दौलतनगर दि.23:- पाटण विधानसभा मतदारसंघातील सरपंच,उपसरपंच
व ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या पध्दतीने करण्याबरोबर राज्य
शासनाच्या विविध योजना ह्या ग्रामस्तराव प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने पाटण विधानसभा
मतदारसंघातील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची एकदिवशीय कार्यशाळा शनिवार दि.
25 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वा. महाराष्ट्र
दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर येथे आयोजित केली आहे. या एकदिवशीय
कार्यशाळेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई
यांचे शुभहस्ते होणार आहे.यावेळी सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सांगली
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व सातारा जिल्हा परिषदेचे प्रभारी
मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.या एकदिवशीय
कार्यशाळेच्या पहिल्या प्रशिक्षण सत्रामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद
सदस्य शरद बुट्टे पाटील हे सकाळी 11.30 ते 12.30 वा. पर्यंत सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत
सदस्यांचा ग्रामपंचायतीच्या कामकाजातील सक्रीय सहभाग या विषयावार तर दुपारी 12.30 ते
01.30 वा. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान महाराष्ट्र राज्य पुणेचे राज्यप्रकल्प संचालक
आनंद भंडारी यांचे ग्रामपंचायत विकास आराखडा जीपीडीपी व ई ग्रामस्वराज या विषयावर मार्गदर्शन
करणार आहेत. तर दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी 02.30 ते 03.30 वा.पर्यंत पंचायत समिती संगमनेर
जि.अहमदनगरचे सहायक गट विकास अधिकारी संदिप वायाळ हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण
रोजगार हमी योजनेतून ग्रामसमृध्दी या विषयावर तर दुपारी 03.30 ते 04.30 वा.पर्यंत यशदा
तथा संचालक राज्य ग्रामीण विकास संस्था महाराष्ट्र राज्य पुणे चे उपसंचालक डॉ.मल्लीनाथ
कलशेट्टी यांचे शाश्वत विकास उद्दीष्टये व विविध शासकीय योजनांमध्ये लोकसहभाग याविषयावर
मार्गदर्शन करणार आहेत.तर सायं.04.30 ते 5.00 वा. यावेळेत एकदिवसीय कार्यशाळेच्या समारोप
होणार असून यावेळी समारोपप्रसंगी सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंतशी व सातारा
जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले हे मार्गदर्शन करणार
असून पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी सदर
एकदिवशीय कार्यशाळेला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवशाही सरपंच संघ पाटण
तालुका संघटनेचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.
No comments:
Post a Comment