दौलतनगर दि.24: पाटण विधानसभा मतदारसंघातील
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री
ना. एकनाथजी शिदे , राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज
देसाई यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत पाटण विधानसभा मतदर संघातील जनतेने शिवसेनेनेला
ग्रामपंचायत निवडणूकीत मतदान करुन घवघवीत यश संपादन करुन दिले. या निवडणूकीत निवडून
आलेल्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा शिवसेना पाटण विधानसभा मतदारसंघ व शिवशाही
सरपंच संघ पाटण यांचेवतीने जाहिर सत्कार कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन
शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते,लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण
संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत रविवार दि. 26 नोव्हेंबर
2023 रोजी सकाळी 10.00 वाजता दौलतनगर(मरळी),ता.पाटण येथे आयोजित केला असल्याची माहिती
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली
आहे.
पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण
विधानसभा मतदारसंघातील 26 ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम माहे 05 नोव्हेंबर
2023 रोजी पार पडत या ग्रामपंचातींचा निकाल सोमवार दि. 06 नोव्हेंबर 2023 रोजी जाहिर
करण्यात आला. निवडणूक लागलेल्या 26 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध झालेल्या सर्व 09 ग्रामपंचायतीं
व निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीमधील 11 ग्रामपंचायतींमध्ये पालकमंत्री ना.शंभूराज
देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा फडकत विजय संपादित केला. शिवसेनेचे बिनविरोध
व निवडूण आलेल्या 20 ग्रामपंचायतीचे सरपंच व नवनिर्वाचित सदस्य तसेच उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये
निवडूण आलेल्या सदस्यांचा शिवसेना पाटण विधानसभा मतदारसंघ व शिवशाही सरपंच संघ पाटण
यांचेवतीने जाहिर सत्कार कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री
व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते,लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे
अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत रविवार दि. 26 नोव्हेंबर
2023 रोजी सकाळी 10.00 वाजता महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक
दौलतनगर(मरळी) ता.पाटण येथे आयोजित केला असून पाटण विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित
सरपंच व सदस्य यांचे जाहिर सत्कार समारंभास नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचेसह पदाधिकारी
व कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहनही पालकमंत्री ना.शंभूराज
देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment