दौलतनगर
दि.20:- लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.
शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे कार्य
प्रेरणादायी व आदर्शवत असून मुंबई याठिकाणी एक प्रसिध्द उद्योजक म्हणून नावारुपाला
आलेले स्व.शिवाजीराव देसाई
हे आपल्या वडीलांच्या शब्दाखातर पाटण तालुक्यात आले आणि लोकनते बाळासाहेब देसाई
सहकारी साखर कारखान्याची उभारणी करुन त्यांनी तालुक्याला प्रथमत:
सहकाराची दिशा मिळवून दिली.सहकाराबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी चांगली कामगिरी
केली.शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी
लावलेल्या रोपटयाचे आज लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकूल नावाने वटवृक्षात
रुपातंर झाले आहे. स्व.आबासाहेब यांचे अधुरे स्वप्न मतदारसंघातील जनतेने पुर्ण
करुन दाखविले.लोकनेते
बाळासाहेब देसाई आणि स्व.आबासाहेब यांच्या पश्चात मतदारसंघातील जनतेने प्रामाणिकपणे आम्हास जे पाठबळ
दिले आहे त्या पाठबळाच्या जीवावर आपली यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन
महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री
नामदार शंभूराज देसाईंनी केले.
ते दौलतनगर,ता.पाटण
येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे आयोजित स्व.शिवाजीराव
देसाई (आबासाहेब) यांचे 80 व्या जयंती सोहळया प्रसंगी बोलत होते.यावेळी चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे
अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा),मा.जयराज देसाई यांचेसह व्हा.चेअरमन
पांडूरंग नलवडे, मा.चेअरमन अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण,संचालक शशिकांत निकम,बबनराव
शिंदे,प्रशांत
पाटील,भागोजी शेळके,शंकरराव पाटील,सोमनाथ खामकर,सुनील पानस्कर, विजय
सरगडे,संचालिका सौ.दिपाली पाटील,विजय पवार,जालंदर पाटील,डी.एम.शेजवळ,संतोष
गिरी,पांडूरंग शिरवाडकर, बबनराव भिसे, विजयराव जंबुरे,शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय
देशमुख,बशीर खोंदू,विजय शिंदे,आनंदराव चव्हाण,कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास
देसाई, शिवदौलत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जाधव यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते,कारखाना अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना नामदार शंभूराज देसाई म्हणाले,मरळीच्या माळरानावर सहकारी साखर कारखाना उभा करणे शक्य नव्हते,त्या काळात एक लाख टनही ऊस तालुक्यात उपलब्ध नव्हता परंतू आदरणीय लोकनेते साहेबांच्या शब्दाखातर मरळीच्या माळरानावर साखर कारखाना
उभारण्याची जबाबदारी स्व.आबासाहेब यांनी पार पाडली. पाटण तालुकयात मरळीला सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली नसती तर आज पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांची आणि या विभागाची परिस्थिती
काय असती याचाही सारासार विचार करणे गरजचे आहे. अगदी प्रतिकूल
परिस्थितीमध्ये स्व.आबासाहेब यांनी प्राप्त परिस्थितीला सामोरे जाऊन अनेक संकटांचा
सामना करत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे गेले.स्व.शिवाजीराव
देसाईसाहेब पाटण तालुक्यात आले आणि शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना उभा करण्यात
त्यांनी खुप कष्ट सोसले,भागभांडवल उभा करण्यात मोठया अडचणी असतानाही तालुकाभर फिरुन
त्यांनी भागभांडवल गोळा केले आणि सहकारी तत्वावर साखर कारखान्याची उभारणी केली,अल्पावधीतच कारखाना कर्जमुक्त करुन तो शेतकऱ्यांच्या
मालकीचा करुन दिला.स्व.आबासाहेब यांनी अगदी कमी कालावधीमध्ये विविध संस्थांची
उभारणी करण्याचे मोठे काम केले.स्व.
आबासाहेबांनी सहकाराबरोबरच
शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या या महत्त्वपूर्ण
कार्याचे ऋृण तालुक्यातील तुम्हा शेतकऱ्यांना कधीही न फेडता येणारे आहे.देसाई कारखान्याची उभारणी हि आबासाहेबांच्या आणि आपल्या
सर्वांच्या जीवनातील आणि तालुक्याच्या इतिहासातील महत्त्वाची घटना आहे.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब स्व.आबासाहेब यांचेपासून देसाई कुटुंबांशी नाळ जुळलेल्या पाटण
तालुक्यातील जनतेने देसाई कुटंबिंयाना प्रामाणिकपणे पाठबळ दिले असल्याचे सांगत ते
पुढे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.आबासाहेब यांचे पुण्याईनेच आपण
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थांचे
पदाधिकारी म्हणून काम करत असून सहकारात काम करताना राजकारण बाजूला ठेऊन काम करणे
गरजेचे आहे.त्यांच्याच आशिर्वादने आज कॅबिनेट मंत्री व सातारा,ठाणे जिल्हा
पालकमंत्री म्हणून पाटण तालुक्यासह सातारा जिल्हयाचे विकासासाठी प्रयत्नशिल
आहोत.पाटण या डोंगरी व दुर्गम तालुक्यासाठी स्वतंत्र डोंगरी विकास निधी
देण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे विनंती केल्यांनतर
तो निधी मंजूर करण्याचे मुख्यमंत्री यांनी
मान्य केले असून या निधीतून डोंगरी भागाचा विकास होऊन कायापालट होण्यास मदत होणार
आहे.तर कोयना भूकंप निधी हा वाढवून मिळण्यात यश आल्याने आता जादाचा निधी पाटण
विधानसभा मतदारसंघाचे विकासासाठी मिळणार असून राज्य शासनाकडून मतदारसंघातील विविध
विकास कामांसाठी जादाचा निधी मंजूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे
त्यांनी शेवटी सांगीतले.
No comments:
Post a Comment