दौलतनगर दि.09:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे दि.09 फेब्रुवारी
रोजीच्या वाढदिवसानिमित्त ठाणे ,सातारा जिल्हयाचे पालकमंत्री
व राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून पाटण
विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी,शिवसैनिक यांनी मतदारसंघामध्ये पक्षसंघटना वाढविण्याच्या दृष्टीने
वाढदिवसाची एक अनोखी भेट मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांना दिली आहे. पाटण
विधानसभा मतदारसंघामध्ये मंत्री
ना.शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या गावो-गावी तब्बल 276 नवीन शांखाचा शुभारंभ स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते
यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या या संकल्पनेला पाटण विधानसभा मतदारसंघात
चांगला प्रतिसाद मिळाला असून पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनतेच्या वतीने
गावोगावी बाळासाहेबांची शिवसेना शाखांचा शुभारंभ करत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
यांना वाढदिवसानिमीत्त अनोखी भेट दिली. ना.शंभूराज देसाई यांनी
मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे मुंबई
येथील निवासस्थानी भेट देत पाटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्यावतीने वाढदिवसाच्या
शुभेच्छा देऊन वाढदिवस अभिष्टचिंतन केले व मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांना दीर्घायुष्य लाभावे अशी सदिच्छा व्यक्त केली.
वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत
विचार आणि धर्मवीर स्व. आनंद दिघेसाहेब यांची माणसुकीची शिकवण यांच्या आधारे बाळासाहेबांची
शिवसेना जनसेवेत कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली
बाळासाहेबांची शिवसेना २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण या सूत्रानुसार कार्यरत
आहे. आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुभारंभ करण्यात
असलेल्या २76 शाखा जनसामान्यांच्या
प्रश्नांना न्याय देण्यासाठी तत्पर राहतील, सोबतच युवा सेना, महिला आघाडीच्या माध्यमातून
युवकांसह महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होईल असा विश्वास मंत्री ना. शंभूराज देसाई
यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. तसेच सर्व स्थानिक पदाधिकारी, शाखाप्रमुख, शिवसैनिक
व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून ना. शंभूराज देसाई साहेबांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी
शुभेच्छा दिल्या. पाटण तालुक्यात
ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते
यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त गावो-गावी पक्ष संघटना वाढविण्यासाठी
गावनिहाय शाखा सुरु करुन एकाच दिवशी या शाखांचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार
पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 276 शाखांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.यामध्ये नाणेगाव पुनर्वसन,माजगाव,चाफळ,जाळगेवाडी खालची
,जाळगेवाडी वरची,माजगाव माळवस्ती, जाधववाडी, माथणेवाडी,
कवठेकरवाडी,सुर्याचीवाडी,कडववाडी,तोरस्करवाडी,नाणेगाव खुर्द,केळाली,मसुगडेवाडी
केळोली,बाटेवाडी,तावरेवाडी,नारळवाडी,मसुगडेवाडी,पाडळोशी,कोचरेवाडी,दाढोली,बाबरवाडी,मसुगडेवाडी
दाढोली,खोणोली,डेरवण,शिंगणवाडी,सडावाघापूर,सडाबोडकी,सडानिनाई,सडादाढोली,सडादुसाळे,दुसाळे,बांधवाट,चिंचेवाडी,पांढरवाडी,तारळे,आंबळे,वेखंडवाडी,
राहुडे, निवडे, नुने, दुटाळवाडी, जाधववाडी, लोरेवाडी, कोंजवडे, भुडकेवाडी
खालची,भुडकेवाडी वरची,कडवे बुद्रुक,केळेवाडी वरची, पाडेकरवाडी, घाटेवाडी, मालोशी,
मुरुड, धुमकवाडी,आवर्डे,मरळोशी,वाघळवाडी ढोरोशी, आंबेवाडी, जन्नेवाडी, जुगाईवाडी,
बोर्गेवाडी, घोट, सावरघर, बांबवडे,
खडकवाडी,जंगलवाडी,जिमनवाडी,बागलेवाडी,मोगरवाडी,गर्जेवाडी, कडवे खुर्द, जगदाळवाडी,
