रथमच कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रथमच बिनविरोध
होत असून केवळ आता औपचारिकता राहिली आहे.दि.12 जुलै रोजी निवडणुकीचे अर्ज माघारीचे
शेवटच्या दिवशी कारखाना निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहिर होणार आहे.
चौकट :-स्व.शिवाजीराव
देसाई यांचे पुण्यतिथी दिवशीच युवा नेते यशराज देसाई यांची कारखान्यात एन्ट्री.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी
मरळीच्या माळरानावर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची मुहुर्तमेढ रोवली.स्व.शिवाजीराव
देसाई(आबासाहेब)यांनी हा कारखाना कर्जमुक्त करुन तो शेतकऱ्यांच्या मालकीचा होण्यासाठी
अहोरात्र कष्ट घेतले.त्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई यांचे
विचारांचा वारसा जोपासत आ.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली चांगल्या पध्दतीने वाटचाल
सुरु आहे.दरम्यान लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे पंचवार्षिक निवडणूकीत
बिनविरोध होणाऱ्या संचालक मंडळामध्ये पदार्पणातच युवा नेते यशराज देसाई यांची बिनविरोध
संचालक म्हणून झालेली निवड ही स्व.शिवाजीराव देसाई यांचे दि.12 जुलै रोजीचे पुण्यतिथी
दिवशी घोषीत करण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. युवा नेते यशराज देसाई यांचे रुपाने देसाई कुटुंबियांची
चौथी पिढी या कारखान्याचे कामकाज पाहणार असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद व शेतकरी
यांच्यासह देसाई गटामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
चौकट:- ऊस उत्पादक
सभासद,शेतकरी यांचा विश्वास सार्थ ठरविणार- युवा नेते यशराज देसाई.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी
साखर कारखान्यामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई,स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे
विचारांचा वारसा जोपासत आ.शंभूराज देसाई यांनी कारखान्यामध्ये काटकसरीचे धोरण राबवित
पारदर्शकता ठेवत आजपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले.त्यामुळे ऊस उत्पादक
शेतकरी यांच्यामध्ये अढळ विश्वास असल्याने कारखाना संचालक मंडळाची निवडणूक सर्व सभासदांनी
आ.शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखाली प्रथमच बिनविरोध केली आहे.यापुढेही कारखाना कार्यक्षेत्रातील
ऊस उत्पादक सभासद यांचे हिताचेदृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेऊन कारखान्याचे कामकाज
चांगल्या प्रकारे पुढे चालविण्याचा मानस आहे.कारखाना निवडणूक प्रथमच बिनविरोध करत कारखाना
कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद यांनी कै.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलवर जो विश्वास
दाखवला आहे,तो विश्वास सार्थ करणार असल्याचे सांगत अल्पावधीतच कारखान्यामध्ये आमुलाग्र
बदल करुन ऊस उत्पादक सभासद शेतकरी व अधिकारी,कर्मचारी यांचे प्रगतीसाठी प्रयत्नशील
राहणार असल्याचे युवा नेते यशराज देसाई यांनी यावेळी सांगीतले.
No comments:
Post a Comment