Thursday 29 August 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून 2515 योजनेतून 06 कोटी रुपयांचा निधी मंजूर. पाटण मतदारसंघातील रस्ते,संरक्षक भिंत व सभामंडप इ. विविध विकास कामे लागणार मार्गी.

 

दौलतनगर दि.29:- पाटण विधानसभा मतदार संघातील विविध गावांमधील मुलभूत नागरी सुविधांच्या आवश्यक असणाऱ्या विकास कामांना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून तातडीने निधी मंजूर होणेकरीता महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पाद शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी ग्राम विकास विभागाचे मंत्री ना.गिरीश महाजन यांचेकडे विविध विकास कामांची शिफारस करुन सातत्याने पाठपुरावा केला होता.पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या शिफारशीनुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांना सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये रुपये 06 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पारीत केला असल्याची माहिती ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

              प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,संरक्षक भिंत तसेच सभामंडप इ. विकास कामांना निधीची आवश्यकता असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी या विविध गावांमधील मुलभूत नागरी सुविधांच्या विकास कामांना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून तातडीने निधी मंजूर होणेकरीता ग्राम विकास विभागाचे मंत्री ना.गिरीश महाजन यांचेकडे विविध विकास कामांची शिफारस केली होती. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील विकास कामांना सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये रुपये 06 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये तळोशी रस्ता सुधारणा 15 लाख,तोरणे बौध्दवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख, दवंडेवस्ती बोपोली सभामंडप 13 लाख, मणेरी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, घेरादातेगड स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख, रामेल अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, खडकवाडी वजरोशी ते जानाई मंदिर रस्ता सुधारणा 15 लाख, जंगलवाडी तारळे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, पवारवाडी कुठरे अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, चिंचेवाडी वजरोशी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, डिगेवाडी मुरुड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, धुमकवाडी मुरुड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, खोणोली अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, जंगलवाडी जाधववाडी चाफळ जूनी मराठी शाळा ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा 10 लाख, पाठवडे अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, केरळ लेाहारवस्ती संरक्षक भिंत 10 लाख, तामकडे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख, म्हावशी मोळावडेवस्ती ते थोरलावडा रस्ता सुधारणा 15 लाख, गणेवाडी ठोमसे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, त्रिपुडी ग्रामपंचायत कार्यालय इमारत 15 लाख, किल्ले मोरगिरी स्मशानभूमी रस्ता सुधारणा 10 लाख, कुसरुंड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, गुरेघर अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, चोपदारवाडी बहुउद्देशीय सभागृह 15 लाख, खांडेकरवाडी सोनवडे येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख, चोपडेवाडी डावरी येथे सभामंडप 13 लाख, पापर्डे खुर्द मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता सुधारणा 15 लाख, पाळेकरवाडी बहुले अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, भिलारवाडी समाज मंदिर सुधारणा 15 लाख, मारुलहवेली अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, नवीवाडी जिंती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, मोडकवाडी जिंती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, सातर म्हाळुंगेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, करपेवाडी काळगाव अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, मस्करवाडी काळगाव अंतर्गत रस्ता सुधारणा 14 लाख, मोरेवाडी कुठरे कदमवाडी  येथे अंतर्गत रस्ता व संरक्षक भिंत 15 लाख, सुपुगडेवाडी जाधववस्ती व शिंदेवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, तळमावले येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, मौजे साकुर्डी येथे सभामंडप 15 लाख, शिबेवाडी खालची गुढे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, आरेवाडी उत्तर तांबवे ता.कराड येथे संरक्षक भिंत 15 लाख, पाडळी केसे पाडळेश्वर मंदिरालगत संरक्षक भिंत 15 लाख या 42 कामांना 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून पाटण विधानसभा मतदारसंघातील रस्ते,संरक्षक भिंत तसेच सभामंडप इत्यादी  विकास कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांचे आभार मानले. तर लवकरच या विकास कामांची निविदा प्रक्रिया करण्याची तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत  देण्यात आली आहे.

