दौलतनगर,ता.06: पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम
भागातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची मोठया प्रमाणांत दुरावस्था झाल्याने येथील
नागरीकांची दळणवळणाची मोठी गैरसोय होत असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी
पाटण विधानसभा मतदारसंघातील 06 गावांचे पोहोच रस्त्यांच्या कामांना प्रधानमंत्री
ग्रामसडक योजनेअंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास विभागाकडे दोन
वर्षापूर्वी शिफारशीसह प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु गत दोन वर्षापासून प्रधानमंत्री ग्रामसडक
योजनेतील रस्त्यांच्या कामांचा राज्याचा प्रस्ताव प्रलंबीत होता.राज्यामध्ये
बाळासाहेबांचा शिवसेना व भाजपा युतीचे शासन आल्यानंतर राज्य शासनाच्या सहकार्याने
केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निधी मंजूर
करण्याकरीता राज्य शासनाच्यावतीने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे राज्यातील
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 अंतर्गतर स्त्यांच्या कामांना मान्यता मिळाली
असून यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील 06 रस्त्यांच्या कामांसाठी 24 कोटी 57 लक्ष 92 हजार रुपयांचा निधी मंजूर
झाला असून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 अंतर्गत सुमारे 36 कि.मी.लांबीच्या रस्त्याचा
प्रश्न मार्गी लागणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात
आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे
की, पाटण विधानसभा मतदारसंघातील सन 2019-20 या आर्थिक वर्षापासून प्रधानमंत्री ग्रामसडक
योजनेअंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी ना.शंभूराज देसाई यांचा सातत्याने पाठपुरावा
सुरु होता. दरम्यान या संदर्भात दि. जुलै 2020 रोजी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या सर्व
उच्चस्तरीय अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.याबैठकीमध्ये प्रधानमंत्री
ग्रामसडक योजनेतंर्गत भाग ३ मध्ये करावयाच्या
रस्त्यांच्या संदर्भात ऑक्टोंबर २०१९ मध्ये केंद्र
शासनाकडून मार्गदर्शक सुचना निर्गमीत करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार नियमात
बसणाऱ्या कोणकोणत्या ग्रामीण रस्त्यांना प्राधान्य देता येईल,कोणते संभाव्य रस्ते करता येतील यांचा आराखडा तयार करुन तो लवकरात
लवकर मंजुरीकरीता सादर करण्याच्या सुचना ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या होत्या.त्यानुसार प्रधानमंत्री ग्रामसडक
योजना टप्पा 03 मध्ये केंद्र
शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचना
(गाईडलाईन्स) नुसार पाटण विधानसभा
मतदारसंघातील 06 प्रमुख रस्त्यांची
कामे प्रधानमंत्री ग्रामसडक
योजनेतंर्गत करण्याकरीता पालकमंत्री
ना.शंभूराज देसाईंच्या निर्देशानुसार
आराखडा तयार करुन तो
प्रस्ताव
राज्य शासनामार्फत केंद्र
शासनाकडे मंजुरीकरीता सादर
करण्यात आल्यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघातील 06
रस्त्यांच्या कामांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 अंतर्गत मंजूरी
देण्यात आली आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 अंतर्गत मंजूरी मिळालेल्या
रस्त्यांच्या कामांमध्ये एमआरएल 15 एमडीआर 29 ते बोंद्री रस्ता सुधारणा 4.850 कि.मी. करीता 349.28 लक्ष,एमआरएल 05 बेलवडे खुर्द सांगवड ते पापर्डे ब्रु// रस्ता सुधारणा 5.660 कि.मी.करीता 325.03 लक्ष,एमआरएल 14 एमडीआर 58 ते दिवशी पापर्डे रस्ता
सुधारणा 5.630 कि.मी.करीता 378.07 लक्ष,एमआरएल 26 बांबवडे गायमुखवाडी ते कळंबे रस्ता 07 कि.मी.करीता 493.79 लक्ष,
एमआरएल 16 एमडीआर 37 केळोली फाटा ते विरेवाडी केळोली
रस्ता 6.760 कि.मी.करीता 473.70 लक्ष व टी 02 सणबूर रुवले तामिणे वाल्मिकी रस्ता 6.750 कि.मी.करीता 438.05 लक्ष या कामांचा समावेश
आहे. राज्यामध्ये बाळासाहेबांचा शिवसेना व भाजपा युतीचे शासन आल्यानंतर राज्य
शासनाच्या सहकार्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्रामसडक
योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांना यश आले आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 अंतर्गत मंजूरी मिळालेल्या रस्त्यांच्या
कामांची निविदा प्रक्रिया तातडीने करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई
यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच पावसाळयापूर्वी या कामांना सुरुवात करण्यासाठी निविदा
प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येऊन प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 अंतर्गत
मंजूरी मिळालेल्या रस्त्यांची कामे दर्जेदार पध्दतीने करण्यासंदर्भातल्या सूचनाही
त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकां म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment