Tuesday 3 January 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजना अंतर्गत पाटण विधानसभा मतदार संघातील 27 गावातील 36 कि.मी.अंतराच्या पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूरी


दौलतनगर दि.03 :- पाटण या डोंगरी व दुर्गम भागामधील अनेक गांवामध्ये शेत पाणंद रस्ते अरुंद व ना दुरुस्त असल्याने या रस्त्यावरुन शेतीशी निगडीत  विविध बाबींसाठी कमी प्रमाणात या रस्त्यावरुन वहिवाट होत होती शेतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागणे गरजेचे असल्याने पाटण मतदारसंघातील शेत/पाणंद रस्त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील 27 गावातील सुमारे 36 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार  पाटण मतदारसंघातील 27 गावातील सुमारे 36 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश हा मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखडयामध्ये समावेश करत या शेत/पाणंद रस्त्यांना मंजूरी देण्यात आली असल्याचा शासन निर्णय दि.23 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनाचे नियोजन विभाग(रोहयो) यांनी पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य असून राज्यातील शेतकरी हिताच्यादृष्टीने अनेक निर्णय राज्य शासनाचेवतीने घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना शेतीचे मशागतीचे साहित्य व शेत मालाची वाहतूक करण्यासाठी शेत पाणंद रस्त्यांची सुविधा नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेत पाणंद रस्त्यांची कामे झाल्यास शेतकऱ्यांच्या बांधावर वाहन जाऊन शेती विषयक कामे जलदगतीने पुर्ण होण्यास मदत होणार आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची शेत/पाणंद रस्त्यांअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्य शासनाच्या रोजगार हमी विभागाकडे शेत/पाणंद रस्ते मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये मातोश्री  ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत दोन टप्प्यामध्ये आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील  तब्बल 63 गावांतील 69 कि.मी.लांबीचे शेत पाणंद रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.तसेच सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखडयांतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील 27 गावांतील सुमारे 36 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश होऊन या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूर मंजूर मिळणेकरीता या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांच्या शिफारशी रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचेकडे केल्या होत्या.त्यानुसार मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखडयामध्ये पाटण मतदारसंघातील 27 गावातील सुमारे 36 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश करुन या कामांना मंजूरी देण्यात आली आहे.मंजूरी देण्यात आलेल्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांमध्ये मरळी साळूबाई ते गिरजवडा पाणंद रस्ता 01 किमी, मरळी सुतारमाळ ते खिंड पाणंद रस्ता 01 किमी, मरळी साळूबाई ते खडकळी पाणंद रस्ता 01 किमी, वजरोशी चिंचेवाडी रस्ता श्री बाबूराव शिंदे यांचे घरापासून श्री शहाजी रांजणे यांचे शेतापर्यंत आंबा जाणारा पाणंद रस्ता 02 किमी.,विहे नवी विहिर ते चावर पाणंद रस्ता 1.5 कि.मी.,बाचोली बनपूरी कडववाडी ते महिंद शिव पाणंद रस्ता 1.5 कि.मी.,भोसगाव मेनरोड ते वाघोटे वा.डोह पाणंद रस्ता 1 कि.मी., तारळे ते किडके धरण पाणंद रस्ता 1.5 कि.मी., वेखंडवाडी ते करमाळे पाणंद रस्ता 1.5 कि.मी., आवर्डे ते धनगरवाडी पाणंद रस्ता 2 कि.मी., बांबवडे ते मरळोशी पाणंद रस्ता 02 कि.मी., मुरुड ते मळवी पाणंद रस्ता 01 कि.मी., आडूळ गावठाण ते कोयना नदी पाणवठा पाणंद रस्ता 01 कि.मी., चोपदारवाडी पांढरेभात ते पाटील विहिर पाणंद रस्ता 01 कि.मी., नावडी मातंगवस्ती ते चावर पाणंद रस्ता 01 कि.मी., गिरेवाडी कराड पाटण मुख्य रस्ता ते उत्तरेकडील पाणंद रस्ता 01 कि.मी., जाधववाडी चाफळ  माजगाव पाणंद रस्ता 01.5 कि.मी., डाकेवाडी वाझोली,ता.पाटण पाण्याची टाकी ते स्मशानभूमी पाणंद रस्ताव स्मशानभूमी निलाव पाणंद रस्ता 02 कि.मी., कोरिवळे शिद्रुकवाडी ते ढेबेवाडी घाटरस्ता पाणंद रस्ता 01 कि.मी., डेरवण मधलीवाडी ते केदारनाथ मंदिर पाणंद रस्ता 01 कि.मी., धावडे ता.पाटण पाणंद रस्ता येडोबा मंदिर ते वडाचा माळ व येडोबा मंदिर ते कोरद्याची  माथखणी रस्ता 01 कि.मी., दिक्षी आटोली रस्ता ते गव्हाणे यांचे शेता पर्यंतचा पाणंद रस्ता 0.500 कि.मी., जगदाळवाडी (कडवे बु,)ता.पाटण येथे शेत पानंद 01 कि.मी., मल्हारपेठ सोंडेवाडी नारळवाडी पाणंद रस्ता 01 कि.मी., तांबवे,ता.कराड पाठरकरांची विहिर ते डांगरान पाणंद रस्ता 1.5 कि.मी., जुने सुपने पाडळी इजिमा पासून उत्तरेला जाधव कुलकर्णी मळयापर्यंतचा पाणंद रस्ता 01 कि.मी., साजूर ता.कराड सचिन मधूकर चव्हाण यांचे घर ते गारवडे हद्द पाणंद रस्ता. 1.500 कि.मी.,म्होप्रे,ता.कराड भगवान दौलता संकपाळ यांचे घरापासून भोळेवाडी पाणंद रस्ता 1 कि.मी., गमेवाडी,ता.कराड साजूर डेळेवाडी रस्ता ते श्री वसंत जाधव यांच्या शेताकडे जाणारा पाणंद रस्ता 01 कि.मी. या 27 गावांतील 36 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश असून मातोश्री शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना निधी राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत उपलब्ध होऊन या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे. 

No comments:

Post a Comment