गत महिन्यात पार पडलेल्या
ग्रामपंचायतींच्या निवडणूकीमध्ये निवडूण आलेल्या नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य
यांचे सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते दौलतनगर ता.पाटण येथे बोलत होते. यावेळी शिवसेना
जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,माजी चेअरमन अशोकराव पाटील,विजय पवार,संतोष गिरी,सुरेश
पानस्कर, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब पाटील,उपसभापती विलास गोडांबे,व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,आर.बी.पवार,सुनील
पानस्कर,गजानन जाधव,बबनराव शिंदे,भरत साळूंखे,चंद्रकांत पाटील,राजकुमार कदम,विकास गिरी
गोसावी,अशोक डिगे,लक्ष्मण बोर्गे,बबनराव भिसे,जालंदर पाटील,श्वेता वाघमारे,विश्वनाथ
पानस्कर,विजय जंबुरे,बशीर खोंदू यांचेसह पदाधिकारी व कार्यकते यांची उपस्थिती
होती.
यावेळी बोलताना ना.शंभूराज देसाई पुढे
म्हणाले की,पाटण विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण सर्वांची कामे करण्यासाठी
प्राधान्याने प्रयत्न करत असून नवनिर्वाचित सरपंच यांनीही गावामध्ये विकासाची कामे
करताना राजकारण बाजूला ठेऊन कामे करावीत.कारण ग्रामपंचायतीच्या निकालावरुन असे दिसते की, सध्या मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेने
आपण करत असलेल्या विकास कामांना पाठबळ दिले
आहे. बहुतांशी ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाचे वर्चस्व मिळविण्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना
यश आले असून.त्यामुळे आपल्या पक्षाची संघटना बळकट होत आहे. आपली ही संघटना भविष्यात
आणखी बळकट करण्याची जबाबदारी ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे. तर नवनिर्वाचित सरपंच
व सदस्य यांनी पुढील पाच वर्षांत आपापल्या गावात कोणती विकासकामे
करायची याचा आराखडा तयार करण्यासाठी प्राधान्य द्यावे असे सांगत ते पुढे म्हणाले
की, या निवडणुकीत शिवसेनेची सत्ता स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींना आश्वासन
दिल्याप्रमाणे २५ लक्ष रुपये निधी विकास कामांसाठी
देण्यात येईल, तर उर्वरित महत्त्वाच्या कामांनाही निधी उपलब्ध करुन देण्यासाठी
लोकप्रतिनिधी म्हणून कटीबध्द असल्याचे सांगत ग्रामपंचायत ही विकासाचा पाया असून
ग्रामपंचायतींमधील परिवर्तन हे मतदारसंघातील गावा-गावांमध्ये झालेल्या विकास कामे
बघून लोकांच्यामध्ये जनजागृती झाल्याने गावच्या गावे विकासाच्या मागे उभी राहिली
असल्याने तीन टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकींमध्ये आपल्याला चांगले यश
मिळाले. नव्याने निवडूण आलेल्या पदाधिकारी यांना विकास कामांसाठी नेहमीच पाठबळ
राहणार असून काही ठिकाणी अल्पमताने पराभव झालेल्या गावांध्ये कार्यकर्त्यांनी खचून
न जाता त्या गावांमध्ये आवश्यक असलेल्या विकास कामांसाठी माझेकडे पाठपुरावा
करावा,निश्चितच त्यांच्याही कामांना निधी मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी शेवटी
दिले. दरम्यान पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदार संघातील
नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करुन त्यांना पुढील
वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विजय शिंदे तर
आभार विजय पवार यांनी मानले.
चौकट: लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा पाटण तालुका
अशी ओळख मुंबईमध्ये निर्माण करुया.-ना.शंभूराज देसाई.
महाराष्ट्राचे पोलादी
पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपल्या कार्यामुळे
आपल्या पाटण तालुक्याची वेगळी ओळख निर्माण केली होती.त्यावेळी मुंबईमध्ये पाटणचे नाव सांगीतले तर लगेच
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच नाव घेतलं जायच.त्याच पध्दतीने आता मतदार संघातील
सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या
पक्षाची संघटना आणखी मजबूत करुन अस काम करुया की यापुढे मुंबईमध्ये पाटण असे नाव
घेतले तर आदराने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नावाचा उल्लेख झाला पाहिजे.तसेच
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा पाटण तालुका अशी ओळख मुंबईमध्ये निर्माण होण्यासाठी
प्रयत्नशील राहण्याचे आवाहन पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी नवनिर्वाचित
पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले.
No comments:
Post a Comment