गोरेवाडी, तोंडोशी,गायमुखवाडी,कळंबे,बामणेवाडी,डफळवाडी,वाझोली,सुपुगडेवाडी,कुठरे,पवारवाडी,मोरेवाडी,निगडे,घोटील,पाचुपतेवाडी,गुढे,तळमावले,साईकडे,करपेवाडी,शिद्रुकवाडी,खळे,काढणे,बागलवाडी,तुपेवाडी,मानेगाव,मान्याचीवाडी,कुंभारगाव,चाळकेवाडी,गलमेवाडी,कुंभारगाव,काळगाव,वेताळ,कुमाळ,लोटलेवाडी,मस्करवाडी,काळगाव, करपेवाडी, धनगरवाडा, भरेवाडी, रामिष्टेवाडी,
येळेवाडी,घोटील,निगडे,कसणी,निवी, उमरकांचन, सावंतवाडी, धनावडेवाडीमराठवाडी,भोसगाव,ढेबेवाडी,साबळेवाडी,मालदन,सुतारवाडी,जिंती,मोडकवाडी,माईगडेवाडी,सातर,अनुतेवाडी,कोळेकरवाडी,मेंढ,जाधववाडी,मत्रेवाडी,आंब्रुळकरवाडी,मान्याचीवाडी,महिंद,सणबूर,जानुगडेवाडी,शितपवाडी,नाडे,पांढरवाडी
तेलेवाडी,क्रांतीनगर माथणेवाडी,आडूळ पेठ,आडूळ गावठाण,कवरवाडी,मुळगाव, आंब्रुळे,
नेरळे, चेवलेवाडी,चोपडी,बेलवडे,त्रिपुडी,नाडोली,डिगेवाडी,साजूर,उत्तरतांबवे,गमेवाडी,आबईचीवाडी,सोनाईचीवाडी,ठोमसे,येराडवाडी,नारळवाडी,जमदाडवाडी,मल्हारपेठ1,मल्हारपेठ2,नवसरवाडी,गणेवाडी,तांबेवाडी,आबदारवाडी,गिरेवाडी,बोडकेवाडी,ऊरुल,मंद्रुळहवेली,वेताळवाडी,खिलारवाडी,शेडगेवाडी,नावडी,भारसाखळे,वनकुसवडे,घाणबी,वाटोळे,दिवशीखुर्द,मराठवाडी,जुंगठी,खिवशी,म्हारवंड,निवकणे,मणदुरे,कोकीसरे,मोरगिरी,पेठशिवापूर,नाटोशी,सातेवाडी,झाकडे,दिक्षी,धावडे,गुरेघर,काहिर,आटोली,कळकेवाडी,किल्लेमोरगिरी,आटोली,आंब्रग,पाचगणी,गोकूळतर्फपाटण, पांढरेपाणी,बाहे,शिद्रुकवाडीधावडे,वाडीकोतावडे,कदमवाडीनाटोशी,कुसरुंड,आंबेघरतर्फमरळी, गोकूळनाला,कोयनानगर,देशमुखवाडी,ऐनाचीवाडी,हुंबरळी,तोरणे,कामरगाव,मानाईनगर,नवजा,रासाटी,आंबेघर
किसरुळे, किसरुळे, किसरुळे भराडेवस्ती, बोपोली, गोवारे, देवघर, येराड, तामकडे,
टोळेवाडी, आंबवणे, कातवडी, कवडेवाडी,तामकणे,घाणव,चिटेघर,येरफळे,कोतावडेवाडी
साखरी,केरळ,धडामवाडी केरळ, काळोली, पिंपळोशी, बोंद्री, जाईचीवाडी, बिबी,सलतेवाडी
ताटेवाडी,लुगडेवाडी,मारुल तर्फ पाटण, शिरळ, हुंबरवाडी, सोनवडे, शिंदेवाडी,
सुळेवाडी,डावरी,धजगाव,भिलारवाडी,मारुलहवेली,दिवशीबु,पापर्डे,गारवडे,बहुले,हावळेवाडी,जरेवाडी,पाळेकरवाडी,कोरिवळे,टेळेवाडी,मरळी,गव्हाणवाडी,चोपदारवाडी,सांगवड,सुर्यवंशीवाडी
चौगुलेवाडी,विहे नविन वसाहत,विहे जुने गाव या गावांमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेना
पक्षाच्या शाखांचा स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या शुभहस्ते शुभारंभ
करण्यात आला. तसेच युवा सेना व महिला आघाडी यांच्या 59 शाखांचा ही सोबत शुभारंभ
केला.
चौकट:-ना.एकनाथजी शिंदे
यांचा वाढदिवस ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रमांना
साजरा.
महाराष्ट्र
राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे गुरुवार दि. 09 रोजीचा वाढदिवस हा
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघात विविध
सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे
वाढदिवसाचे औचित्य साधून पाटण मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व
ग्रामीण रुग्णालय पाटण व ढेबेवाडी येथे
सर्व रोग निदान व रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच बाळासाहेबांची
शिवसेना पक्ष संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेकडून शालेय विद्यार्थी यांना
शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
चौकट: मुख्यमंत्र्याकडून ना.शंभूराज देसाई
यांनी वाढदिवसानिमित्त राबविलेल्या विविध उपक्रमाचे केले कौतुक.
मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणेकरीता ठाणे ,सातारा जिल्हयाचे पालकमंत्री राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पक्ष संघटना वाढीसाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या एका दिवसामध्ये तब्बल 276 शाखांचे गावो-गावी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आले. यशस्वी शुभारंभ केल्याबद्दल मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे उपक्रमाचे कौतुक करुन पाटण विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment