Saturday 28 January 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मागासवर्गीय वस्तींमधील विकास कामांसाठी निधी मंजूर. पाटण तालुक्यातील मागासवर्गीय वस्तीमधील विविध विकास कामे लागणार मार्गी.

 


दौलतनगर,ता.28: -पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या गावांत असलेल्या मागासवर्गीय वस्तींमधील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली होती.अतिवृष्टीमुळे या रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने या मागासवर्गीय असलेल्या अनुसूचित जाती, नवबौध्द व मातंगवस्तींमधील रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे या मागासवर्गीय वस्त्यांमधील कामांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास येाजनेअंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी शिफारस केली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून पाटण तालुक्यातील मागासवर्गीय वस्त्यांमधील कामांसाठी निधी मंजूर केले असल्याचा शासन निर्णय पारीत केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

                  प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा व गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना या घटकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना शासनस्तरावरुन मान्यता देण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास येाजनेअंतर्गत निधी देण्याबाबतच्या  शासन निर्णयानुसार पाटण तालुक्यातील विविध गावांतील बौध्द व मातंगवस्तींमधील रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे या मागासवर्गीय वस्त्यांमधील कामांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास येाजनेअंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी शिफारस केली होती.त्यानुसार राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून पाटण तालुक्यातील मागासवर्गीय वस्त्यांमधील कामांसाठी निधी मंजूर केले असल्याचा शासन निर्णय पारीत केला असून या कामांमध्ये कोदळ पुनर्वसन मागासवर्गीय वस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,मरळी मागासवर्गीय वस्तीमध्ये सुरक्षा भिंतसह सुधारणा  25 लाख,गाढखोप बौध्दवस्ती रस्ता सुधारणा  15 लाख,काळोली बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा  15 लाख,चोपडी बौध्दवस्ती व मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,तोंडोशी मागासवर्गीयवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा  15 लाख,दुटाळवाडी नुने,ता.पाटण मागासवर्गीयवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा  15 लाख,ठोमसे मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,मराठवाडी मेंढ मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,चौगुलेवाडी मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,कोंजवडे मातंगवस्ती रस्ता सुधारणा  15 लाख,तारळे चर्मकारवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा  15 लाख,आडूळ गावठाण मागासवर्गीय वस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,महिंद बौध्दवस्ती स्मशानभूमी रस्ता सुधारणा  15 लाख,सणबूर बौध्दवस्ती स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख,बहुले बौध्दवस्ती स्मशानभूमी रस्ता सुधारणा  15 लाख,मल्हारपेठ बौध्दवस्ती स्मशानभूमी रस्ता सुधारणा  15 लाख,दुसाळे बौध्दवस्ती पोहोच रस्ता सुधारणा 15 लाख,कुशी ते वेखंडवाडी बौध्दवस्ती रस्ता खडी.,डांबरीकरण  15 लाख,चोपदारवाडी बौध्दवस्ती स्मशानभूमी रस्ता खडी.,डांबरीकरण  15 लाख,पेठशिवापूर बौध्दवस्तीमध्ये स्मशानभूमी रस्ता सुधारणा  15 लाख,कडवे बुद्रुक येथे मातंगवस्ती स्मशानभूमी रस्ता सुधारणा  15 लाख,राहुडे बौध्दवस्ती स्मशानभूमी रस्ता सुधारणा  15 लाख,बांबवडे बौध्दवस्ती स्मशानभूमी रस्ता सुधारणा  15 लाख,बाचोली मागासवर्गीय वस्ती स्मशानभूमी रस्ता सुधारणा  15 लाख,रुवले बौध्दवस्ती स्मशानभूमी पोहोच रस्ता सुधारणा  15 लाख या कामांचा समावेश आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मंजूर विकास कामांच्या लवकरच निविदा प्रक्रिया करण्यात येणार असून लवकरात लवकर या कामांना सुरुवात करण्याच्या सुचना संबंधित अधिकारी यांना दिल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

चौकट:- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतील सन 2021-22 च्या  कामांना निधी वर्ग.

           पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सन 2021-22च्या मंजूर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दि. 04 ऑक्टोंबर 2021 रोजीचे शासन निर्णयानुसार मंजूर मरळी,आवर्डे,मरळोशी,गोकूळ तर्फ पाटण,आटोली,नाटोशी,आडूळ गावठाण,केरळ,रासाटी,कसणी, सावरघर, कुशी पुनर्वसन आवर्डे,चिंचेवाडी वजरोशी,तामिणे,आंबवणे,ढोकावळे येथील मागासवर्गीय वस्त्यांमधील कामांकरीता 1.50 कोटी, दि.03 मार्च 2022 रोजीचे शासन निर्णयानुसार मंजूर हुंबरणे,बाहे,धावडे,आंबेघर,सोनवडे,सोनाईचीवाडी बौध्दवस्ती व किल्लेमोरगिरी मातंगवस्तीमध्ये अभ्यासिका बांधण्याच्या 01 कोटी र अशा 2.50 कोटी रुपयांच्या कामांना निधी वर्ग झाला असल्याने सदरची कामे मार्गी लागणार आहे.

 

Tuesday 24 January 2023

जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये लवकरच प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाणी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील. पाटण तालुक्यातील तब्बल 140 नळ पाणी पुरवठा योजनांचा ई भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.

 


दौलतनगर,ता.24: - पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवणाऱ्या तसेच काही ठिकाणी अस्तित्वात असलेल्या नळ पाणी पुरवठा यंत्रणा जीर्ण झाल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होऊन पिण्याच्या पाण्याची कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होत असल्याने मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी मतदारसंघातील नळ पाणी पुरवठा योजनांना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचेच फलीत म्हणून मंत्री ना. शंभूराज देसाई यांचे प्रयत्नांतून आज आपण पाटण तालुक्यात १४० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांचे ई भूमिपूजन करत आहोत.सातारा जिल्ह्यातील सर्व गावांमधील प्रत्येक घरात जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्हयातील सर्व गावांमध्ये लवकरच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येईल. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील योजनांच्या कामांना मंजुरी देण्यात आला असल्याचे प्रतिपादन  पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. 

           पाटण तालुक्यातील दौलतनगर येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक सभागृहामध्ये पाटण तालुक्यातील १४० गावातील नळ पाणी योजनांचे ई भूमिपूजन पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीव्दारे संपन्न झाले. या कार्यक्रमावेळी पाणी पुरवठा मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल,जल जीवन मिशन प्रकल्प संचालक ऋषिकेश यशोद (दूरदृश्य प्रणालीव्दारे )मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार रमेश पाटील, कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे, उपअभियंता एस. वाय. बसुगडे, गट विकास अधिकारी गोरख शेलार, बाळासाहेबांची शिवसेना संपर्कप्रमुख शरदराव कणसे, जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, पुरुषोत्तम जाधव, डॉ.दिलीपराव चव्हाण,अशोकराव पाटील,भरत साळूंखे,विजय शिंदे,बबनराव शिंदे,बशीर खोंदू,जालंदर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

              यापुढे बोलताना ना.पाटील म्हणाले की केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पेय जल कार्यक्रम जल जीवन मिशन मध्ये समाविष्ट करुन या जलजिवन मिशन योजने अंतर्गत सन २०२४ अखेर ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला नवीन वैयक्तिक नळजोडणी व पूर्नजोडणीद्वारे प्रतीदिन दरडोई किमान ५५ लिटर पाणी पुरवठा करण्यास शासन कटीबध्द आहे. या योजनेसाठी केंद्रशासन ५० टक्के, राज्यशासन ५० टक्के याप्रमाणे निधीची उपलब्धता होणार आहे. राज्य शासन पिण्याच्या पाण्याला महत्त्व देत असून राज्याच्या वाटयाला येणाऱ्या हिस्स्याची रक्कम अगोदरच वर्ग करत असून या नळ पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देत आहे. त्यामुळे जलजिवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर नळ पाणी पुरवठा योजनांना कसल्याही निधीची कमतरता भासणार नसल्याचे सांगत मंत्री ना.गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की,‘हर घर जल’ या संकल्पनेतून जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावतील प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तिसाठी पाणी पोहोचविण्याचा मानस आहे. या मिशनच्या माध्यमातून शासन घरोघरी नळ पाणी जोडणी देत असल्याचे सांगत ते म्हणाले राज्यातील प्रत्येक घरात नळ पाणी पुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे. नळ जोडणी कामे लवकर व्हावीत म्हणून या बाबतचे अधिकार जिल्हास्तरावर देण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व योजनांना मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ही कामे जलद पूर्ण होण्याच्या दृष्टीने कामांचा दरमहा आढावा घ्यावा व त्याची प्रगती एका नोंद वहीत ठेवावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी अधिका-यांना दिल्या.तसेच ना.शंभूराज देसाई हे एक काम करणार नेतृत्व असून या नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे असे आवाहनही त्यांनी केले.

               मंत्री ना.शंभूराज देसाई बोलताना म्हणाले की, जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व गावांमधील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा लवकरच होणार आहे.पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होती. या भागातील पाणी पुरवठ्यांच्या योजनांना आम्ही प्राधान्य दिले. पाटण तालुक्यातील १४० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांचा आज शुभारंभ झाला असून या गावांतील योजनांसाठी निधी मंजूर झाला आहे.या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे डोंगरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आता दूर होणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे . अनेक योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकास कामांसाठी निधी शासनाने दिला. पाटण तालुक्यातील एकूण ८८ कोटी ४२ लाख रुपयांच्या १४० नळ पाणी योजनांचे भूमिपूजन करण्यात आले असून, या माध्यमातून एकूण १ लाख ५३ हजार ३१० लोकसंख्येला पाणी मिळणार आहे. १४० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनामधून ३६ हजार ९४१ घरांमध्ये नळ जोडणी देण्यात येणार आहे. या शिवाय तालुक्यातील उर्वरीत गावांमधील नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामांना मंजूरी देण्यात आली असून ग्रामपंचायत स्तरावरील योजनांची कामे सुरु करण्याच्या सुचना अधिका-यांना दिल्या आहेत. या योजना मार्गी लावण्यासाठी निधीची कमतरता भासणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. पाटण तालुक्यातील १४० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांचा ई भूमिपूजन कार्यक्रमास शिवशाही सरपंच संघ पाटणचे अध्यक्ष मा. विजय शिंदे यांच्यासह सर्व गावांतील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थ  पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट :- जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अविरत झटणारे मंत्री.

आपल्या डोंगरी व दुर्गम भागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून मतदारसंघातील रस्ते,नळ योजना,साकव अशा मुलभूत सुविधांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन या कामांना जास्तीत जास्त निधी मंजूर करण्याच काम मंत्री ना.शंभूराज देसाई हे करत आले आहेत. पाणी पुरवठा विभागाच बोलायच झालं तर ना.शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या सगळ्यां योजनांना 125 कोटी निधी नेणारा हा एकमेव पट्टा  महाराष्ट्रात असेल असे सांगत जनेतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अवितर झटणारे मंत्री असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.तसेच भविष्यातील त्यांच्या राजकीय वाटचालीसाठीही मंत्री गुलाबराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

Monday 23 January 2023

ना.गुलाबराव पाटील व ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते जलजिवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर पाटण तालुक्यातील 140 गावातील नळ पाणी पुरवठा योजनांचा मंगळवारी ई भूमिपूजन समारंभ.



दौलतनगर,ता.23: पाटण तालुक्यातील जलजिवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 140 नळ पाणी पुरवठा योजनांचा ई भूमिपूजन समारंभ उद्या मंगळवार दि. 24 जानेवारी 2023 रोजी दुपारी 11.00 वा. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे शुभहस्ते व राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. ना. गुलाबराव पाटील व राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई हे मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीव्दारे या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई(दादा) ,जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी  ज्ञानेश्वर खिलारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस.शिंदे व यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

                प्रसिध्‍दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की,पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई जाणवणाऱ्या तसेच गावातील अस्तित्वात असलेल्या नळ पाणी पुरवठा जीर्ण झाल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होऊन कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होणाऱ्या गावातील नळ पाणी पुरवठा योजनांना जल जिवन मिशन योजनेअंतर्गत निधी मंजूर होण्याकरीता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचेकडे शिफारशी केल्या होत्या. तसेच या योजनांना प्राधान्याने निधी मंजूर होण्यासाठी सातत्याचा पाठपुरावा सुरु होता. दरम्यान केंद्र व  राज्य शासनाच्या अर्थसहाय्यातून पहिल्या टप्प्यात पाटण तालुक्यात 140 गावातील नळ पाणी पुरवठा योजनांना सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून कार्यारंभ दिला असून या योजनांचे कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.मंगळवारी दि. 24 जानेवारी 2023 रोजी ई भूमिपूजन होणाऱ्या 140 गावातील नळ पाणी पुरवठा योजनांमध्ये नवजा कामगरगांव, मानाईनगर कामरगांव, निसरे,  कळकेवाडी, निवडे पुनर्वसन, डांगीष्टेवाडी, शिंदेवाडी,सांगवड,गलमेवाडी,तोरणे (गोकुळ तर्फ हेळवाक), शिद्रुकवाडी वरची, मारुल हवेली, सातर, काडोली, कोळेकरवाडी , बाचोली , लेंढोरी, तळीये (मणेरी)  , मारुल तर्फ पाटण, मरळोशी (गावठाण), गमेवाडी, गोषटवाडी, ढोरोशी झाकडे, तारळे (पांढरवाडी), धावडे, डोणीचा वाडा, तोंडोशी, नाव, विरेवाडी, कडवे ख्रू. , आंबवणे, घेाट (जन्नेवाडी), किल्लोमोरगिरी, डिगेवाडी, रासाटी, चिखलेवाडी-माटेकरवाडी, दिवशी बु, चिखलेवाडी, बांधवट, कोंढावळे (मेंढेघर)  , येराड, वेखंडवाडी, वजरोशी, घोट ( बोरगेवाडी ), राहुडे, ताईगडेवाडी- तळमावले, मालोशी पाडेकरवाडी, सुतारवाडी , कुसवडे, वन (कुसवडे), घोट फडतरवाडी, जिंती, येरफळे, बोंद्री, कवडेवाडी, कडवे बु,, गवळीनगर(कोकिसरे), कसनी, उरूल, बोडकेवाडी, कवरवाडी , गुंजाळी, चोपडी, आवर्डे, भुडकेवाडी, सळवे वरपेवाडी, चाफळ, काहिर, मालोशी, दाढोली, डावरी, मणेरी , कोंजवडे , केरळ, तारळे (धनगरवाडी), वाजेगांव मारुल तर्फ पाटण, पेठशिवापुर, गुढे, गारवडे, पाचगणी, मुंद्रुळकोळे, गव्हाणवाडी , चाफोली, कातवडी, नेरळे   (चेवलेवाडी ), मरळोशी (जांभेकरवाडी / धनगरवाडी ), हारुगडेवाडी, म्हावशी व गुजरवाडी, बनपूरी, बागलवाडी, साईकडे, मानेगांव, शितपवाडी, काठी अंतर्गत काठी टेक, महींद, चाळकेवाडी, बेार्गेवाडी- मेंढोशी, काळोली, जानुगडेवाडी, बिबी –मकाईचीवाडी, धजगांव (धडामवाडी), बिबी सलतेवाडी, पाठवडे, सणबुर, जोतिबाचीवाडी येराड, कुंभारगाव वईचालवा्डी, गोकुळ तर्फ़ पाटण, बेलवडे खुर्द, येराडवाडी, कोंदळ (पुर्नेवर्सन), कोकिसरे, चाफेर – मणेरी, भरेवाडी (काळगांव)  , निवी, पवारवाडी कुसरुंड, टोळेवाडी, ढेबेवाडी, मुंद्रूळकोळे ख्रुर्दे, माऊलीनगर मेंढोशी, मेंढोशी, गोकुळ तर्फ़ हेळवाक, टेटमेवाडी काळगाव, निहिंबे-चिरिंबे, मुंद्रुळ हवेली, मूळगाव ( डोंगरोबाचिवाडी ), ठोमसे, नावडी, सोनाईचीवाडी, आडूळपेठ, चव्हाणवाडी (नानेगावं), जागळेवाडी, जाधववाडी, तारळे (जंगलवाडी), साखरी कोतावडेवाडी, भोसगाव, अढुळ (गावठाण), डोंगळवाडी (मांनगांव), सडावाघापुर या 140 गावांतील नळ पाणी  पुरवठा योजनांचा समावेश असून या गावांतील योजनांसाठी निधी मंजूर झाला असून या योजनांचा ई भूमिपूजन कार्यक्रम उद्या मंगळवारी सपन्न होत आहे.तरी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झालेल्या गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सकाळी 11 वा. शताब्दी स्मारक दौलतनगर येथे या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे.

