दौलतनगर,ता.६: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब
ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाबरोबर जायाचे कधीही
मान्य नव्हते.असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मांडीवर जाऊन कोण बसल
आहे हे राज्यातील जनतेला सर्वज्ञात आहे. एवढेच नव्हे तर तो पक्ष आता राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या दावणीला बांधला आहे. यामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे
विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घरात कुलूप बंद करून ठेवले आहेत.सन 2019 ची विधानसभा निवडणूक
कोणत्या पक्षाशी युती करुन आपण लढलो आणि निवडूण आलो त्यानंतर झालेल्या राजकीय
घडामोडीत जनतेच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला, जनतेचा विश्वासघात कुणी केला हे एकदा
भास्कर जाधव यांनी जनतेला विस्तृतपणे सांगावे आणि मगच आमच्यावर भाष्य करावे. त्याचबरोबर
स्वत:च्या गावात सार्वजनिक बैठकीमध्ये आपण लोकप्रतिनिधी असल्याचे विसरुन जाऊन गावातीलच
ग्रामस्थांबरोबर एकेरी उल्लेख करत केलेली शिविगाळ म्हणजे बालिशपणाचा कळसच असून
यावरुन आपली संस्कृती व वैचारिक बुध्दी कशी आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला कळून
चुकले आहे. दरम्यान लोटे औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या कोणी चोरल्या याची सविस्तर
माहिती माझ्याकडे आहे आणि नेमका याचा चोर कोण आहे हेही मी वेळ आल्यानंतर जनतेसमोर
जाहिर करणार असून, त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला कळणार आहे की चोर कोण आहे .मग
दुध का दुध पाणी का पाणी होणार असल्याचा टोला त्यांनी पत्रकांरांशी बोलताना
लागवला.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, स्व.हिंदुहृदयसम्राट
बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना एक विचार होता. सन 2019 नंतर राष्ट्रवादीची
शिवसेना केल्यानेच आम्हाला उठाव करावा लागला आहे. आणि आम्ही उठाव केल्यानेच
कर्नाटक राज्यात समावेश असणा-या मराठी गावातील जनतेवर होणा-या अन्याया विरोधात
राज्य शासनाने नव्याने समन्वय समिती गठीत केली आहे.आहो वाचाळवीर भास्कर जाधव गत अडीच वर्षात या
सिमाभागातील मराठी बांधवाकरीता असलेल्या राज्य शासनाच्या विविध योजना ही बंद
करण्याचे पाप केले होते. त्यामुळे कर्नाटक सिमा भागातील मराठी बांधवावर बोलण्याचा
आपल्याला कोणताच अधिकार नाही. गत 15 वर्षात वेगवेगळे पक्षात उड्या मारुन
पक्षनिष्ठा काय असते ते वाचाळवीर भास्कर जाधव आम्हाला आमच्या तालुक्यात येऊन शिकवत
आहेत. वेगवेगळया पक्षात उड्या मारत आपली सरडयासारखी भूमिका बदलणाऱ्या आमदार भास्कर
जाधव यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये. शिल्लकसेना हा तुमचा कितवा पक्ष आहे आणि
तुम्ही किती दार फिरून आलात याचा विचार करावा मगच स्वताला निष्ठावंत म्हणावं जे
स्वताला निष्ठावंत म्हणवतात त्यांनी गत पंधरा वर्षात किती पक्षाच्या पाय-या झिजवल्या
त्याचा विचार करावा. शिवसेना ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ते
पुन्हा शिल्लकसेना असा प्रवास करणाऱ्या भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्ष
सोडल्यानंतर मातोश्री वर कसा अपमान होतो हे खुले आम डोंगोरा पिटला होता. तर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून डोक्यात मोठी हवा असताना
आपण उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरें यांचेबद्दल कुचेष्टा करून बोलल्याले जगजाहिर आहे.
आदित्य ठाकरे यांच्या आवाजाबद्दल कुचेष्टा करून त्यावर वासरू अशी टिका केली होती हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. आम्ही
उठाव केला म्हणून हे वाचळवीर शिल्लक सेनेचे नेते झाले, नेते झाले की यांच्याच डोक्यात
नेते पदाची हवा गेली आणि त्यांची काहीही वायफळ बडबड करणं सुरु आहे. नुकत्याच
झालेल्या नागपूरच्या अधिवेशनात जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची शिवसेना असं म्हटलं
होतं त्यावर भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीची शिवसेना म्हणून शिवसेना
राष्ट्रवादीची असल्याचा दुजोरा दिला होता.त्यामुळे तुमची सेना आता कोणती आहे हेही महाराष्ट्रातील जनतेने
चांगलेच ओळखले आहे.आमच्या तालुक्यात येऊन बोलण्याआधी आपण आपल्या मतदारसंघातील
जनतेच्या नागरी सुविधा यावर बोला आपल्या मतदारसंघातील जनतेला वेळेवर पाणी मिळत
नाही.रस्ते व्यवस्थित नाहीत.इतर मतदारसंघात जाऊन बडबड करण्यापेक्षा जनतेच्या
मुलभूत गरजा पुरवण्यावर भर द्यावा. म्हणजे किमान मतदारसंघातील जनता तरी तुम्हाला
धन्यवाद देईल.आमच्या मतदार संघातील विकास कामांवर बोलण्याआधी पाटण मतदारसंघातील
कामे पहा आणि झालेली कामे पाहण्याची जर हौस असले तर एकदा वेळ काढून नक्की या माझा
सामान्य कार्यकर्ताही तुम्हाला विधानसभा मतदारसंघातील मी केलेली विकास कामे मंजूर
रक्कमेच्या आकडेवारीसह दाखवतील.मतदारसंघात झालेल्या विकास कामांच्या जोरावरच आम्ही
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे शिल्लक सेनेला
व राष्ट्रवादी कॅाग्रसेला पाटण विधानसभा मतदारसंघातील जनेतेने त्यांची जागा दाखवली
आहे. गत दोन वर्षापूर्वी माझ्या विधानसभा मतदारसंघातील पूर परिस्थिती निर्माण झाली
होती. त्यावेळी सामान्य जनतेला आधार देण्याचे आम्ही प्रामाणिक काम केले होते.
त्यावेळी चिपळूण विभागात पूरपरिस्थिती झाली असताना चिपळूणमधील पुरग्रस्त महिलेला
तत्कालीन मुख्यमंत्री यांचेसमोर हे वाचळवीर महाशय काय बोलले होते ते सर्व
महाराष्ट्राने पाहिले आहे. दरम्यान लोटे औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या कोणी चोरल्या
याची सविस्तर माहिती माझ्याकडे आहे आणि नेमका याचा चोर कोण आहे. या चोरांचा बोलवता
धनी कोण आहे, हेही मी वेळ आल्यानंतर जनतेसमोर जाहिर करणार आहे. ते पुढे म्हणाले
की,. आम्हाला लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची शिकवण आहे. नाही तर त्यांच्याच
भाषेत उत्तरे आम्ही ही दिली असती अशा इशारा ही शेवठी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शेवटी
दिला.
No comments:
Post a Comment