Thursday 16 February 2023

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना आसवनी/इथेनॉल/को-जनरेशन प्रकल्प उभारणार. विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांचा निर्णय. राज्य शासन सर्वोत्परी सहकार्य करणार-पालकमंत्री ना.शंभूराज देसाई.

 

दौलतनगर दि.16:- पाटणची अर्थवाहिणी असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने बीओओटी / बीओटी तत्त्वावर आसवनी/ इथेनॅाल / को-जनरेशन प्रकल्प उभारण्यासाठी विशेष सर्व साधारण सभेचे आयोजन केले होते.यावेळी उपस्थित सभासदांनी इथेनॉल प्रकल्प बीओओटी / बीओटी तत्वावर उभारण्यासाठी एकमताने मंजूरी देत प्रकल्प्‍ उभारण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे संचालक मंडळाला देण्यात आले. या सभेकरीता कारखान्याचे मार्गदर्शक संचालक ना.शंभूराज देसाई हेऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी/ इथेनॅाल / को-जनरेशन प्रकल्पासाठी राज्य शासन सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी कटीबद्द असल्याची ग्वाही राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी ऑनलाईन बोलताना दिली.

             लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर येथे आयोजित केली होती यावेळी चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांचेसह व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,मा.चेअरमन अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण,संचालक शशिकांत निकम,बबनराव शिंदे,प्रशांत पाटील,भागोजी शेळके,बळीराम साळुंखे, सर्जेराव जाधव,शंकरराव पाटील,सोमनाथ खामकर,विजय सरगडे,संचालिका श्रीमती जयश्री कवर, सौ.दिपाली पाटील,जालंदर पाटील,विजयराव मोरे,संतोष गिरी,बबनराव भिसे,प्रकाशराव जाधव, विजयराव जंबुरे,कार्यकारी संचालक एस.एल.देसाई,फायनान्स मॅनेंजर व्ही.ए.देसाई यांचेसह सर्व संचालक मंडळ, शिवदौलत बॅंकेचे चेअरमन संजय देशुमख, ऊस उत्पादक सभासद पदाधिकारी कार्यकर्ते,कारखाना अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

                याप्रसंगी बोलताना ना.देसाई म्हणाले की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्योच माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी उभारलेला हा कारखाना स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांनी काटकसरीचे धोरण अवलंबून चालवला,कमी कालावधीमध्ये आपला कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा केला. सध्या महाराष्ट्रीचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व मंत्रीमंडळ हे सहकारी साखर कारखान्यांचा विस्तारवाढ करण्यासाठी  सकारात्क असून,आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यालाही राज्य  शासनाकडून  विस्तारवाढीकरीताआर्थिक मदताचा शासन निर्णय  झाला असून कारखान्याचा निधी वर्ग होण्याचा प्रस्ताव दाखल ही केला असून, याच वर्षात या निधीची तरतूद करुन आपल्या कारखान्यास निधी वितरित करण्याबाबत शासन स्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत. पाटण सारख्या डोंगरी व दुर्गम अशा तालुक्यामध्ये पहिल्यापासून आपण अडचणीच्या काळामध्ये कारखाना चालवला. सध्या महाराष्ट्रामध्ये 1250 मे.टन क्षमता असलेल्या सहकारी साखर कारखान्यांमध्ये आपला एकमेव सहकारी साखर कारखाना चांगल्या पध्दतीने सुरु असून 1250 मे.टन क्षमतेचे अनेक कारखाने बंद पडले,अवसानात,लिलावात निघाले.सध्या सहकार क्षेत्रामध्ये अनेक नविन बाबी समोर येत आहेत. पाच हजार मे.टन क्षमतावाढीबरोबर डिस्टीलरी/इथेनॉल उत्पादन अशा उपपदार्थांचे उत्पादन करण्याचे धोरण राज्य शासनाकडून राबविण्यासाठी सहकार्य करण्यात येत आहे.  

       दरम्यान चेअरमन यशराज देसाई म्हणाले 2500 मे.टन.क्षमतावाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन सध्या कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. शासनाच्या भाग भांडवलातून कर्ज उभारणी करत हे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आपल्या कारखान्याची सरासरी गाळप क्षमता वाढ झाली आहे.कारखान्याचे गाळप क्षमता वाढीबरोबर इथेनॉलचे उत्पादन करणे गरजेचे असून आसवनी/ इथेनॅाल / को-जनरेशन प्रकल्प उभारणीसाठी जादा खर्च अपेक्षित असल्याने बीओओटी / बीओटी तत्त्वावर प्रकल्प उभारण्यासाठी आजची ही विशेष सर्व साधारण सभा घेण्यात आली. सध्या केंद्र शासनाने इथेनॉल उत्पादन करण्याचे धोरण राबविले असून इथेनॉल प्रकल्प फायद्यात आहे. हा प्रकल्प उभारणीसाठी सर्व सभासदांच्या सहकार्यातून सभासदांच्या हिताचाच निर्णय संचालक मंडळाकडून घेण्यात येईल असे शेवटी त्यांनी सांगीतले.

 चालू वर्षी राज्यामध्ये ऊसाचे 25 ते 30 टक्के उत्पादन कमी झाले आहे. आपले कारखान्याचे विस्तारीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून लवकरच विस्तारीकरणाचे दुसऱ्या टप्प्याचे काम चालू करत आहोत.कारखान्याचे विस्तारीकरणासाठी कर्ज घेतले असून उपपदार्थ प्रकल्पासाठी सुमारे 125 कोटी खर्च अपेक्षित असून दोन्ही कर्ज मिळून अंदाजे 175कोटी कर्ज कारखान्यास  आर्थिकदृष्टया जास्त होणार असून तो न परवडणारा आहे. 60 केएलपीडी डिस्टीलरी 213 दिवस चालली तर साखरेपेक्षा 18 ते 19 कोटी रुपये जादा उत्पन्न मिळणार आहे. आपले कारखान्याचे सारख हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असूनही आपण इतर कारखान्यांच्या बरोबर ऊस दर देत असल्याने सर्व सभासदांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस आपले कारखान्यास गळीतास द्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले. स्वागत व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी केले तर आभार संचालक बबनराव शिंदे यांनी मानले.

No comments:

Post a Comment