Thursday 12 January 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 06 रस्त्यांच्या कामांसाठी 24 कोटी 58 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. पाटण तालुक्यातील ग्रामीण भागातील सुमारे 36 कि.मी.च्या रस्त्याचा प्रश्न लागणार मार्गी.

 

 

दौलतनगर,ता.06: पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची मोठया प्रमाणांत दुरावस्था झाल्याने येथील नागरीकांची दळणवळणाची मोठी गैरसोय होत असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील 06 गावांचे पोहोच रस्त्यांच्या कामांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास विभागाकडे दोन वर्षापूर्वी शिफारशीसह प्रस्ताव सादर करण्यात आला होता.  परंतु गत दोन वर्षापासून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या कामांचा राज्याचा प्रस्ताव प्रलंबीत होता.राज्यामध्ये बाळासाहेबांचा शिवसेना व भाजपा युतीचे शासन आल्यानंतर राज्य शासनाच्या सहकार्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याकरीता राज्य शासनाच्यावतीने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे राज्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 अंतर्गतर स्त्यांच्या कामांना मान्यता मिळाली असून यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील 06 रस्त्यांच्या कामांसाठी 24 कोटी 57 लक्ष 92 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 अंतर्गत सुमारे 36 कि.मी.लांबीच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

             प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील सन 2019-20 या आर्थिक वर्षापासून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी ना.शंभूराज देसाई यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. दरम्यान या संदर्भात दि. जुलै 2020 रोजी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या सर्व उच्चस्तरीय अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली  होती.याबैठकीमध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत भाग मध्ये करावयाच्या रस्त्यांच्या संदर्भात ऑक्टोंबर २०१९ मध्ये केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सुचना निर्गमीत करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार नियमात बसणाऱ्या कोणकोणत्या ग्रामीण रस्त्यांना प्राधान्य देता येईल,कोणते संभाव्य रस्ते करता येतील यांचा आराखडा तयार करुन तो लवकरात लवकर मंजुरीकरीता सादर करण्याच्या सुचना ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या होत्या.त्यानुसार प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 मध्ये केंद्र शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचना (गाईडलाईन्स) नुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 06 प्रमुख रस्त्यांची कामे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत करण्याकरीता पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या निर्देशानुसार आराखडा तयार करुन तो प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे मंजुरीकरीता सादर करण्यात आल्यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघातील 06 रस्त्यांच्या कामांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 अंतर्गत मंजूरी देण्यात आली आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 अंतर्गत मंजूरी मिळालेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये एमआरएल 15 एमडीआर 29 ते बोंद्री रस्ता सुधारणा 4.850 कि.मी. करीता 349.28 लक्ष,एमआरएल 05 बेलवडे खुर्द  सांगवड ते पापर्डे ब्रु// रस्ता सुधारणा 5.660 कि.मी.करीता 325.03 लक्ष,एमआरएल 14 एमडीआर 58 ते दिवशी पापर्डे रस्ता सुधारणा 5.630 कि.मी.करीता 378.07 लक्ष,एमआरएल 26 बांबवडे गायमुखवाडी ते कळंबे रस्ता 07 कि.मी.करीता 493.79 लक्ष,

एमआरएल 16 एमडीआर 37 केळोली फाटा ते विरेवाडी केळोली रस्ता 6.760 कि.मी.करीता 473.70 लक्ष व टी 02 सणबूर रुवले तामिणे वाल्मिकी रस्ता 6.750 कि.मी.करीता 438.05 लक्ष या कामांचा समावेश आहे. राज्यामध्ये बाळासाहेबांचा शिवसेना व भाजपा युतीचे शासन आल्यानंतर राज्य शासनाच्या सहकार्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांना यश आले आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 अंतर्गत मंजूरी मिळालेल्या रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया तातडीने करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच पावसाळयापूर्वी  या कामांना सुरुवात करण्यासाठी निविदा प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येऊन प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 अंतर्गत मंजूरी मिळालेल्या रस्त्यांची कामे दर्जेदार पध्दतीने करण्यासंदर्भातल्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकां म्हंटले आहे.

Friday 6 January 2023

असले वाचाळवीर काय पक्षनिष्ठा शिकवणार? मंत्री शंभूराज देसाई यांचा भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल

 


दौलतनगर,ता.६: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाबरोबर जायाचे कधीही मान्य नव्हते.असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मांडीवर जाऊन कोण बसल आहे हे राज्यातील जनतेला सर्वज्ञात आहे. एवढेच नव्हे तर तो पक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दावणीला बांधला आहे. यामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घरात कुलूप बंद करून ठेवले आहेत.सन 2019 ची विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षाशी युती करुन आपण लढलो आणि निवडूण आलो त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत जनतेच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला, जनतेचा विश्वासघात कुणी केला हे एकदा भास्कर जाधव यांनी जनतेला विस्तृतपणे सांगावे आणि मगच आमच्यावर भाष्य करावे. त्याचबरोबर स्वत:च्या गावात सार्वजनिक बैठकीमध्ये आपण लोकप्रतिनिधी असल्याचे विसरुन जाऊन गावातीलच ग्रामस्थांबरोबर एकेरी उल्लेख करत केलेली शिविगाळ म्हणजे बालिशपणाचा कळसच असून यावरुन आपली संस्कृती व वैचारिक बुध्दी कशी आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकले आहे. दरम्यान लोटे औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या कोणी चोरल्या याची सविस्तर माहिती माझ्याकडे आहे आणि नेमका याचा चोर कोण आहे हेही मी वेळ आल्यानंतर जनतेसमोर जाहिर करणार असून, त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला कळणार आहे की चोर कोण आहे .मग दुध का दुध पाणी का पाणी होणार असल्याचा टोला त्यांनी पत्रकांरांशी बोलताना लागवला.

            यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, स्व.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना एक विचार होता. सन 2019 नंतर राष्ट्रवादीची शिवसेना केल्यानेच आम्हाला उठाव करावा लागला आहे. आणि आम्ही उठाव केल्यानेच कर्नाटक राज्यात समावेश असणा-या मराठी गावातील जनतेवर होणा-या अन्याया विरोधात राज्य शासनाने नव्याने समन्वय समिती गठीत केली आहे.आहो  वाचाळवीर भास्कर जाधव गत अडीच वर्षात या सिमाभागातील मराठी बांधवाकरीता असलेल्या राज्य शासनाच्या विविध योजना ही बंद करण्याचे पाप केले होते. त्यामुळे कर्नाटक सिमा भागातील मराठी बांधवावर बोलण्याचा आपल्याला कोणताच अधिकार नाही. गत 15 वर्षात वेगवेगळे पक्षात उड्या मारुन पक्षनिष्ठा काय असते ते वाचाळवीर भास्कर जाधव आम्हाला आमच्या तालुक्यात येऊन शिकवत आहेत. वेगवेगळया पक्षात उड्या मारत आपली सरडयासारखी भूमिका बदलणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये. शिल्लकसेना हा तुमचा कितवा पक्ष आहे आणि तुम्ही किती दार फिरून आलात ‌ याचा विचार करावा मगच स्वताला निष्ठावंत म्हणावं जे स्वताला निष्ठावंत म्हणवतात त्यांनी गत पंधरा वर्षात किती पक्षाच्या पाय-या झिजवल्या त्याचा विचार करावा. शिवसेना ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ते पुन्हा शिल्लकसेना असा प्रवास करणाऱ्या भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्ष सोडल्यानंतर मातोश्री वर कसा अपमान होतो हे खुले आम डोंगोरा पिटला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून डोक्यात मोठी हवा असताना आपण उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरें यांचेबद्दल कुचेष्टा करून बोलल्याले जगजाहिर आहे. आदित्य ठाकरे यांच्या आवाजाबद्दल कुचेष्टा करून त्यावर वासरू अशी टिका केली  होती हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. आम्ही उठाव केला म्हणून हे वाचळवीर शिल्लक सेनेचे नेते झाले, नेते झाले की यांच्याच डोक्यात नेते पदाची हवा गेली आणि त्यांची काहीही वायफळ बडबड करणं सुरु आहे. नुकत्याच झालेल्या नागपूरच्या अधिवेशनात जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची शिवसेना असं म्हटलं होतं त्यावर भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीची शिवसेना म्हणून शिवसेना राष्ट्रवादीची असल्याचा दुजोरा दिला होता.त्यामुळे तुमची  सेना आता कोणती आहे हेही महाराष्ट्रातील जनतेने चांगलेच ओळखले आहे.आमच्या तालुक्यात येऊन बोलण्याआधी आपण आपल्या मतदारसंघातील जनतेच्या नागरी सुविधा यावर बोला आपल्या मतदारसंघातील जनतेला वेळेवर पाणी मिळत नाही.रस्ते व्यवस्थित नाहीत.इतर मतदारसंघात जाऊन बडबड करण्यापेक्षा जनतेच्या मुलभूत गरजा पुरवण्यावर भर द्यावा. म्हणजे किमान मतदारसंघातील जनता तरी तुम्हाला धन्यवाद देईल.आमच्या मतदार संघातील विकास कामांवर बोलण्याआधी पाटण मतदारसंघातील कामे पहा आणि झालेली कामे पाहण्याची जर हौस असले तर एकदा वेळ काढून नक्की या माझा सामान्य कार्यकर्ताही तुम्हाला विधानसभा मतदारसंघातील मी केलेली विकास कामे मंजूर रक्कमेच्या आकडेवारीसह दाखवतील.मतदारसंघात झालेल्या विकास कामांच्या जोरावरच आम्ही नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे शिल्लक सेनेला व राष्ट्रवादी कॅाग्रसेला पाटण विधानसभा मतदारसंघातील जनेतेने त्यांची जागा दाखवली आहे. गत दोन वर्षापूर्वी माझ्या विधानसभा मतदारसंघातील पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी सामान्य जनतेला आधार देण्याचे आम्ही प्रामाणिक काम केले होते. त्यावेळी चिपळूण विभागात पूरपरिस्थिती झाली असताना चिपळूणमधील पुरग्रस्त महिलेला तत्कालीन मुख्यमंत्री यांचेसमोर हे वाचळवीर महाशय काय बोलले होते ते सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे. दरम्यान लोटे औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या कोणी चोरल्या याची सविस्तर माहिती माझ्याकडे आहे आणि नेमका याचा चोर कोण आहे. या चोरांचा बोलवता धनी कोण आहे, हेही मी वेळ आल्यानंतर जनतेसमोर जाहिर करणार आहे. ते पुढे म्हणाले की,. आम्हाला लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची शिकवण आहे. नाही तर त्यांच्याच भाषेत उत्तरे आम्ही ही दिली असती अशा इशारा ही शेवठी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शेवटी दिला.

