दौलतनगर दि. 12 :- गेल्या चार
ते पाच दिवसांपासून पाटण तालुक्यात मोठया प्रमाणांत अतिवृष्टी होत आहे.गतवर्षी
माहे जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन धोकादायक स्थितीत असलेल्या जिंती गावांतर्गत येणाऱ्या जितकरवाडीचे तात्पुरते स्थलांतर
करण्यात आले होते.यंदाही अतिवृष्टीमुळे धोकादायक असलेल्या जितकरवाडी येथील कुटुंबांचे
तालुका प्रशासनामार्फत मौजे जिंती येथील प्राथमिक शाळेमध्ये तात्पुरते स्थलांतर करण्यात
आले.तात्पुरते स्थलांतरीत केलेल्या जितकरवाडी येथील कुटुंबियांना युवा नेते यशराज देसाई
यांनी आज भेट देऊन या कुटुंबांची आस्थेवाईपणे विचारपूस केली.यावेळी उपविभागीय अधिकारी
सुनील गाडे,तहसिलदार रमेश पाटील,मनोज मोहिते,नाना साबळे, जोतिराज काळे,प्रशांत घार्गे
पंकज जानूगडे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे
की, सध्या पाटण तालुक्यामध्ये मोठया प्रमाणांत अतिवृष्टी सुरु असून डोंगरी व दुर्गम
भागामध्ये वसलेल्या गावांना दरड तसेच डोंगराचा कडा कोसळण्याचा संभाव्य धोका ओळखून तालुका
प्रशासनाने वेळीच या धोकादायक स्थितीमध्ये असलेल्या गावांचे सुरक्षित स्थळी तात्पुरते
स्थलांतर करण्यात येत आहे. गतवर्षी माहे जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये
तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागात अनेक ठिकाणी
भूस्खलन होऊन जिवीत व सार्वजनिक मालमत्तेची मोठया प्रमाणांत हानी झाली होती.यामध्ये
जितकरवाडी येथेही भूस्खलन होऊन या गावातील कुटुंबांना स्थलांतरीत व्हावे लागले होते.
चालुवर्षी ही गेले चार ते पाच दिवसापासून पाटण तालुक्यामध्ये सुरु असलेल्या मुसळधार
पावसामुळे संभाव्य भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन जितकरवाडी येथील सुमारे 30 कुटुंबियांना
तालुका प्रशासनाने जिंती येथील प्राथमिक शाळेमध्ये स्थलांतरीत केले.आज मंगळवारी पाटण
तालुक्याचे युवा नेते यशराज देसाई यांनी जितकरवाडीच्या स्थलांतरीत कुटुंबियांची जिंती
येथे जाऊन प्रत्यक्ष भेटून आस्थेवाईपणे विचारपूस केली.स्थलांतरीत केलेल्या ठिकाणी आवश्यक
असणारे साहित्य लवकरच कार्यकर्त्यामार्फत पोहोच केले जाईल.तसेच आमदार शंभूराज देसाई
हे जितकरवाडी गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे
सांगत स्थलांतरीत केलेल्या ठिकाणी काही सोयी-सुविधा अपुऱ्या आहेत का याची विचारणा त्यांनी येथील कुटुंबियांना काही अडचणी असल्यास जरुर कळविण्याचे
त्यांनी यावेळी जितकरवाडी ग्रामस्थांना सांगीतले.युवा नेते यशराज देसाई यांनी स्थलांतरीत
कुटुंबियांची भेटून विचारपूस केल्याने जिंती व जितकरवाडी ग्रामस्थांमध्ये समाधानाचे
वातावरण होते.
चौकट : आमदार शंभूराज देसाई यांचे
सारखीच मा.यशराज देसाई यांची तत्परता.
कालच माजी गृहराज्यमंत्री आमदार शंभूराज देसाई यांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्याने ते गृहविलगीकरणामध्ये सुरुची शासकीय निवासस्थान मुंबई येथे आवश्यक ते औषधोपार घेत असल्याने अतिवृष्टी असूनही तालुक्यामध्ये येता आले नाही.याऊलट गतवर्षी अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये आमदार शंभूराज देसाई यांनी पायाला भिंगरी लावून अतिवृष्टी बाधित गावांचे दौरे करुन तातडीने उपाय योजना केल्या होत्या.तर आज स्व.शिवाजीराव देसाई यांचा नियोजित पुण्यतिथी कार्यक्रम असतानाही युवा नेते यशराज देसाई यांनी प्रथम ढेबेवाडी विभागाचा दौरा करत जितकरवाडी येथील स्थलांतरीत कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.नंतर ते पुढील कार्यक्रमासाठी निघून आले.यावरुन आमदार शंभूराज देसाई यांचे सारखीच मा.यशराज देसाई यांची तत्परता असल्याचे आज दिसून आले.
No comments:
Post a Comment