Friday 8 July 2022

शिवशाही सरपंच संघाकडून आयोजित स्व.शिवाजीराव देसाई शिवशाही आदर्श ग्राम व आदर्श सरपंच स्पर्धा पुढे ढकलली.

 


दौलतनगर दि.08 :- दि. 12 जुलै,2022 रोजी शिवशाही सरपंच संघाचा प्रथम वर्धापन दिन असून या वर्धापन दिनानिमित्त गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली युवा नेते यशराज देसाई यांचे संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व पातळीवर चांगले काम करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना स्व.शिवाजीराव देसाई शिवशाही आदर्श ग्राम पुरस्कार व पहिल्या तीन सरपंचांना "स्व.शिवाजीराव देसाई शिवशाही आदर्श सरपंच पुरस्कार"  स्व.शिवजीराव देसाई (आबासाहेब) यांचे दि. 12 जुलै रोजीचे पुण्यतिथी व शिवशाही सरपंच संघाच्या वर्धापन दिन कार्यक्रमप्रसंगी मा.गृहराज्यमंत्री आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते देण्याचे नियोजित होते.परंतु पाटण विधानसभा मतदार संघात गत पाच दिवसापासून पावसाचे प्रमाण वाढले असून पुढील पाच दिवसमध्ये पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्यामार्फत दिल्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असून, मतदारसंघामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर स्पर्धेचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे व शिवशाही सरपंच संघाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

             प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे दि. 12 जुलै,2021 रोजीचे पुण्यतिथी दिवशी महाराष्ट्र राज्याचे मा.गृहराज्यमंत्री आ.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शिवशाही सरंपच संघ पाटण विधानसभा या सरपंच संघाची स्थापना करण्यात आली.यंदा दि. 12 जुलै,2022 रोजी शिवशाही सरपंच संघाचा प्रथम वर्धापन दिन असून या वर्धापन दिनानिमित्त मा.गृहराज्यमंत्री आ.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली युवा नेते यशराज देसाई यांचे संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व पातळीवर चांगले काम करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना स्व.शिवाजीराव देसाई शिवशाही आदर्श ग्राम पुरस्कार व पहिल्या तीन सरपंचांना "स्व.शिवाजीराव देसाई शिवशाही आदर्श सरपंच पुरस्कार" स्व.शिवजीराव देसाई (आबासाहेब) यांचे दि. 12 जुलै रोजीचे पुण्यतिथी व शिवशाही सरपंच संघाच्या वर्धापन दिन कार्यक्रमप्रसंगी मा.गृहराज्यमंत्री आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते देण्याचे नियोजन केले होते.परंतु गेल्या पाच दिवसांमध्ये मतदारसंघामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या ग्रामपंचायतींना तसेच सरपंच यांना स्पर्धेकरीता असलेले नियमांचे अंमलबजावणी करण्याकरीता अडचणी  येत आहेत. तसेच या स्पर्धेकरीता शासकीय अधिकाऱ्यांची निवड समिती असून सध्या मतदारसंघात आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याकरीता करावयाच्या उपाय योजनांचे अंमलबजावणीमध्ये सर्व शासकीय अधिकारी काम करत आहेत. त्यामुळे ही स्पर्धा तुर्त पुढे ढकलण्यात आली असून मतदारसंघामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर या स्पर्धेचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे व शिवशाही सरपंच संघाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

No comments:

Post a Comment