Tuesday 3 January 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजना अंतर्गत पाटण विधानसभा मतदार संघातील 27 गावातील 36 कि.मी.अंतराच्या पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूरी


दौलतनगर दि.03 :- पाटण या डोंगरी व दुर्गम भागामधील अनेक गांवामध्ये शेत पाणंद रस्ते अरुंद व ना दुरुस्त असल्याने या रस्त्यावरुन शेतीशी निगडीत  विविध बाबींसाठी कमी प्रमाणात या रस्त्यावरुन वहिवाट होत होती शेतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागणे गरजेचे असल्याने पाटण मतदारसंघातील शेत/पाणंद रस्त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील 27 गावातील सुमारे 36 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार  पाटण मतदारसंघातील 27 गावातील सुमारे 36 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश हा मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखडयामध्ये समावेश करत या शेत/पाणंद रस्त्यांना मंजूरी देण्यात आली असल्याचा शासन निर्णय दि.23 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनाचे नियोजन विभाग(रोहयो) यांनी पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य असून राज्यातील शेतकरी हिताच्यादृष्टीने अनेक निर्णय राज्य शासनाचेवतीने घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना शेतीचे मशागतीचे साहित्य व शेत मालाची वाहतूक करण्यासाठी शेत पाणंद रस्त्यांची सुविधा नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेत पाणंद रस्त्यांची कामे झाल्यास शेतकऱ्यांच्या बांधावर वाहन जाऊन शेती विषयक कामे जलदगतीने पुर्ण होण्यास मदत होणार आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची शेत/पाणंद रस्त्यांअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्य शासनाच्या रोजगार हमी विभागाकडे शेत/पाणंद रस्ते मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये मातोश्री  ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत दोन टप्प्यामध्ये आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील  तब्बल 63 गावांतील 69 कि.मी.लांबीचे शेत पाणंद रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.तसेच सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखडयांतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील 27 गावांतील सुमारे 36 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश होऊन या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूर मंजूर मिळणेकरीता या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांच्या शिफारशी रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचेकडे केल्या होत्या.त्यानुसार मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखडयामध्ये पाटण मतदारसंघातील 27 गावातील सुमारे 36 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश करुन या कामांना मंजूरी देण्यात आली आहे.मंजूरी देण्यात आलेल्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांमध्ये मरळी साळूबाई ते गिरजवडा पाणंद रस्ता 01 किमी, मरळी सुतारमाळ ते खिंड पाणंद रस्ता 01 किमी, मरळी साळूबाई ते खडकळी पाणंद रस्ता 01 किमी, वजरोशी चिंचेवाडी रस्ता श्री बाबूराव शिंदे यांचे घरापासून श्री शहाजी रांजणे यांचे शेतापर्यंत आंबा जाणारा पाणंद रस्ता 02 किमी.,विहे नवी विहिर ते चावर पाणंद रस्ता 1.5 कि.मी.,बाचोली बनपूरी कडववाडी ते महिंद शिव पाणंद रस्ता 1.5 कि.मी.,भोसगाव मेनरोड ते वाघोटे वा.डोह पाणंद रस्ता 1 कि.मी., तारळे ते किडके धरण पाणंद रस्ता 1.5 कि.मी., वेखंडवाडी ते करमाळे पाणंद रस्ता 1.5 कि.मी., आवर्डे ते धनगरवाडी पाणंद रस्ता 2 कि.मी., बांबवडे ते मरळोशी पाणंद रस्ता 02 कि.मी., मुरुड ते मळवी पाणंद रस्ता 01 कि.मी., आडूळ गावठाण ते कोयना नदी पाणवठा पाणंद रस्ता 01 कि.मी., चोपदारवाडी पांढरेभात ते पाटील विहिर पाणंद रस्ता 01 कि.मी., नावडी मातंगवस्ती ते चावर पाणंद रस्ता 01 कि.मी., गिरेवाडी कराड पाटण मुख्य रस्ता ते उत्तरेकडील पाणंद रस्ता 01 कि.मी., जाधववाडी चाफळ  माजगाव पाणंद रस्ता 01.5 कि.मी., डाकेवाडी वाझोली,ता.पाटण पाण्याची टाकी ते स्मशानभूमी पाणंद रस्ताव स्मशानभूमी निलाव पाणंद रस्ता 02 कि.मी., कोरिवळे शिद्रुकवाडी ते ढेबेवाडी घाटरस्ता पाणंद रस्ता 01 कि.मी., डेरवण मधलीवाडी ते केदारनाथ मंदिर पाणंद रस्ता 01 कि.मी., धावडे ता.पाटण पाणंद रस्ता येडोबा मंदिर ते वडाचा माळ व येडोबा मंदिर ते कोरद्याची  माथखणी रस्ता 01 कि.मी., दिक्षी आटोली रस्ता ते गव्हाणे यांचे शेता पर्यंतचा पाणंद रस्ता 0.500 कि.मी., जगदाळवाडी (कडवे बु,)ता.पाटण येथे शेत पानंद 01 कि.मी., मल्हारपेठ सोंडेवाडी नारळवाडी पाणंद रस्ता 01 कि.मी., तांबवे,ता.कराड पाठरकरांची विहिर ते डांगरान पाणंद रस्ता 1.5 कि.मी., जुने सुपने पाडळी इजिमा पासून उत्तरेला जाधव कुलकर्णी मळयापर्यंतचा पाणंद रस्ता 01 कि.मी., साजूर ता.कराड सचिन मधूकर चव्हाण यांचे घर ते गारवडे हद्द पाणंद रस्ता. 1.500 कि.मी.,म्होप्रे,ता.कराड भगवान दौलता संकपाळ यांचे घरापासून भोळेवाडी पाणंद रस्ता 1 कि.मी., गमेवाडी,ता.कराड साजूर डेळेवाडी रस्ता ते श्री वसंत जाधव यांच्या शेताकडे जाणारा पाणंद रस्ता 01 कि.मी. या 27 गावांतील 36 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश असून मातोश्री शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना निधी राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत उपलब्ध होऊन या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.