Monday 13 February 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून रस्ते व पूल परिरक्षण व दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत होणार दुरुस्ती. नाडे ढेबेवाडी रस्त्यावरील सांगवड गावाजवळील कोयना नदीवरील पुलाचे दुरुस्तीसाठी 02 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

 


 

   दौलतनगर दि.13 :- पाटण तालुक्यातील नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा 58 वर किमी 1/120 मध्ये सांगवड गावाजवळ कोयना नदीवर असलेल्या पुलाच्या दुरुस्तीकरीता निधी मंजूर होण्याकरीताचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या.त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नाडे ढेबेवाडी या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यावरील सांगवड येथील पुलाचे दुरुस्तीकरीता निधी मंजूरीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आला होता.त्यानुसार सांगवड येथील पुलाचे दुरुस्तीकरीता सन 2022-23 चे रस्ते व पूल परिरक्षण व दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत 02 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून या मंजूर निधीतून सांगवड येथील पुलाचे मजबूतीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्‍दीपत्रकांत देण्यात आली आहे.

           प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रयत्नातून पाटण तालुक्यातील दळण-वळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नाडे ढेबेवाडी या रस्त्यावरील सांगवड गावाजवळ कोयना नदीवर मोठया पूलाची उभारणीचे कामाला दि.10 एप्रिल 1958 ला सुरुवात होऊन दि. 31 मार्च 1963 ला या पुलाचे काम झाले. तेव्हापासून या पुलावरुन वाहतूक सुरळीत सुरु आहे. दरम्यानच्या कामालवधीमध्ये कोयना परिसरासह पाटण तालुक्यात प्रती वर्षी होणा-या अतिवृष्टीने कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे  सांगवड येथील या पुलाची दुरुस्ती होणे गरजेचे होते. प्रती वर्षी किरकोळ दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत होती. परंतु या पुलाचा कालावधीचा विचार करता याचे मजबुतीकरणासाठी भरीव निधीची तरतुद होण्याकरीता पालकमंत्री ना.शंभूराज देसाई  यांनी दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीने शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नाडे ढेबेवाडी या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यावरील सांगवड येथील पुलाचे दुरुस्तीकरीता निधी मंजूरीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आला. तद्नंतर पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सांगवड येथील पुलाचे दुरुस्तीकरीता सन 2022-23 चे रस्ते व पूल परिरक्षण व दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत 02 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव(रस्ते) यांनी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे यांना लेखी पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.सन 2022-23 मध्ये रस्ते देखभाल दुरुस्ती अंतर्गत योजनेतर तरतूदीमधून रस्ते दुरुस्ती करणेचा कार्यक्रम संदर्भानुसार हा मंजूर निधी प्राप्त झाला असून या निधीतून सांगवड येथील कोयना नदीवरील मोठया  पुलाचे मजबुतीकरणासह दुरुस्तीचे काम पुर्णत्वाकडे जाणार आहे.दरम्यान नाडे ढेबेवाडी या प्रमुख जिल्हा मार्गावरील सांगवड येथील पुलाचे मंजूर असलेले हे काम तातडीने पुर्ण होण्याकरीता लवकरात लवकर या कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण करण्यात येऊन हे सांगवड पुलोच दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे निर्देश पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment