Wednesday 13 July 2022

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचे संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध. नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पणतू यशराज देसाई यांची दमदार एन्ट्री.

 

      

दौलतनगर दि.13:- पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर साखर कारखान्याची सन 2022-23 ते 2026-27 या कालावधीतील पंचावार्षिक संचालक मंडळाची निवडणुक  अखेर बिनविरोध झाल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले असून यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी घोषणा केली. दरम्यान या निवडणुकीत आमदार शंभूराज देसाई आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पणतू यशराज देसाई यांच्या सहीत १५ संचालकांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले.

दौलतनगर,ता. पाटण तालुक्यातील ऊस सभासद शेतकऱ्यांची अर्थवाहिनी समजली जाणारे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल ऐन पावसात वाजला होता. गत जून महिन्याचे  20 तारखेपासून उमेदवारी अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान या निवडणूकीसाठी ना.शंभूराज देसाई मार्गदर्शनाखाली युवा नेते यशराज देसाई यांनी या निवडणूकीची धुरा सांभाळली स्व.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलमधून 17 जागांसाठी अर्ज दाखल झाले होते.त्यानंतर  झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननीत सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले. तर अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत स्व.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलचे 17 च अर्ज राहिल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

दरम्यान लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर साखर कारखान्याची निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर आमदार शंभूराज देसाई हे महाराष्ट्रामध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे मतदारसंघामध्ये नव्हते.त्यांचे पश्चात आमदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे पुत्र यशराज देसाई यांनी कारखाना निवडणूकीची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेऊन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीपासून ते उमेदवारांच्या निवडीपर्यंत बारकाईने अभ्यास करत ही निवडणूक नुसतीच पार पाडली नाही तर बिनविरोध करण्यात त्यांना यश आले. यामध्ये यशराज देसाई यांनी पहिल्यापासून कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांचा विचार करुन आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलमध्ये सर्वसमावेशक उमेदवार निवडले.यामध्ये ऊस उत्पादक सभासद प्रतिनिधींमधून आमदार शंभूराज शिवाजीराव देसाई,यशराज शंभूराज देसाई,अशोकराव अनंत पाटील,सोमनाथ हिंदुराव खामकर,प्रशांत व्यंकटराव पाटील,शशिकांत मोहनराव निकम,सर्जेराव लक्ष्मण जाधव,पांडूरंग आण्णासो नलवडे,प्रशांत राजाराम पाटील,सुनील शिवराम पानस्कर,बळीराम शंकर साळूंखे,महिला राखीव मधून सौ. दिपाली विश्वास पाटील,श्रीमती जयश्री रामचंद्र कवर तर अनुसुचित जाती जमाती गटातून विजय  मधुकर सरगडे , इतर मागासवर्गीय जागेसाठी शंकरराव गणपतराव पाटील, विमुक्त जाती-भटक्या जमातीमधून एका जागेसाठी भागुजी विठ्ठल शेळके तर सहकारी संस्था गटातून डॉ.दिलीपराव बापूराव चव्हाण हे बिनविरोध संचालक  झाले.
          दरम्यान लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख आ.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली प्रथमच कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रथमच बिनविरोध झाली असून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक  बिनविरोध  झालेबद्दल  कारखाना  कार्यक्षेत्रातील  सर्व  सभासद  शेतकरी, हितचिंतक, पदाधिकारी  व कार्यकर्ते यांचे लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग समुहाचे प्रमुख,माजी गृहराज्यमंत्री आमदार शंभूराज देसाई,युवा नेते यशराज देसाई यांचेसह नवनिर्वाचित संचालक मंडळाने जाहिर आभार मानले.

चौकट:-. योगायोग आणि बिनविरोध एन्ट्री..!

           स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना उभा केला तो कर्जमुक्त करुन शेतकऱ्यांच्या सभासदांच्या मालकीचा केला.तद्नंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख राज्याचे माजी गृहराज्यमंत्री  आमदार शंभूराज देसाई यांनी तालुक्यातील विरोधकांशी संघर्ष करत हा कारखाना नावारुपाला आणला. स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे  दि.12 जुलै रोजीचे पुण्यतिथी दिनी कारखाना निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषीत केले.व याच दिवशी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे  नातू युवा नेते यशराज देसाई यांची कारखान्याचे संचालक म्हणून दमदार अशी बिनविरोध एन्ट्री  झाल्याने हा अनोखा योगा-योग पुण्यतिथी दिवशी जुळून आला.

No comments:

Post a Comment