दौलतनगर,ता.28: -पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागात
वसलेल्या गावांत असलेल्या मागासवर्गीय वस्तींमधील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरावस्था
झाली होती.अतिवृष्टीमुळे या रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने या मागासवर्गीय
असलेल्या अनुसूचित जाती, नवबौध्द व मातंगवस्तींमधील रस्त्यांच्या कामांना निधी
मंजूर होण्यासाठी पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई
यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे या मागासवर्गीय
वस्त्यांमधील कामांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास येाजनेअंतर्गत
निधी मंजूर होण्यासाठी शिफारस केली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या सामाजिक न्याय
व विशेष सहाय्य विभागाकडून पाटण तालुक्यातील मागासवर्गीय वस्त्यांमधील कामांसाठी
निधी मंजूर केले असल्याचा शासन निर्णय पारीत केला असल्याची माहिती पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे
म्हंटले आहे की, राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसुचित जाती व नवबौध्द
घटकांच्या वस्त्यांचा व गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना या घटकांना मुलभूत
सुविधा पुरविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना शासनस्तरावरुन मान्यता
देण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास येाजनेअंतर्गत निधी
देण्याबाबतच्या शासन निर्णयानुसार पाटण
तालुक्यातील विविध गावांतील बौध्द व मातंगवस्तींमधील रस्त्यांच्या कामांना निधी
मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री
ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे या मागासवर्गीय वस्त्यांमधील कामांना भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास येाजनेअंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी शिफारस
केली होती.त्यानुसार राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून
पाटण तालुक्यातील मागासवर्गीय वस्त्यांमधील कामांसाठी निधी मंजूर केले असल्याचा शासन
निर्णय पारीत केला असून या कामांमध्ये कोदळ पुनर्वसन मागासवर्गीय वस्ती अंतर्गत
रस्ता सुधारणा 15 लाख,मरळी
मागासवर्गीय वस्तीमध्ये सुरक्षा भिंतसह सुधारणा
25 लाख,गाढखोप बौध्दवस्ती रस्ता सुधारणा
15 लाख,काळोली बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,चोपडी बौध्दवस्ती व मातंगवस्ती अंतर्गत
रस्ता सुधारणा 15 लाख,तोंडोशी मागासवर्गीयवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,दुटाळवाडी नुने,ता.पाटण
मागासवर्गीयवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा
15 लाख,ठोमसे मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,मराठवाडी मेंढ
मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,चौगुलेवाडी मातंगवस्ती अंतर्गत रस्ता
सुधारणा 15 लाख,कोंजवडे मातंगवस्ती रस्ता सुधारणा
15 लाख,तारळे चर्मकारवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,आडूळ गावठाण मागासवर्गीय वस्ती अंतर्गत
रस्ता सुधारणा 15 लाख,महिंद बौध्दवस्ती स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख,सणबूर बौध्दवस्ती स्मशानभूमी रस्ता
सुधारणा 15 लाख,बहुले बौध्दवस्ती स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख,मल्हारपेठ बौध्दवस्ती स्मशानभूमी रस्ता
सुधारणा 15 लाख,दुसाळे बौध्दवस्ती पोहोच
रस्ता सुधारणा 15 लाख,कुशी ते वेखंडवाडी बौध्दवस्ती रस्ता खडी.,डांबरीकरण 15 लाख,चोपदारवाडी बौध्दवस्ती स्मशानभूमी रस्ता
खडी.,डांबरीकरण 15 लाख,पेठशिवापूर
बौध्दवस्तीमध्ये स्मशानभूमी रस्ता सुधारणा
15 लाख,कडवे बुद्रुक येथे मातंगवस्ती स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख,राहुडे बौध्दवस्ती स्मशानभूमी रस्ता
सुधारणा 15 लाख,बांबवडे बौध्दवस्ती
स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख,बाचोली
मागासवर्गीय वस्ती स्मशानभूमी रस्ता सुधारणा
15 लाख,रुवले बौध्दवस्ती स्मशानभूमी पोहोच रस्ता सुधारणा 15 लाख या कामांचा समावेश आहे. भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मंजूर विकास कामांच्या लवकरच
निविदा प्रक्रिया करण्यात येणार असून लवकरात लवकर या कामांना सुरुवात करण्याच्या
सुचना संबंधित अधिकारी यांना दिल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत
देण्यात आली आहे.
चौकट:- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतील सन 2021-22 च्या कामांना निधी वर्ग.
पालकमंत्री ना. शंभूराज
देसाई यांचे प्रयत्नातून सन 2021-22च्या मंजूर भारतरत्न डॉ.बाबासाहेब
आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व
विशेष सहाय्य विभागांतर्गत दि. 04 ऑक्टोंबर 2021 रोजीचे शासन निर्णयानुसार मंजूर मरळी,आवर्डे,मरळोशी,गोकूळ
तर्फ पाटण,आटोली,नाटोशी,आडूळ गावठाण,केरळ,रासाटी,कसणी, सावरघर, कुशी पुनर्वसन
आवर्डे,चिंचेवाडी वजरोशी,तामिणे,आंबवणे,ढोकावळे येथील मागासवर्गीय वस्त्यांमधील
कामांकरीता 1.50 कोटी, दि.03 मार्च 2022 रोजीचे शासन निर्णयानुसार मंजूर हुंबरणे,बाहे,धावडे,आंबेघर,सोनवडे,सोनाईचीवाडी
बौध्दवस्ती व किल्लेमोरगिरी मातंगवस्तीमध्ये अभ्यासिका बांधण्याच्या 01 कोटी र अशा
2.50 कोटी रुपयांच्या कामांना निधी वर्ग झाला असल्याने सदरची कामे मार्गी लागणार
आहे.
No comments:
Post a Comment