Thursday 28 December 2023

पाटण नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेला अमृत 2.0 योजनेअंतर्गत मिळणार 19 कोटी 70 लाखाचा निधी. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे पाठपुराव्याला यश.




दौलतनगर दि.28: पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला अमृत 2.0 कार्यक्रमांतर्गत मंजूरी मिळण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री  ना. शंभूराज देसाई यांनी केल्या होत्या.त्यानुसार पाटण नगरपंचायत व महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाने पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा सुधारित अंदाजपत्रके आराखडयासह असणारा प्रस्ताव तांत्रिक मंजूरीसाठी प्रस्तावित केला होता. त्यानुसार अमृत 2.0 या योजनेअंतर्गत पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारित 19 कोटी 69 लक्ष 52 हजार इतक्या अंदाजपत्रकीय रक्कमेच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता देण्यात आली असून लवकरच पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाकरीता प्रशासकीय मान्यता मिळणेबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर नगर विकास विभागाकडे दाखल केला असून राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे या नळ योजनेच्या प्रस्तावाला तातडीने मंजूरी मिळण्याची विनंती ना.शंभूराज देसाई करणार असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली असून पाटण नगरपंचायतीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे.

                 पाटण नगरपंचायती  अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने  पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांची पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत होती. ऐन पावसाळयामध्ये पाटण शहारामध्ये टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ पाटण वासियांवर आली होती. दैनंदिन पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे पाटण येथील स्थानिक नागरिकांचे मोठे हाल होत होते.त्यामुळे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण नगरपंचायती अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर होण्याकरीताचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पाटण नगरपंचायत व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाटण शहारांतर्गत नव्याने कार्यान्वित करावयाच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे सर्व्हेक्षण करुन रक्कम रुपये 21 कोटी 44 लाख 57 हजार रुपयांचा सुधारित आराखडा तयार करुन संबंधित विभागाकडे दाखलही करण्यात आला. दाखल प्रस्तावावर पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  संबंधित विभागाचे मुख्य अभियंता यांना तांत्रिक मान्यता देण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या.त्यानुसार राज्य उच्चाधिकार सुकाणू समितीने शिफारस केल्यानुसार पाटण नगरपंचायतीचे नविन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी 19 कोटी 70 लक्ष रुपये तत्वत: मंजूर केले असून या  नळ पाणी पुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकाची विभागीय आणि मंडळ स्तरावर तपासणीही करण्यात आली आहे.तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कराड विभाग आणि मंडळ कार्यालय पुणे यांनी तांत्रिक मंजूरीसाठी सादर आणि शिफारस केलेल्या या प्रस्तावाच्या अनुषंगाने पाटण नगरपंचायतीने सादर केलेल्या पाटण येथील नवीन नळ पाणी पुरवठा येाजनेच्या अंदाजपत्रकाच्या  19 कोटी 69 लक्ष 52 हजार इतक्या अंदाजपत्रकीय रक्कमेला  सुधारित तांत्रिक मान्यता दिली असल्याचे सांगत पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी नगरविकास विभागाकडील पाटण नगरपंचायतीचे नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रशासकीय मान्यतेकरीता नगरविकास विभागाकडे दाखल प्रस्तावाबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे तातडीने मान्यता मिळण्यासाठी विनंती केलेली असून पाटण येथील नवीन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला लवकरच शासनस्तरावर मान्यता मिळणार असल्याने पाटण नगरपंचायत हद्दीतील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

Thursday 14 December 2023

एडीबी अर्थसहाय्य योजनेतून मल्हारपेठ मसूर मायणी राज्यमार्गासाठी 480 कोटींचा निधी मंजूर. मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश.



दौलतनगर दि.14: पाटण विधानसभा मतदारसंघातून सुरु होणारा मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा राज्य मार्ग क्रमाक 143 वाहतूकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून मुंबई पुणे बेंगलोर आशियाई महामार्ग व विजापूर कराड चिपळूण गुहाघर राष्ट्रीय महामार्ग या दोन महामार्गांना जोडणाऱ्या या  राज्यमार्गावर दैनंदिन वाहतूक मोठया प्रमाणांत सुरु असते. या राज्य मार्गावरील पंढरपूर ते मायणी या रस्त्याचे काम पुर्ण झाले असून मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर मधील लांबीतील रस्ता खराब झाल्याने दळण वळणाची मोठी गैरसोय होत होती. मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर या राज्य मार्गाचे मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे लांबीची सुधारणा करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आग्रही विनंती  करत या रस्त्याचे कामाला निधी मंजूर होण्यासाठी गेली दिड वर्ष सातत्याने पाठपुरावा करत होते.त्यानुसार मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा राज्य मार्ग क्रमाक 143 मधील मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे लांबीची सुधारणा करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून 480 कोटी  रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

