Monday 13 February 2023

पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून रविवार दि. 19 रोजी दौलतनगर,ता.पाटण येथे शिव दौलत नोकरी महामेळाव्याचे आयोजन. पुणे,सातारा व कोल्हापूर येथील विविध 50 कंपन्यांचा असणार सहभाग.

 

दौलतनगर दि.13:- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती सोहळा व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार युवक व युवतींना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने रविवार दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 09 ते सायं.05 यावेळेत दौलतनगर(मरळी),ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई  शताब्दी स्मारक येथे शिव दौलत नोकरी महामेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण या डोंगरी व दुर्गम तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याकरीता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती सोहळा व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून रविवार दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 09 ते सायं.05 यावेळेत दौलतनगर(मरळी),ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे शिव दौलत नोकरी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.सदर नोकरी महामेळाव्यामध्ये पुणे,सातारा व कोल्हापूर येथील विविध नामवंत कंपन्यांचा सहभागी होणार असून या नोकरी महामेळाव्यामध्ये इयत्ता 05 वी ते पदवीधर उत्तीर्ण असलेल्या युवक युवतींना नोकरी मिळण्याच्यादृष्टीने मोफत सहकार्य करण्यात येणार आहे.दरम्यान या नोकरी महामेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक युवक व युवतींनी दौलत नोकरी महामेळाव्याचे वेबाईवरील फॉर्म आवश्यक त्या माहितीसह भरुन ऑनलाईन नोंदणी करावी.तसेच रविवार दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 09 ते सायं.05 यावेळेत दौलतनगर(मरळी), ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे उपस्थित राहिलेल्या युवक युवतींच्या दोन सत्रामध्ये मुलाखती घेण्यात येणार असून मुलाखत व निवड झालेल्या युवक युवतींचे निवडपत्रांचे वाटपही  यावेळी करण्यात येणार आहे. दौलतनगर ता.पाटण येथील रविवारी होणाऱ्या नोकरी महामेळाव्यामध्ये मॅन्यूफॅक्चरिंग टेलिकॉम,बँकींग फायनान्स,बीपीओ/केपीओ रिटेल,ट्रेनिंग हॉटेल्स व सिक्यूरिटी हॉस्पीटॅलिटी या सेक्टरच्या माध्यमातून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार युवक युवतींना नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याने या रोजगार महामेळाव्यामध्ये पाटण विधासभा मतदारसंघातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी सहभागी व्हावे,असे आवाहनही शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

No comments:

Post a Comment