Thursday 23 February 2023

दौलतनगर,ता.पाटण येथे शनिवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचेकरीता एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन.

 

दौलतनगर दि.23:- पाटण विधानसभा मतदारसंघातील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या पध्दतीने करण्याबरोबर राज्य शासनाच्या विविध योजना ह्या ग्रामस्तराव प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने पाटण विधानसभा मतदारसंघातील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची एकदिवशीय कार्यशाळा शनिवार दि. 25 फेब्रुवारी  2023 रोजी सकाळी 10.00 वा. महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर येथे आयोजित केली आहे. या एकदिवशीय कार्यशाळेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते होणार आहे.यावेळी सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व सातारा जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.या एकदिवशीय कार्यशाळेच्या पहिल्या प्रशिक्षण सत्रामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील हे सकाळी 11.30 ते 12.30 वा. पर्यंत सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा ग्रामपंचायतीच्या कामकाजातील सक्रीय सहभाग या विषयावार तर दुपारी 12.30 ते 01.30 वा. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान महाराष्ट्र राज्य पुणेचे राज्यप्रकल्प संचालक आनंद भंडारी यांचे ग्रामपंचायत विकास आराखडा जीपीडीपी व ई ग्रामस्वराज या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी 02.30 ते 03.30 वा.पर्यंत पंचायत समिती संगमनेर जि.अहमदनगरचे सहायक गट विकास अधिकारी संदिप वायाळ हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ग्रामसमृध्दी या विषयावर तर दुपारी 03.30 ते 04.30 वा.पर्यंत यशदा तथा संचालक राज्य ग्रामीण विकास संस्था महाराष्ट्र राज्य पुणे चे उपसंचालक डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांचे शाश्वत विकास उद्दीष्टये व विविध शासकीय योजनांमध्ये लोकसहभाग याविषयावर मार्गदर्शन करणार आहेत.तर सायं.04.30 ते 5.00 वा. यावेळेत एकदिवसीय कार्यशाळेच्या समारोप होणार असून यावेळी समारोपप्रसंगी सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंतशी व सातारा जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले हे मार्गदर्शन करणार असून पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी सदर एकदिवशीय कार्यशाळेला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवशाही सरपंच संघ पाटण तालुका संघटनेचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

Thursday 16 February 2023

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना आसवनी/इथेनॉल/को-जनरेशन प्रकल्प उभारणार. विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांचा निर्णय. राज्य शासन सर्वोत्परी सहकार्य करणार-पालकमंत्री ना.शंभूराज देसाई.

 

दौलतनगर दि.16:- पाटणची अर्थवाहिणी असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने बीओओटी / बीओटी तत्त्वावर आसवनी/ इथेनॅाल / को-जनरेशन प्रकल्प उभारण्यासाठी विशेष सर्व साधारण सभेचे आयोजन केले होते.यावेळी उपस्थित सभासदांनी इथेनॉल प्रकल्प बीओओटी / बीओटी तत्वावर उभारण्यासाठी एकमताने मंजूरी देत प्रकल्प्‍ उभारण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे संचालक मंडळाला देण्यात आले. या सभेकरीता कारखान्याचे मार्गदर्शक संचालक ना.शंभूराज देसाई हेऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी/ इथेनॅाल / को-जनरेशन प्रकल्पासाठी राज्य शासन सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी कटीबद्द असल्याची ग्वाही राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी ऑनलाईन बोलताना दिली.

             लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर येथे आयोजित केली होती यावेळी चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांचेसह व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,मा.चेअरमन अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण,संचालक शशिकांत निकम,बबनराव शिंदे,प्रशांत पाटील,भागोजी शेळके,बळीराम साळुंखे, सर्जेराव जाधव,शंकरराव पाटील,सोमनाथ खामकर,विजय सरगडे,संचालिका श्रीमती जयश्री कवर, सौ.दिपाली पाटील,जालंदर पाटील,विजयराव मोरे,संतोष गिरी,बबनराव भिसे,प्रकाशराव जाधव, विजयराव जंबुरे,कार्यकारी संचालक एस.एल.देसाई,फायनान्स मॅनेंजर व्ही.ए.देसाई यांचेसह सर्व संचालक मंडळ, शिवदौलत बॅंकेचे चेअरमन संजय देशुमख, ऊस उत्पादक सभासद पदाधिकारी कार्यकर्ते,कारखाना अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

                याप्रसंगी बोलताना ना.देसाई म्हणाले की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्योच माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी उभारलेला हा कारखाना स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांनी काटकसरीचे धोरण अवलंबून चालवला,कमी कालावधीमध्ये आपला कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा केला. सध्या महाराष्ट्रीचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व मंत्रीमंडळ हे सहकारी साखर कारखान्यांचा विस्तारवाढ करण्यासाठी  सकारात्क असून,आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यालाही राज्य  शासनाकडून  विस्तारवाढीकरीताआर्थिक मदताचा शासन निर्णय  झाला असून कारखान्याचा निधी वर्ग होण्याचा प्रस्ताव दाखल ही केला असून, याच वर्षात या निधीची तरतूद करुन आपल्या कारखान्यास निधी वितरित करण्याबाबत शासन स्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत. पाटण सारख्या डोंगरी व दुर्गम अशा तालुक्यामध्ये पहिल्यापासून आपण अडचणीच्या काळामध्ये कारखाना चालवला. सध्या महाराष्ट्रामध्ये 1250 मे.टन क्षमता असलेल्या सहकारी साखर कारखान्यांमध्ये आपला एकमेव सहकारी साखर कारखाना चांगल्या पध्दतीने सुरु असून 1250 मे.टन क्षमतेचे अनेक कारखाने बंद पडले,अवसानात,लिलावात निघाले.सध्या सहकार क्षेत्रामध्ये अनेक नविन बाबी समोर येत आहेत. पाच हजार मे.टन क्षमतावाढीबरोबर डिस्टीलरी/इथेनॉल उत्पादन अशा उपपदार्थांचे उत्पादन करण्याचे धोरण राज्य शासनाकडून राबविण्यासाठी सहकार्य करण्यात येत आहे.  

       दरम्यान चेअरमन यशराज देसाई म्हणाले 2500 मे.टन.क्षमतावाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन सध्या कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. शासनाच्या भाग भांडवलातून कर्ज उभारणी करत हे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आपल्या कारखान्याची सरासरी गाळप क्षमता वाढ झाली आहे.कारखान्याचे गाळप क्षमता वाढीबरोबर इथेनॉलचे उत्पादन करणे गरजेचे असून आसवनी/ इथेनॅाल / को-जनरेशन प्रकल्प उभारणीसाठी जादा खर्च अपेक्षित असल्याने बीओओटी / बीओटी तत्त्वावर प्रकल्प उभारण्यासाठी आजची ही विशेष सर्व साधारण सभा घेण्यात आली. सध्या केंद्र शासनाने इथेनॉल उत्पादन करण्याचे धोरण राबविले असून इथेनॉल प्रकल्प फायद्यात आहे. हा प्रकल्प उभारणीसाठी सर्व सभासदांच्या सहकार्यातून सभासदांच्या हिताचाच निर्णय संचालक मंडळाकडून घेण्यात येईल असे शेवटी त्यांनी सांगीतले.

 चालू वर्षी राज्यामध्ये ऊसाचे 25 ते 30 टक्के उत्पादन कमी झाले आहे. आपले कारखान्याचे विस्तारीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून लवकरच विस्तारीकरणाचे दुसऱ्या टप्प्याचे काम चालू करत आहोत.कारखान्याचे विस्तारीकरणासाठी कर्ज घेतले असून उपपदार्थ प्रकल्पासाठी सुमारे 125 कोटी खर्च अपेक्षित असून दोन्ही कर्ज मिळून अंदाजे 175कोटी कर्ज कारखान्यास  आर्थिकदृष्टया जास्त होणार असून तो न परवडणारा आहे. 60 केएलपीडी डिस्टीलरी 213 दिवस चालली तर साखरेपेक्षा 18 ते 19 कोटी रुपये जादा उत्पन्न मिळणार आहे. आपले कारखान्याचे सारख हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असूनही आपण इतर कारखान्यांच्या बरोबर ऊस दर देत असल्याने सर्व सभासदांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस आपले कारखान्यास गळीतास द्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले. स्वागत व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी केले तर आभार संचालक बबनराव शिंदे यांनी मानले.

Monday 13 February 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून रस्ते व पूल परिरक्षण व दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत होणार दुरुस्ती. नाडे ढेबेवाडी रस्त्यावरील सांगवड गावाजवळील कोयना नदीवरील पुलाचे दुरुस्तीसाठी 02 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

 


 

   दौलतनगर दि.13 :- पाटण तालुक्यातील नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा 58 वर किमी 1/120 मध्ये सांगवड गावाजवळ कोयना नदीवर असलेल्या पुलाच्या दुरुस्तीकरीता निधी मंजूर होण्याकरीताचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या.त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नाडे ढेबेवाडी या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यावरील सांगवड येथील पुलाचे दुरुस्तीकरीता निधी मंजूरीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आला होता.त्यानुसार सांगवड येथील पुलाचे दुरुस्तीकरीता सन 2022-23 चे रस्ते व पूल परिरक्षण व दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत 02 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून या मंजूर निधीतून सांगवड येथील पुलाचे मजबूतीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्‍दीपत्रकांत देण्यात आली आहे.

           प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रयत्नातून पाटण तालुक्यातील दळण-वळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नाडे ढेबेवाडी या रस्त्यावरील सांगवड गावाजवळ कोयना नदीवर मोठया पूलाची उभारणीचे कामाला दि.10 एप्रिल 1958 ला सुरुवात होऊन दि. 31 मार्च 1963 ला या पुलाचे काम झाले. तेव्हापासून या पुलावरुन वाहतूक सुरळीत सुरु आहे. दरम्यानच्या कामालवधीमध्ये कोयना परिसरासह पाटण तालुक्यात प्रती वर्षी होणा-या अतिवृष्टीने कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे  सांगवड येथील या पुलाची दुरुस्ती होणे गरजेचे होते. प्रती वर्षी किरकोळ दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत होती. परंतु या पुलाचा कालावधीचा विचार करता याचे मजबुतीकरणासाठी भरीव निधीची तरतुद होण्याकरीता पालकमंत्री ना.शंभूराज देसाई  यांनी दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीने शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नाडे ढेबेवाडी या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यावरील सांगवड येथील पुलाचे दुरुस्तीकरीता निधी मंजूरीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आला. तद्नंतर पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सांगवड येथील पुलाचे दुरुस्तीकरीता सन 2022-23 चे रस्ते व पूल परिरक्षण व दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत 02 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव(रस्ते) यांनी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे यांना लेखी पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.सन 2022-23 मध्ये रस्ते देखभाल दुरुस्ती अंतर्गत योजनेतर तरतूदीमधून रस्ते दुरुस्ती करणेचा कार्यक्रम संदर्भानुसार हा मंजूर निधी प्राप्त झाला असून या निधीतून सांगवड येथील कोयना नदीवरील मोठया  पुलाचे मजबुतीकरणासह दुरुस्तीचे काम पुर्णत्वाकडे जाणार आहे.दरम्यान नाडे ढेबेवाडी या प्रमुख जिल्हा मार्गावरील सांगवड येथील पुलाचे मंजूर असलेले हे काम तातडीने पुर्ण होण्याकरीता लवकरात लवकर या कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण करण्यात येऊन हे सांगवड पुलोच दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे निर्देश पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून रविवार दि. 19 रोजी दौलतनगर,ता.पाटण येथे शिव दौलत नोकरी महामेळाव्याचे आयोजन. पुणे,सातारा व कोल्हापूर येथील विविध 50 कंपन्यांचा असणार सहभाग.

 

दौलतनगर दि.13:- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती सोहळा व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार युवक व युवतींना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने रविवार दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 09 ते सायं.05 यावेळेत दौलतनगर(मरळी),ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई  शताब्दी स्मारक येथे शिव दौलत नोकरी महामेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण या डोंगरी व दुर्गम तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याकरीता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती सोहळा व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून रविवार दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 09 ते सायं.05 यावेळेत दौलतनगर(मरळी),ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे शिव दौलत नोकरी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.सदर नोकरी महामेळाव्यामध्ये पुणे,सातारा व कोल्हापूर येथील विविध नामवंत कंपन्यांचा सहभागी होणार असून या नोकरी महामेळाव्यामध्ये इयत्ता 05 वी ते पदवीधर उत्तीर्ण असलेल्या युवक युवतींना नोकरी मिळण्याच्यादृष्टीने मोफत सहकार्य करण्यात येणार आहे.दरम्यान या नोकरी महामेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक युवक व युवतींनी दौलत नोकरी महामेळाव्याचे वेबाईवरील फॉर्म आवश्यक त्या माहितीसह भरुन ऑनलाईन नोंदणी करावी.तसेच रविवार दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 09 ते सायं.05 यावेळेत दौलतनगर(मरळी), ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे उपस्थित राहिलेल्या युवक युवतींच्या दोन सत्रामध्ये मुलाखती घेण्यात येणार असून मुलाखत व निवड झालेल्या युवक युवतींचे निवडपत्रांचे वाटपही  यावेळी करण्यात येणार आहे. दौलतनगर ता.पाटण येथील रविवारी होणाऱ्या नोकरी महामेळाव्यामध्ये मॅन्यूफॅक्चरिंग टेलिकॉम,बँकींग फायनान्स,बीपीओ/केपीओ रिटेल,ट्रेनिंग हॉटेल्स व सिक्यूरिटी हॉस्पीटॅलिटी या सेक्टरच्या माध्यमातून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार युवक युवतींना नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याने या रोजगार महामेळाव्यामध्ये पाटण विधासभा मतदारसंघातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी सहभागी व्हावे,असे आवाहनही शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

Thursday 9 February 2023

मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघात मंत्री ना. शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून 276 शाखांचे शुभारंभ.

 


  दौलतनगर दि.09:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे दि.09 फेब्रुवारी रोजीच्या वाढदिवसानिमित्त ठाणे ,सातारा जिल्हयाचे पालकमंत्री व राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी,शिवसैनिक यांनी मतदारसंघामध्ये पक्षसंघटना वाढविण्याच्या दृष्टीने वाढदिवसाची एक अनोखी भेट मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांना दिली आहे. पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या गावो-गावी तब्बल 276 नवीन शांखाचा शुभारंभ स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या या संकल्पनेला पाटण विधानसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळाला असून पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनतेच्या वतीने गावोगावी बाळासाहेबांची शिवसेना शाखांचा शुभारंभ करत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमीत्त  अनोखी भेट दिली. ना.शंभूराज देसाई  यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे  मुंबई येथील निवासस्थानी भेट देत पाटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्यावतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन वाढदिवस अभिष्टचिंतन केले व मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांना दीर्घायुष्य लाभावे अशी सदिच्छा व्यक्त केली.

         वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार आणि धर्मवीर स्व. आनंद दिघेसाहेब यांची माणसुकीची शिकवण यांच्या आधारे बाळासाहेबांची शिवसेना जनसेवेत कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण या सूत्रानुसार कार्यरत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुभारंभ करण्यात असलेल्या २76 शाखा जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी तत्पर राहतील, सोबतच युवा सेना, महिला आघाडीच्या माध्यमातून युवकांसह महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होईल असा विश्वास मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. तसेच सर्व स्थानिक पदाधिकारी, शाखाप्रमुख, शिवसैनिक व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून ना. शंभूराज देसाई साहेबांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पाटण तालुक्यात ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त गावो-गावी पक्ष संघटना वाढविण्यासाठी गावनिहाय शाखा सुरु करुन एकाच दिवशी या शाखांचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 276 शाखांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.यामध्ये नाणेगाव पुनर्वसन,माजगाव,चाफळ,जाळगेवाडी खालची ,जाळगेवाडी वरची,माजगाव माळवस्ती, जाधववाडी, माथणेवाडी, कवठेकरवाडी,सुर्याचीवाडी,कडववाडी,तोरस्करवाडी,नाणेगाव खुर्द,केळाली,मसुगडेवाडी केळोली,बाटेवाडी,तावरेवाडी,नारळवाडी,मसुगडेवाडी,पाडळोशी,कोचरेवाडी,दाढोली,बाबरवाडी,मसुगडेवाडी दाढोली,खोणोली,डेरवण,शिंगणवाडी,सडावाघापूर,सडाबोडकी,सडानिनाई,सडादाढोली,सडादुसाळे,दुसाळे,बांधवाट,चिंचेवाडी,पांढरवाडी,तारळे,आंबळे,वेखंडवाडी, राहुडे, निवडे, नुने, दुटाळवाडी, जाधववाडी, लोरेवाडी, कोंजवडे, भुडकेवाडी खालची,भुडकेवाडी वरची,कडवे बुद्रुक,केळेवाडी वरची, पाडेकरवाडी, घाटेवाडी, मालोशी, मुरुड, धुमकवाडी,आवर्डे,मरळोशी,वाघळवाडी ढोरोशी, आंबेवाडी, जन्नेवाडी, जुगाईवाडी, बोर्गेवाडी, घोट, सावरघर, बांबवडे, खडकवाडी,जंगलवाडी,जिमनवाडी,बागलेवाडी,मोगरवाडी,गर्जेवाडी, कडवे खुर्द, जगदाळवाडी, गोरेवाडी, तोंडोशी,गायमुखवाडी,कळंबे,बामणेवाडी,डफळवाडी,वाझोली,सुपुगडेवाडी,कुठरे,पवारवाडी,मोरेवाडी,निगडे,घोटील,पाचुपतेवाडी,गुढे,तळमावले,साईकडे,करपेवाडी,शिद्रुकवाडी,खळे,काढणे,बागलवाडी,तुपेवाडी,मानेगाव,मान्याचीवाडी,कुंभारगाव,चाळकेवाडी,गलमेवाडी,कुंभारगाव,काळगाव,वेताळ,कुमाळ,लोटलेवाडी,मस्करवाडी,काळगाव, करपेवाडी, धनगरवाडा, भरेवाडी, रामिष्टेवाडी, येळेवाडी,घोटील,निगडे,कसणी,निवी, उमरकांचन, सावंतवाडी, धनावडेवाडीमराठवाडी,भोसगाव,ढेबेवाडी,साबळेवाडी,मालदन,सुतारवाडी,जिंती,मोडकवाडी,माईगडेवाडी,सातर,अनुतेवाडी,कोळेकरवाडी,मेंढ,जाधववाडी,मत्रेवाडी,आंब्रुळकरवाडी,मान्याचीवाडी,महिंद,सणबूर,जानुगडेवाडी,शितपवाडी,नाडे,पांढरवाडी तेलेवाडी,क्रांतीनगर माथणेवाडी,आडूळ पेठ,आडूळ गावठाण,कवरवाडी,मुळगाव, आंब्रुळे, नेरळे, चेवलेवाडी,चोपडी,बेलवडे,त्रिपुडी,नाडोली,डिगेवाडी,साजूर,उत्तरतांबवे,गमेवाडी,आबईचीवाडी,सोनाईचीवाडी,ठोमसे,येराडवाडी,नारळवाडी,जमदाडवाडी,मल्‍हारपेठ1,मल्हारपेठ2,नवसरवाडी,गणेवाडी,तांबेवाडी,आबदारवाडी,गिरेवाडी,बोडकेवाडी,ऊरुल,मंद्रुळहवेली,वेताळवाडी,खिलारवाडी,शेडगेवाडी,नावडी,भारसाखळे,वनकुसवडे,घाणबी,वाटोळे,दिवशीखुर्द,मराठवाडी,जुंगठी,खिवशी,म्हारवंड,निवकणे,मणदुरे,कोकीसरे,मोरगिरी,पेठशिवापूर,नाटोशी,सातेवाडी,झाकडे,‍दिक्षी,धावडे,गुरेघर,काहिर,आटोली,कळकेवाडी,किल्लेमोर‍गिरी,आटोली,आंब्रग,पाचगणी,गोकूळतर्फपाटण, पांढरेपाणी,बाहे,शिद्रुकवाडीधावडे,वाडीकोतावडे,कदमवाडीनाटोशी,कुसरुंड,आंबेघरतर्फमरळी, गोकूळनाला,कोयनानगर,देशमुखवाडी,ऐनाचीवाडी,हुंबरळी,तोरणे,कामरगाव,मानाईनगर,नवजा,रासाटी,आंबेघर किसरुळे, किसरुळे, किसरुळे भराडेवस्ती, बोपोली, गोवारे, देवघर, येराड, तामकडे, टोळेवाडी, आंबवणे, कातवडी, कवडेवाडी,तामकणे,घाणव,चिटेघर,येरफळे,कोतावडेवाडी साखरी,केरळ,धडामवाडी केरळ, काळोली, पिंपळोशी, बोंद्री, जाईचीवाडी, बिबी,सलतेवाडी ताटेवाडी,लुगडेवाडी,मारुल तर्फ पाटण, शिरळ, हुंबरवाडी, सोनवडे, शिंदेवाडी, सुळेवाडी,डावरी,धजगाव,भिलारवाडी,मारुलहवेली,दिवशीबु,पापर्डे,गारवडे,बहुले,हावळेवाडी,जरेवाडी,पाळेकरवाडी,कोरिवळे,टेळेवाडी,मरळी,गव्हाणवाडी,चोपदारवाडी,सांगवड,सुर्यवंशीवाडी चौगुलेवाडी,विहे नविन वसाहत,विहे जुने गाव या गावांमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या शाखांचा स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. तसेच युवा सेना व महिला आघाडी यांच्या 59 शाखांचा ही सोबत शुभारंभ केला.

  चौकट:-ना.एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रमांना साजरा.

        महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे गुरुवार दि. 09 रोजीचा वाढदिवस हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून पाटण मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व ग्रामीण रुग्णालय  पाटण व ढेबेवाडी येथे सर्व रोग निदान व रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्ष संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेकडून शालेय विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

चौकट: मुख्यमंत्र्याकडून ना.शंभूराज देसाई यांनी वाढदिवसानिमित्त राबविलेल्या विविध उपक्रमाचे केले कौतुक.

          मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणेकरीता ठाणे ,सातारा जिल्हयाचे पालकमंत्री राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पक्ष संघटना वाढीसाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या एका दिवसामध्ये तब्बल 276 शाखांचे गावो-गावी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आले. यशस्वी शुभारंभ केल्याबद्दल मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे उपक्रमाचे कौतुक करुन पाटण विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

Tuesday 7 February 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण मधील 09 गावातील 14.500 कि.मी.अंतराच्या अतिरिक्त पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूरी.

 


दौलतनगर दि.07 :-पाटण मतदारसंघातील शेत/पाणंद रस्त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील 38 गावातील सुमारे 50 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार  पाटण मतदारसंघातील 28 गावातील सुमारे 35.500 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश हा मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखडयामध्ये समावेश करत या शेत/पाणंद रस्त्यांना मंजूरी देण्यात आली असल्याचा शासन निर्णय दि.23 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनाचे नियोजन विभाग(रोहयो) यांनी पारित केला होता.दरम्यान उर्वरित 09 रस्त्यांचाही पुरवणी आराखडयात समावेश करण्यात आला असल्याने 14.500 कि.मी.रस्त्यांचे कामांना मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते  योजनेअंतर्गत मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, शेतकऱ्यांना शेतीचे मशागतीचे साहित्य व शेत मालाची वाहतूक करण्यासाठी शेत पाणंद रस्त्यांची सुविधा नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेत पाणंद रस्त्यांची कामे झाल्यास शेतकऱ्यांच्या बांधावर वाहन जाऊन शेती विषयक कामे जलदगतीने पुर्ण होण्यास मदत होणार आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची शेत/पाणंद रस्त्यांअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्य शासनाच्या रोजगार हमी विभागाकडे शेत/पाणंद रस्ते मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये मातोश्री  ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत दोन टप्प्यामध्ये आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील तब्बल 63 गावांतील 69 कि.मी.लांबीचे शेत पाणंद रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.तसेच सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखडयांतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील 28 गावांतील सुमारे 35.500 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश केला हेाता. तर उर्वरित 09 रस्त्यांचाही पुरवणी आराखडयात समावेश करण्यात आला असल्याने 14.500 कि.मी.रस्त्यांचे कामांना मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते  योजनेअंतर्गत मंजूरी देण्यात आली असल्याचा सुधारित शासन निर्णय राज्य शासनाचे नियोजन विभाग(रोहयो प्रभाग) यांनी दि.27 जानेवारी 2023 रोजी पारित केला असून यामध्ये ठोमसे लोहारवस्ती ते शंभूराज मंदिर पाणंद रस्ता 02 कि.मी., येराडवाडी ग्रामपंचायत ते पाणी पुरवठा विहिर माकडी शिवार पाणंद रस्ता 01 कि.मी., लेंढोरी प्राथमिक शाळा ते नदीपर्यंत पाणंद रस्ता 02 कि.मी., ऊरुल महेश निकम यांचे शेड ते गाव विहिर पर्यंत पाणंद रस्ता 1.500 कि.मी., कोरिवळे ते पाळेकरवाडी पाणंद रस्ता 1.500 कि.मी., ढेरुगडेवाडी(येराड) ढेरुगडेवाडी येराड हुंबरपेढा येथे पाणंद रस्ता 1.500 कि.मी., कुठरे पागेवाडी ते वाझोली पाणंद रस्ता 01 कि.मी., झाकडे येथे पाणंद रस्ता 02 कि.मी., माजगाव ऊरुल पाणंद रस्ता 02 कि.मी. या 09 गावांतील 14.500 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश असून मातोश्री शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना निधी राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत उपलब्ध होऊन या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.