                   सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातून सुरु होणारा मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा रस्ता राज्यमार्ग क्रमांक 143 आहे. सदर रस्ता मुंबई पुणे बेंगलोर आशियाई महामार्ग व विजापूर कराड चिपळूण गुहाघर राष्ट्रीय महामार्ग या दोन महामार्गांना जोडणारा तसेच सातारा,सांगली व सोलापूर या तिन्ही जिल्हयातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर साखर कारखाने व इतर महत्त्वाचे उद्योगधंदे तसेच मोठया लोकसंख्येची मुख्य बाजारपेठा असलेली गावे आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मोठया प्रमाणांत वाहतूक वर्दळ असते. दरम्यान या रस्त्याचे मार्गावरील मायणी ते पंढरपूर या सोलापूर जिल्हयातील लांबीचे काम नुकतेच पूर्ण झालेले असून सातारा जिल्हयातील मल्हारपेठ ते मायणी ही 60 किलोमिटर लांबी खराब झालेली असल्याने या मार्गावरुन ये-जा करताना वाहनधारकांसह प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर या राज्य मार्गाचे मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे लांबीची सुधारणा करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी गत दिड वर्षापासून आग्रहाची विनंती केलेली होती. त्यानुसार मल्हारपेठ पंढरपूर या मार्गावरील  मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर खराब लांबीचे सविस्तर सर्वेक्षण (DPR) तयार करण्यात येऊन मल्हारपेठ ते मायणी या रस्त्याचे लांबीचे 480 कोटी किंमतीचे अंदाजपत्रक मंजूरी साठी सादर करण्यात आल्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे ना.शंभूराज देसाई यांनी गत दिड वर्षापासून पाठपुरावा करत होते. त्यानुसार मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा राज्य मार्ग क्रमाक 143 मधील मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे लांबीची सुधारणा करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून 480 कोटी  रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून  मल्हारपेठ ते मायणी या खराब लांबीचे नुतनीकरण झाल्यानंतर मल्हारपेठ ते पंढरपूर ही सलग लांबी वाहतुकीसाठी सोईची होणार आहे.दरम्यान एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून मंजूर मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा राज्य मार्ग क्रमाक 143 मधील मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे मंजूर 480 कोटी  रुपयांचे कामाची निविदा प्रक्रिया तातडीने करण्यात येऊन मंजूर असलेले काम लवकरात लवकर सुरु करण्याच्या सूचना ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकारी यांना केल्या असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत नमूद केले आहे.

Tuesday 12 December 2023

माहे डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 40 कोटींचा निधी मंजूर.

 

 

दौलतनगर दि.12: पाटण विधानसभा मतदारसंघातील दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेलया राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे व पूलांचे पुनर्बांधणीचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, ना.अजितदादा पवार  व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचेकडे शिफारस केली होती.सध्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील  राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

               प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले की, पाटण विधानसभा मतदारसंघातील दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेलया राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे मोठे प्रमाणांत नुकसान झाले होते.त्यामुळे या रस्त्यांवरुन  प्रवास करताना अनेक अडचणी येत होत्या. या राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे तसेच बाचोली व खळे येथील पुलांचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, ना.अजितदादा पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचेकडे शिफारस केली होती. त्यानुसार नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा-58 कि.मी. 14/00 ते 17/00 ची सुधारणा करणे (भाग- दिवशी घाट) 02 कोटी, बनपुरी अंबवडे कोळेकरवाडी उमरकांचन  रस्ता प्रजिमा 125 कि.मी. 0/00 ते 13/00 (भाग कि.मी.7/00 ते 10/00 - जौंजाळवाडी ते  अंबवडेफाटा) ची रुंदीकरणासह सुधारणा 02 कोटी, चरेगांव चाफळ दाढोली महाबळवाडी येरफळे त्रिपुडी चोपडी बेलवडे आंब्रुळे कुसरुंड नाटोशी रस्ता प्रजिमा 53 कि.मी. 40/00 ते 42/00  ची सुधारणा 03 कोटी, मानेगांव ते कुंभारगाव गलमेवाडी रस्ता प्रजिमा 56 कि.मी. 3/00 ते  6/700 (कुंभारगांव ते  गलमेवाडी) ची सुधारणा 02 कोटी, भोसगांव आंब्रुळकरवाडी नवीवाडी रुवले कारळे पानेरी रस्ता प्रजिमा 122 कि.मी.0/00 ते 22/500 (भाग कि.मी.12/00 ते 17/00-(कारळे ते तामिणे ) ची  रुंदीकरणासह सुधारणा 02 कोटी, बनपूरी आंबवडे कोळेकरवाडी उमरकांचन रस्ता प्रजिमा 131 कि.मी.6/500 ते 11/500 ची सुधारणा 02 कोटी, चरेगाव चाफळ रस्ता प्रजिमा 53 कि.मी.12/00 ते 15/300 मध्ये घाट लांबीतील सुधारणा 02 कोटी, चरेगाव चाफळ रस्ता प्रजिमा 53 कि.मी.5/600 ते 12/00 भाग चाफळ ते दाढोली रस्त्याची सुधारणा 2.50 कोटी, कोंजवडे भुडकेवाडी वरची केळेवाडी प्रजिमा 129 कि.मी.5/00 ते 10/00 मध्ये सुधारणा 02 कोटी, काटेवाडी आवर्डे मुरुड मालोशी प्रजिमा 134 कि.मी.04/00 ते 7/00 मध्ये रुंदीरकरणासह सुधारणा 2.50 कोटी, मल्हारपेठ मंद्रुळहवेली पानस्करवाडी जमदाडवाडी नवसरवाडी प्रजिमा 133 कि.मी.0/00 ते 2/00 भाग मल्हारपेठ ते जमदाडवाडी रस्त्याची सुधारणा 2 कोटी, रामा 04 ते वराडे भोळेवाडी ते रामा 136 ते साकुर्डी तांबवे सुपने जुनी पाडळी गावठाण ते वारुंजी ते रामा 136 रस्ता प्रजिमा 79 व किमी 16/500 ते 19/00 भाग सुपने पूल ते जुनी पाडळी ची सुधारणा 2 कोटी, मल्हारपेठ पंढरपूर रस्ता रामा 143 कि.मी.02/600 ते 6/00, 9/00 ते 1/800 भाग ऊरुल फाटा ते भोळेवाडी फाटा व कळंत्रेवाडी फाटा ते उंब्रज ची सुधारणा   02 कोटी, पाटण मणदुरे जळव तारळे रस्ता रामा 398 कि.मी.4/00 ते 5/00 व 18/00 ते 24/00 भाग बिबी ते देवघर फाटा व जळवखिंड ते मरळोशी ची सुधारणा 02 कोटी, प्रजिमा-55 ते  बाचोली पोहोच  रस्ता  ग्रामा. 289 वर बाचोली येथे वांग नदीवर मोठा पुल 05 कोटी,खळे पोहोच रस्ता ग्रा.मा.  323 वर    कि.मी. 0/800   येथे खळे गावाजवळ  वांग नदीवर  मोठा पुल 05 कोटी या कामांना सध्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील  राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

Monday 4 December 2023

गोकूळ तर्फ हेळवाक येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास मान्यता. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नांना यश.

 

दौलतनगर दि.04 :- पश्चिम महाराष्ट्रातील सातारा,सांगली कोल्हापूर व कोकण भागामध्ये प्रतिवर्षी येणाऱ्या आपत्तींना सामोरे जाणेसाठी तसेच आपदग्रस्तांना तातडीने  मदत देण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे सातत्याने मागणी केली होती. दरम्यान महसूल व वन विभागाचे दि.23.05.2023 रोजीच्या शासन ज्ञापनान्वये राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी मौजे गोकूळ तर्फ हेळवाक(कोयनानगर) येथील 38.93 हेक्टर आर क्षेत्र गृह विभागास प्रदान करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली होती.तर राज्य शासनाचे गृहविभागाने दि. 04 डिसेंबर 2023 रोजी पारित केलेल्या शासन निर्णयानुसार गोकूळ तर्फ हेळवाक येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक पदनिर्मिती, साधनसामुग्री व वाहन खरेदी आणि इमारत बांधकाम इत्यादीबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यास मंजूरी दिली असून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नाने राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी मौजे गोकूळ तर्फ हेळवाक(कोयनानगर) येथील 38.93 हेक्टर आर क्षेत्रावर लवकरच राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र या दोन कार्यालयांची उभारणीचे कामकाजाला सुरुवात होणार आहे.

                 पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे तसेच कोयना धरणाचे पाण्यासाठयाचे विसर्गामुळे प्रतिवर्षी  पूरपरिस्थिती  निर्माण होत असून दळण वळण ठप्प होऊन येथील नागरीकांचे मोठया प्रमाणांत हाल होत असतात. या फटका पश्चिम महाराष्ट्रातील सातारा,सांगली,कोल्हापूर या जिल्हयांना प्रतिवर्षी बसून महापूर परिस्थिती निर्माण होत असते. कोकण विभागातील रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हांतील समुद्र किनार पट्टीच्या भागात चक्रीवादळाने आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होत असल्याने या भागात तातडीने मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल तात्काळ उपलब्ध होण्याचे दृष्टीने पाटण विधानसभा मतदारसंघातील गोकूळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासंदर्भात ना.शंभूराज देसाई हे यापुर्वीच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री असताना सातत्याने आग्रही होते. त्याच पार्श्वभूमीवर ना. शंभूराज देसाई यांनी महसूल व गृह विभागाच्या सर्व संबंधित अधिकारी यांचेसमवेत सदर राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारावयाच्या प्रस्तावीत गोकूळ तर्फ हेळवाक(कोयनानगर) येथील जागेची पाहणी करुन या ठिकाणी सदरची दोन्ही शासकीय कार्यालये उभारण्यास मंजूरी मिळण्याकरीताचा प्रस्ताव तातडीने राज्य शासनाचे संबंधित विभागाकडे सादर करण्याच्या सूचनाही ना.शंभूराज देसाई यांनी केल्या होत्या. तद्नंतर ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मंत्रालयीन स्तरावर संबंधित शासकीय विभागाच्या बैठकाही झाल्या होत्या. पाटण तालुका भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने आणि कोकण विभागातील रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील समुद्रकिनार पट्टीच्या भागात चक्रीवादळाने आपत्तीजनक परिस्थिती उद्भवत असल्याने या भागात तातडीने मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल व सद्यस्थितीत पोलीस प्रशिक्षण केंद्रांची मोठी मदत होणार असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपदग्रस्तांना कमी कालावधीमध्ये तात्काळ सेवा देण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

चौकट:- ना.शंभूराज देसाई यांचे दूरदृष्टीने पश्चिम महाराष्ट्र व कोकणासाठी महत्त्वाची दोन कार्यालये होणार.

पाटण विधानसभा मतदारसंघ हा डोंगरी व दुर्गम भागात वसलेला अतिवृष्टीचा व भूकंपप्रवण तालुका म्हणून ओळखला जातो.प्रतिवर्षी मतदारसंघात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे तसेच अतिवृष्टीच्या कालावधीत कोयना धरणातून मोठया प्रमाणांत होणाऱ्या विसर्गाने पश्चिम महाराष्ट्रातील सातारा,सांगली व कोल्हापूर जिल्हयात पूर परिस्थिती निर्माण होत असते. तर  कोकण विभागातील रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील समुद्रकिनार पट्टीच्या भागात चक्रीवादळाने व अतिवृष्टीमुळे आपत्तीजनक परिस्थिती उद्भवत असते.या आपत्काली परिस्थितीमध्ये तात्काळ मदत होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण विभागाच्या मध्यतर्वी असलेल्या गोकूळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) या ठिकाणी ना.शंभूराज देसाई यांचे दूरदृष्टीने  राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र या दोन शासकीय कार्यालये होणार आहेत.

 

चौकट:- याबाबत मा. ना. शंभूराज देसाई म्हणाले की, कोयनानगर येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास मान्यता मिळाली, याचा आनंद आहे. याबाबत सकारात्मक विचार करून मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मा. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी मान्यता दिल्याबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. लवकरच सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे आपत्ती प्रतिसाद दल आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारले जाईल, असा विश्वासही मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी व्यक्त केला.

Friday 1 December 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजना अंतर्गत पाटण विधानसभा मतदार संघातील 45 गावातील 104 कि.मी.अंतराच्या पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूरी

 


दौलतनगर दि.02 :- पाटण या डोंगरी व दुर्गम भागामधील अनेक गांवामध्ये शेत पाणंद रस्ते अरुंद व ना दुरुस्त असल्याने या रस्त्यावरुन शेतीशी निगडीत  विविध बाबींसाठी कमी प्रमाणात या रस्त्यावरुन वहिवाट होत होती शेतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागणे गरजेचे असल्याने पाटण मतदारसंघातील शेत/पाणंद रस्त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील 45 गावातील तब्बल 104 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार  पाटण मतदारसंघातील 45 गावातील सुमारे 104 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश हा मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या आराखडयामध्ये समावेश करत या शेत/पाणंद रस्त्यांना मंजूरी देण्यात आली असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे नियोजन विभाग(रोहयो) यांनी पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य असून राज्यातील शेतकरी हिताच्यादृष्टीने अनेक निर्णय राज्य शासनाचेवतीने घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना शेतीचे मशागतीचे साहित्य व शेत मालाची वाहतूक करण्यासाठी शेत पाणंद रस्त्यांची सुविधा नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेत पाणंद रस्त्यांची कामे झाल्यास शेतकऱ्यांच्या बांधावर वाहन जाऊन शेती विषयक कामे जलदगतीने पुर्ण होण्यास मदत होणार आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची शेत/पाणंद रस्त्यांअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्य शासनाच्या रोजगार हमी विभागाकडे शेत/पाणंद रस्ते मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सन 2021-22 व सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये मातोश्री  ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील तब्बल 90 गावांतील 105 कि.मी. लांबीच्या शेत पाणंद रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. 

तसेच सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या आराखडयांतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील 45 गावांतील तब्बल 104 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश करुन या कामांना मंजूरी देण्यात आली आहे.मंजूरी देण्यात आलेल्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांमध्ये येरफळे काळवट दरा ते दरा,काळवट ते काळंबा पाणंद रस्ता 1.5 कि.मी., कोरिवळे ते पाळेकरवाडी  पाणंद रस्ता 1.5 कि.मी.,जमदाडवाडी नारळवाडी मधुकर चव्हाण यांचे शेतापासून श्रीधर पाटील यांचे शेतापर्यंतचा पाणंद रस्ता 1 कि.मी.,जाळगेवाडी मारुती मंदिर ते भैरोबा पाणंद रस्ता 2 कि.मी.,नाडे नविन गावठाण ते शेरीपाणंद 01 कि.मी.,नाडे कराड चिपळूण रोड ते नलवडे पाणंद रस्ता 1 कि.मी.,नाडे बौध्दवस्ती ते चावर शिवार पाणंद रस्ता 1 कि.मी.,बनपूरी सुरेशकुंभार यांचे घर ते नदीपर्यंतचा पाणंद रस्ता व अशोक सुतार यांचे घर ते नदीपर्यंतचा रस्ता 1 कि.मी.,बनपूरी कंकवस्तीपासून ते ओढयापर्यंतचा पाणंद रस्ता 0.500 कि.मी., डेरवण भैरेवाडी ते जानाईचीवाडी पाणंद रस्ता 1 कि.मी.,माजगाव बंगला शिवार पाणंद रस्ता 1 कि.मी.,टेळेवाडी महिपत बुवा यांचे घर ते बाऊल दरा पाणंद रस्ता 1.5 कि.मी., बोडकेवाडी ते ठोमसे जोडपाणंद रस्ता 1.5 कि.मी.,टेळेवाडी आकुर ते टाकेदरा पाणंद  रस्ता 1.5 कि.मी.,तारळे जुना तारळे ते घोट फाटा पाणंद रस्ता 2 कि.मी.,आडूळपेठ कराड चिपळूण रोड ते पिण्याच्या पाण्याचा आड ते साळूंखे वस्ती पाणंद 1,शिंदेवाडी ते सुळेवाडी पाणंद रस्ता करणे 2 कि.मी.,लोरेवाडी गोरेवाडी मुरुड पाणंद रस्ता 0.500 कि.मी.,डिगेवाडी मुरुड ते मालोशी पाणंद रस्ता 1 कि.मी.,दुटाळवाडी नुने एम.एस.ई.बी.कार्यालय ते सातारा वाट पाणंद 1 कि.मी.,ठोमसे धोंडाचा माळ ते देसाईवस्ती पाणंद रस्ता 2 कि.मी.,नाडे गावठाण ते शिरी पाणंद रस्ता 1 कि.मी.,नाडे कराड चिपळूण रस्ता ते गुंजाळ पाणंद रस्ता 1 कि.मी.,मस्करवाडी नं.1 पाणंद रस्ता 2 कि.मी., मरळी लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक ते पापर्डे पाणंद रस्ता 2 कि.मी.,नेरळे ते मोरगिरी रस्त्यावर नेरळे फाटा येथील हणमंत शिर्के यांचे घराजवळ नेरळे ते चेवलेवाडी पाणंद रस्ता 1 कि.मी., जरेवाडी निनाईदेवी मंदिर ते मारक ओढा शिवार पाणंद रस्ता 2 कि.मी.,जरेवाडी पाणी पुरवठा विहिरीकडे जाणारा पाणंद रस्ता 2 कि.मी., चाफळ श्रीराम क्रशर ते खडीचा मारुती पाणंद रस्ता 2 कि.मी.,दास्तान पाणंद रस्ता 2 कि.मी.,हुंबरवाडी गोटण ते इनाम शेत पर्यंत पाणंद रस्ता 1 कि.मी.,हुंबरवाडी गोटण ते डोंगर पट्टया वाघ धोंडी पर्यंत पाणंद रस्ता 1 कि.मी., हुंबरवाडी पवारवाडी स्मशानभूमी ते परिट आंबा पाणंद रस्ता 1 कि.मी.,बनपूरी जोतिर्लिंग वार्ड पाणंद रस्ता 2 कि.मी.,हुंबरवाडी बालुगडे मंदिर ते चाफा पाणंद रस्ता 1 कि.मी.,गर्जेवाडी कडवे खुर्द ते रेडेवाडी  पाणंद रस्ता 1‍ कि.मी., निसरे पेट्रोल पंप ते मळीरान पाणंद रस्ता 2 कि.मी.,माथणेवाडी चाफळ जयवंत पवार यांच्या घरापासून ते भैरवनाथ मंदिर पाणंद रस्ता 2 कि.मी.,गोकूळ तर्फ पाटण कांबळे यांचे घर ते शिवाचा ओढा पाणंद रस्ता 1.5 कि.मी.,कळंबे पाणवठा पाणंद स्ता 1.5 कि.मी.,पांढरवाडी तारळे जोतिबा मंदिर खटदुरुंग वरचा माळ पाणंद रस्ता 2 कि.मी.,डावरी मधलीवाडी पाणंद रस्ता 2 कि.मी.,पांढरवाडी तारळे स्मशानभूमी हुंबरमाळ चिंचवला पाणंद रस्ता 2 कि.मी.,वजरोशी पंडसाळ धडीचा पाणंद रस्ता 2 कि.मी.,जाळगेवाडी हनुमान मंदिर ते भैरोबा मंदिर पाणंद 2 कि.मी.,केसे गट नंबर 346 बाबासो शंकर शिंदे यांचे शेत ते गट नं.131 मधुकर अंतू शिंदे यांचे शेत पाणंद 2 कि.मी.,केसे गट नं.271 रमेश बाळासो शिंदे यांचे शेत ते गट नंबर 253 प्रभाकर शिंदे ते गट नंबर 220 सुमन शिवाजी शिंदे यांचे शेत पाणंद रस्ता 2 कि.मी.,ऊरुल मातंगवस्ती ते माजगाव ऊरुल रस्तापर्यंत पाणंद रस्ता 1 कि.मी.,आंब्रुळे ग्रामपंचायत कार्यालय ते आडदेव पोहोच रस्ता 2 कि.मी., चव्हाणवाडी धामणी ग्रामदैवत महादेव मंदिराकडे सुनिता पंढरीनाथ घराळ यांचे घरासमोरुन ते महादेव मंदिरापय्रंतचा जाणारा पाणंद रस्ता 1 कि.मी.,शिंगणवाडी ग्रामपंचायत ते लवान नावाचे शेत पाणंद रस्ता 1.5 कि.मी.,केसे मुस्लीम दफन भूमी ते वारुंती शिव पाणंद रस्ता 2 कि.मी.,केसे तानाजी गणपती तोरस्कर यांचे शेतापासू ते राजाराम सुदाम शिंदे व अजित आनंदराव शिंदे ते शिवाजी शिंदे यांच्या शेतापर्यंतचा रस्ता 1.5 कि.मी.,केसे बाळासो रामचंद्र शिंदे यांचे शेतापासून ते सिध्दनाथ आनंदा आरबुणे यांचे शेतापर्यतचा रस्ता 1.5 कि.मी.,शिद्रुकवाडी वरची पाणंद रस्ता 1 कि.मी.,मल्हारपेठ वनारसे हॉस्पीटल ते वनहद्दीमधून लिंगायत समाज स्मशानभूमी पर्यंत पाणंद रस्ता 1 कि.मी.,गारवडे साजूर शिव ते गारवडे ओढा पाणंद 2 कि.मी.,ऊरुल मातंगवस्ती ते अनिकेत निकम यांचे शेड पर्यंतचा पाणंद रस्ता 1 कि.मी., ठोमसे लाटयाचा माळ ते मराठी शाळा पाणंद रस्ता 1.5 कि.मी.,बोडकेवाडी ते ठोमसे जोड पाणंद रस्ता 2 कि.मी.,माजगाव माळ ते शिव पाणंद रस्ता 2 कि.मी.,नाटोशी वरेकरवाडी ते इनामवाडी पाणंद रस्ता 2 कि.मी.,घोट हिंदूराव शिंदे यांचे घर ते बैलमोळा मार्गे शंकर शिंदे यांचे शेताकडे जाणारा पाणंद रस्ता 2 कि.मी.,घोट जन्नेवाडी मेनरोड घोट पाण्याच्या टाकीजवळ ते बजरंग पोसुगडे यांच्या शेताकडे जाणारा पाणंद रस्ता 1.5 कि.मी.,उत्तर तांबवे दिपक तावरे यांची वस्ती ते शिवाचा भैरोबा पाणंद रस्ता 1.5 कि.मी., उत्तर तांबवे डागवस्ती रस्ता ते डुबलकी पर्यंतचा पाणंद रस्ता 1.5 कि.मी.,पेठशिवापूर ते धावडे मोरेवाडी बागेचे शेत पाणंद रस्ता 1 कि.मी.,मल्हारपेठ मंद्रुळहवेली शिव ते पानस्करवाडी स्मशानभूमी पाणंद रस्ता 1 कि.मी. व येळेवाडी काळगाव ते धामणी पाणंद रस्ता 1 कि.मी. या कामांचा समावेश असून मातोश्री शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूरी देण्यात आली असून या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.

Sunday 26 November 2023

पाटण मतदारसंघ राज्यात विकासाचे मॉडेल म्हणून नावारुपाला येण्यासाठी प्रयत्नशील-ना.शंभूराज देसाई पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न.

 दौलतनगर दि.26: पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये राज्य शासनाच्या विविध योजनांमधून जास्तीत जास्त निधी मंजूर करण्यासाठी आपल्या सर्वांच्या पाठबळावर नेहमीच प्रयत्नशील असून ग्रामपंचायतींचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांनी आगामी पाच वर्षाचा विकास आराखडा तयार करुन या आराखडयामधील विकास कामांना निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे असून गावामध्ये विकासाची कामे राबविताना गटा-तटाचे राजकारण न करता गावाचा सर्वांगणी  विकास डोळयासमोर ठेऊन ग्रामपंचायतीमधून कामकाज करावे.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारसंघातील जनतेने विकास कामांना पाठबळ देऊन विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे जनता असल्याचे सिध्द झाले असून आपला पाटण विधानसभा मतदारसंघ हा राज्यात विकासाचे मॉडेल म्हणून नावारुपाला येण्यासाठी आपल्या सर्वांच्या पाठबळावर नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

          गत महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूकीमध्ये निवडूण आलेल्या नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते दौलतनगर ता.पाटण येथे बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,माजी चेअरमन अशोकराव पाटील,विजय पवार,संतोष गिरी,सुरेश पानस्कर, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब पाटील,उपसभापती  विलास गोडांबे,व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,आर.बी.पवार,सुनील पानस्कर,गजानन जाधव,बबनराव शिंदे,भरत साळूंखे,चंद्रकांत पाटील,राजकुमार कदम,विकास गिरी गोसावी,अशोक डिगे,लक्ष्मण बोर्गे,बबनराव भिसे,जालंदर पाटील,श्वेता वाघमारे,विश्वनाथ पानस्कर,विजय जंबुरे,बशीर खोंदू यांचेसह पदाधिकारी व कार्यकते यांची  उपस्थिती  होती.

             यावेळी बोलताना ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले की,पाटण विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण सर्वांची कामे करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करत असून नवनिर्वाचित सरपंच यांनीही गावामध्ये विकासाची कामे करताना राजकारण बाजूला ठेऊन कामे करावीत.कारण ग्रामपंचायतीच्या निकालावरुन  असे दिसते की, सध्या मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेने  आपण करत असलेल्या विकास कामांना पाठबळ दिले आहे. बहुतांशी ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाचे वर्चस्व मिळविण्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यश आले असून.त्यामुळे आपल्या पक्षाची संघटना बळकट होत आहे. आपली ही संघटना भविष्यात आणखी बळकट करण्याची जबाबदारी ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे. तर नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांनी पुढील पाच वर्षांत आपापल्या गावात कोणती विकासकामे करायची याचा आराखडा तयार करण्यासाठी प्राधान्य द्यावे असे सांगत ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीत शिवसेनेची सत्ता स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींना आश्वासन दिल्याप्रमाणे २५ लक्ष रुपये निधी विकास कामांसाठी देण्यात येईल, तर उर्वरित महत्त्वाच्या कामांनाही निधी उपलब्ध करुन देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून कटीबध्द असल्याचे सांगत ग्रामपंचायत ही विकासाचा पाया असून ग्रामपंचायतींमधील परिवर्तन हे मतदारसंघातील गावा-गावांमध्ये झालेल्या विकास कामे बघून लोकांच्यामध्ये जनजागृती झाल्याने गावच्या गावे विकासाच्या मागे उभी राहिली असल्याने तीन टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकींमध्ये आपल्याला चांगले यश मिळाले. नव्याने निवडूण आलेल्या पदाधिकारी यांना विकास कामांसाठी नेहमीच पाठबळ राहणार असून काही ठिकाणी अल्पमताने पराभव झालेल्या गावांध्ये कार्यकर्त्यांनी खचून न जाता त्या गावांमध्ये आवश्यक असलेल्या विकास कामांसाठी माझेकडे पाठपुरावा करावा,निश्चितच त्यांच्याही कामांना निधी मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी शेवटी दिले. दरम्यान पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विजय शिंदे तर आभार विजय पवार यांनी मानले.

चौकट: लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा पाटण तालुका अशी ओळख मुंबईमध्ये निर्माण करुया.-ना.शंभूराज देसाई.

          महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपल्या कार्यामुळे आपल्या पाटण तालुक्याची वेगळी ओळख निर्माण केली होती.त्यावेळी  मुंबईमध्ये पाटणचे नाव सांगीतले तर लगेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांच नाव घेतलं जायच.त्याच पध्दतीने आता मतदार संघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी  आपल्या पक्षाची संघटना आणखी मजबूत करुन अस काम करुया की यापुढे मुंबईमध्ये पाटण असे नाव घेतले तर आदराने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नावाचा उल्लेख झाला पाहिजे.तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा पाटण तालुका अशी ओळख मुंबईमध्ये निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले.

Friday 24 November 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते रविवार दि.26 रोजी पाटण विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन.

 

 

दौलतनगर दि.24: पाटण विधानसभा मतदारसंघातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिदे , राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत पाटण विधानसभा मतदर संघातील जनतेने शिवसेनेनेला ग्रामपंचायत निवडणूकीत मतदान करुन घवघवीत यश संपादन करुन दिले. या निवडणूकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा शिवसेना पाटण विधानसभा मतदारसंघ व शिवशाही सरपंच संघ पाटण यांचेवतीने जाहिर सत्कार कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत रविवार दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता दौलतनगर(मरळी),ता.पाटण येथे आयोजित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

             पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील 26 ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम माहे 05 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडत या ग्रामपंचातींचा निकाल सोमवार दि. 06 नोव्हेंबर 2023 रोजी जाहिर करण्यात आला. निवडणूक लागलेल्या 26 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध झालेल्या सर्व 09 ग्रामपंचायतीं व निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीमधील 11 ग्रामपंचायतींमध्ये पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा फडकत विजय संपादित केला. शिवसेनेचे बिनविरोध व निवडूण आलेल्या 20 ग्रामपंचायतीचे सरपंच व नवनिर्वाचित सदस्य तसेच उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये निवडूण आलेल्या सदस्यांचा शिवसेना पाटण विधानसभा मतदारसंघ व शिवशाही सरपंच संघ पाटण यांचेवतीने जाहिर सत्कार कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत रविवार दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर(मरळी) ता.पाटण येथे आयोजित केला असून पाटण विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचे जाहिर सत्कार समारंभास नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहनही पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.


Monday 20 November 2023

स्व.शिवाजीराव देसाईसाहेब (आबासाहेब) यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत- नामदार शंभूराज देसाई. दौलतनगर,ता.पाटण येथे 80 वा जयंती सोहळयात प्रतिपादन.

 

दौलतनगर दि.20:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत असून मुंबई याठिकाणी एक प्रसिध्द उद्योजक म्हणून नावारुपाला आलेले स्व.शिवाजीराव देसाई हे आपल्या वडीलांच्या शब्दाखातर पाटण तालुक्यात आले आणि लोकनते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची उभारणी करुन त्यांनी तालुक्याला प्रथमत: सहकाराची दिशा मिळवून दिली.सहकाराबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी चांगली कामगिरी केली.शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी लावलेल्या रोपटयाचे आज लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकूल नावाने वटवृक्षात रुपातंर झाले आहे. स्व.आबासाहेब यांचे अधुरे स्वप्न मतदारसंघातील जनतेने पुर्ण करुन दाखविले.लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व.आबासाहेब यांच्या पश्चात मतदारसंघातील जनतेने प्रामाणिकपणे आम्हास जे पाठबळ दिले आहे त्या पाठबळाच्या जीवावर आपली यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाईंनी केले.

                ते दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे आयोजित स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे 80 व्या जयंती सोहळया प्रसंगी बोलत होते.यावेळी चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा),मा.जयराज देसाई यांचेसह व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे, मा.चेअरमन अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण,संचालक शशिकांत निकम,बबनराव शिंदे,प्रशांत पाटील,भागोजी शेळके,शंकरराव पाटील,सोमनाथ खामकर,सुनील पानस्कर, विजय सरगडे,संचालिका सौ.दिपाली पाटील,विजय पवार,जालंदर पाटील,डी.एम.शेजवळ,संतोष गिरी,पांडूरंग शिरवाडकर, बबनराव भिसे, विजयराव जंबुरे,शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख,बशीर खोंदू,विजय शिंदे,आनंदराव चव्हाण,कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास देसाई, शिवदौलत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जाधव यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते,कारखाना अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

                 याप्रसंगी बोलताना नामदार शंभूराज देसाई म्हणाले,मरळीच्या माळरानावर सहकारी साखर कारखाना उभा करणे शक्य नव्हते,त्या काळात एक लाख टनही ऊस तालुक्यात उपलब्ध नव्हता परंतू आदरणीय लोकनेते साहेबांच्या शब्दाखातर मरळीच्या माळरानावर साखर कारखाना उभारण्याची जबाबदारी स्व.आबासाहेब यांनी पार पाडली. पाटण तालुकयात मरळीला सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली नसती तर आज पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांची आणि या विभागाची परिस्थिती काय असती याचाही सारासार विचार करणे गरजचे आहे. अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्व.आबासाहेब यांनी प्राप्त परिस्थितीला सामोरे जाऊन अनेक संकटांचा सामना करत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे गेले.स्व.शिवाजीराव देसाईसाहेब पाटण तालुक्यात आले आणि शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना उभा करण्यात त्यांनी खुप कष्ट सोसले,भागभांडवल उभा करण्यात मोठया अडचणी असतानाही तालुकाभर फिरुन त्यांनी भागभांडवल गोळा केले आणि सहकारी तत्वावर साखर कारखान्याची उभारणी केली,अल्पावधीतच कारखाना कर्जमुक्त करुन तो शेतकऱ्यांच्या मालकीचा करुन दिला.स्व.आबासाहेब यांनी अगदी कमी कालावधीमध्ये विविध संस्थांची उभारणी करण्याचे मोठे काम केले.स्व. आबासाहेबांनी सहकाराबरोबरच शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्याचे ऋृण तालुक्यातील तुम्हा शेतकऱ्यांना कधीही न फेडता येणारे आहे.देसाई कारखान्याची उभारणी हि आबासाहेबांच्या आणि आपल्या सर्वांच्या जीवनातील आणि तालुक्याच्या इतिहासातील महत्त्वाची घटना आहे.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब स्व.आबासाहेब यांचेपासून देसाई कुटुंबांशी नाळ जुळलेल्या पाटण तालुक्यातील जनतेने देसाई कुटंबिंयाना प्रामाणिकपणे पाठबळ दिले असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.आबासाहेब यांचे पुण्याईनेच आपण लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून काम करत असून सहकारात काम करताना राजकारण बाजूला ठेऊन काम करणे गरजेचे आहे.त्यांच्याच आशिर्वादने आज कॅबिनेट मंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री म्हणून पाटण तालुक्यासह सातारा जिल्हयाचे विकासासाठी प्रयत्नशिल आहोत.पाटण या डोंगरी व दुर्गम तालुक्यासाठी स्वतंत्र डोंगरी विकास निधी देण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे विनंती केल्यांनतर तो निधी  मंजूर करण्याचे मुख्यमंत्री यांनी मान्य केले असून या निधीतून डोंगरी भागाचा विकास होऊन कायापालट होण्यास मदत होणार आहे.तर कोयना भूकंप निधी हा वाढवून मिळण्यात यश आल्याने आता जादाचा निधी पाटण विधानसभा मतदारसंघाचे विकासासाठी मिळणार असून राज्य शासनाकडून मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी जादाचा निधी मंजूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी शेवटी सांगीतले.


Saturday 18 November 2023

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे 11 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पालकमंत्री नामदार शंभूराज देसाईंचे हस्ते गोरगरीब महिलांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप.


 

दौलतनगर दि.18:-हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने समुहाचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१७ नोव्हेंबर,रोजी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे 11 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना नामदार शंभूराज देसाई यांचे हस्ते संसारोपयोगी साहित्याचे  ब्लँकेटचे तसेच शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व वहया वाटप करण्यात आले.

दौलतनगर,ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रतिवर्षी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो.यंदाच्या वर्षी शिवसेनाप्रमुख यांचे 11 व्या पुण्यस्मरण दिनाचे व यानिमित्ताने पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना ब्लँकेट तसेच शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व वहया वाटपाचा कार्यक्रम दि.१७ नोव्हेंबर रोजी आयोजीत करण्यात आला होता.या दिनानिमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने समुहाचे प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमत: शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात येवून त्यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने या पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील महिलांना त्यांचे शुभहस्ते ब्लँकेट तसेच शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व वहयांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा),शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,अशोकराव पाटील,विजय पवार,जालंदर पाटील,पाटण मतदारसंघातील शिवसेना,युवासेना पदाधिकारी,कार्यकर्ते व विविध संस्थांचे पदाधिकारी हे मोठया संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना  नामदार शंभूराज देसाई म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जिव्हाळयाचे ऋृणानुबंध होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना करताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले होते हे अवघा महाराष्ट्र जाणून आहे.शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार अनेक वर्षे तळपती ठेवली.तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगचित्रातून टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती.मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून अविरतपणे चालविला आणि पार पाडला.आपल्या लेखणीतून,व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ या दिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची स्थापना केली शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ही एक झंझावाती शक्ती म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आली आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांना उभा महाराष्ट्र शिवसेनाप्रमुख व हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखू लागला.आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात नाहीत परंतू त्यांनी दिलेले आदर्श विचारांतून शिवसेना पक्षाची व संघटनेची वाटचाल सुरु आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे आदर्श विचारांचा वारसा जोपासत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 11व्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने पाटण विधानसभा मतदारसंघाचेवतीने व आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने मी विनम्र अभिवादन करतो,असे ते शेवठी म्हणाले.