Saturday 24 August 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून धनगरवाडा मरड लघुपाटबंधारे तलावाचे कामाला 12 कोटी 36 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

 

      

 

दौलतनगर दि.24:- पाटण विधानसभा मतदार संघातील डोंगर पठारावरील धनगरवाडा मरड येथील ग्रामस्थांच्या शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी  मार्गी लावण्यासाठी  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी धनगरवाडा मरड येथे लघु पाटबंधारे तलावाचे काम मंजूर होण्यासाठी जलसंधारण मंत्री ना.संजय राठोड यांचेकडे शिफारस केली होती. त्यानुसार धरनगरवाडा मरड येथे लघु पाटबंधारे तलावाच्या कामाला 12 कोटी 35 लाख 81 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने नुकताच पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील धनगरवाडा मरड हे गाव डोंगर पठारावर वसलेले गाव असून विशेषत: उन्हाळयामध्ये या गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासह शेती व जनावरांच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होत होता.त्यामुळे मरड परिसरातील सर्व गावे व वाडया-वस्त्यांमधील ग्रामस्थांनी या परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागण्यासाठी  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांची भेट घेऊन धनगरवाडा मरड येथे लघु पाटबंधारे तलावाचे काम मंजूर होण्यासाठी मागणी केली होती.त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी लघुसिंचन व जलसंधारण विभागाचे अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणची पाहणी करुन आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या.त्यानुसार अप्पर आयुक्त जलसंधारण तथा मुख्य अभियंता,मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्र,पुणे यांचेकडून 101 ते 250 हेक्टर सिंचन क्षमतेच्या सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील धनगरवाडा मरड लघु पाटबंधारे तलाव योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबचा प्रस्ताव महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडे सादर केल्या नंतर 101 ते 250 हेक्टर सिंचन क्षमतेच्या पाटण तालुक्यातील धनगरवाडा मरड लघु पाटबंधारे तलावाला मृद व जलसंधारण विभागाच्या सन 2022-23 च्या दरसूचीवर आधारित कामाप्रित्यर्थ  12 कोटी 35 लाख 81 हजार रुपयांचा निधीला महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांचेकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आला असल्याचा शासन निर्णय महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने नुकताच पारित केला आहे. धनगरवाडा मरड येथील नियोजित लघु पाटबंधारे तलावाची 524.18 स.घ.मी.एवढी पाणी साठवण क्षमता असून या तलावातील जलसाठयातून आसपासचे 107 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजित असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून धनगरवाडा मरड या परिसरातील जनावरांच्या पाण्यासह शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असून शेतकऱ्यांना शेतीमध्ये पीकांचे उत्पन्‍न वाढीसाठी याचा चांगला फायदा होऊन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार असल्याने धनगरवाडा,मरड परिसरातील ग्रामस्थांनी पालकमंत्री  ना.शंभूराज देसाई यांचे आभार मानले आहेत.तर मंजूर झालेल्या धनगरवाडा मरड लघु पाटबंधारे तलावाच्या निविदा प्रक्रियेचे काम तातडीने करण्यात येऊन हे काम पाऊस कमी आल्यानंतर लगेच हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकारी यांना केल्या असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत शेवटी देण्यात आली आहे.

चौकट: धनगरवाडा मरड येथील लपा तलावामुळे पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नामुळे धनगरवाडा मरड येथील लघु पाटबंधारे तलावाचे कामाला भरघोस निधी मंजूर झाला असल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे.डोंगर पठारावरील या भागामध्ये विशेषत: उन्हाळयामध्ये पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण होते. अनेक गावांमध्ये पाण्याची  टंचाई निर्माण होऊन पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न प्रत्येक वर्षी निर्माण होतो.धनगरवाडा मरड येथील नियोजन तलावाच्या कामामुळे या परिसरातील शेती  पाण्याखाली येणार तर आहेत पण पिण्यासह येथील जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न मिटणार असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी लपा तलावाच्या कामाला भरघोस निधी मंजूर केल्याने येथील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे.

 

Friday 16 August 2024

राज्य उत्पादन शुल्क विभागातील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुरस्कार जाहीर 2023- 24 चे उत्कृष्ट अधिकारी - कर्मचारी पुरस्कारांची घोषणा

 


मुंबई, दि. 14: राज्य उत्पादन शुल्क विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्याची योजना उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेतील सन 2023- 24 मधील अधिकारी आणि कर्मचारी यांना उत्कृष्ट तथा गुणवत्ता पूर्ण कार्याबद्दल विविध पदके, सन्मानचिन्हे जाहीर करण्यात आली आहे. 


उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी या योजनेसाठी पुढाकार घेतला होता. यावर्षीचे पुरस्कारांमध्ये राज्य स्तरावरून तीन पुरस्कार जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये गुणवत्तापूर्ण सेवा पदककरिता छत्रपती संभाजी नगरचे अधीक्षक संतोष झगडे यांची निवड करण्यात आली असून विशेष मोहीम पदक पुणे येथील अधीक्षक चरणसिंह राजपूत यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट तपास पदकाकरिता ठाणे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीकरीता त्यांना देण्यात येणार आहे. 

  

    राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त स्तरावरून देण्यात येणाऱ्या विविध पदक, सन्मानचिन्हकरिता एकूण पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.  यामध्ये विशेष सेवा पदकाकरिता ठाणे जिल्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांची निवड करण्यात आली आहे.आयुक्त सन्मानचिन्हकरीता मुंबई शहर भरारी पथकाचे निरीक्षक प्रकाश काळे, महाराष्ट्र राज्य भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक अशोक तारू आणि जवान  संवर्गात मुंबई येथील जवान संतोष शिवापुरकर, धुळे येथील जवान गोरख पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 

      ही पदके व सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांचे मंत्री शंभूराज देसाई, अपर मुख्य सचिव  मिलिंद म्हैसकर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे. 


   महाराष्ट्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना पुढील काळात असेच उत्कृष्ट काम करून अधिकाधिक पदके मिळविण्यासाठी शुभेच्छाही त्यांनी  दिल्या आहेत.

पाटण च्या सकल धनगर समाजासाठी १० कोटी मिळणार..! पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नाला यश


नवारस्ता/प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संकुलासाठी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे  यांच्या प्रयत्नातून विशेष बाब म्हणून १० कोटी रुपये लवकरच मंजूर होणार असल्याची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.


मंत्री देसाई म्हणाले,पाटण तालुका हा डोंगराळ व दुर्गम दऱ्याखोऱ्यात वसला असून यामध्ये प्रामुख्याने धनगर समाज डोंगर कपारीत राहुन दुधाच्या व्यवसायावर आपली उपजिवीका करत आलेला आहे. त्यामुळे हा समाज शैक्षणिक आणि सामाजिक सोई-सुविधांपासून अद्यापही वंचित आहे. या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे करीता समाजातील सुशिक्षित तरुण वर्ग संघटित होऊन सामाजिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी समाजातील तरुणवर्गाने पाटण, जि. सातारा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संकुल उभारण्याची मागणी आपणाकडे वारंवार केली होती.

त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे  यांच्याकडे आपण पाटण तालुक्यातील सकल धनगर समाजासाठी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संकुल उभारण्यासाठी  १० कोटी निधी MSRDC किंवा सिडको कडून  उपलब्ध करुन देणेविषयी  विनंती केली होती.त्यानुसार मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून आपल्या विनंतीची तातडीने दखल घेतली असल्याने पाटण तालुक्यातील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय संकुलनासाठी आता लवकरच १० कोटींचा निधी मिळणार आहे.

Wednesday 14 August 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून बनपेठवाडी येराड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजूरी.

 


    

दौलतनगर दि. 14 :- बनपेठवाडी  येराडसह आस-पासच्या गावातील आरोग्याची समस्या लक्षात घेता बनपेठवाडी येराड ग्रामपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर होण्याकरीता पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे मागणी करत गेले अनेक वर्ष सातत्याने पाठपुरावा सुरु होता. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी बनपेठवाडी येराड  येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीकरीता विशेष बाब म्हणून केलेल्या प्रयत्नामुळे  श्री क्षेत्र येडोबा देवाची नगरी बनपेठवाडी येराड येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजूरी देण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकताच पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

            प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, बनपेठवाडी येराड परिसरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने येथील रुग्णांना औषधोपचाराठी पाटण आणि हेळवाक  याठिकाणी जावे लागत असल्याने ग्रामस्थांची आरोग्यविषयक मोठी गैरसोय होत असल्याने या डोंगरी व दुर्गम विभागातील बनपेठवाडी येराड परिसरातील सर्व गावांतील ग्रामस्थांची प्राधान्याची मागणी विचारात घेऊन बनपेठवाडी येराड या ग्रामपंचायतीने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केला होता. यासंदर्भात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी उच्चस्तरीय अधिकारी यांच्या बैठका घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना या बैठकींमध्ये संबंधित अधिकारी यांना केल्या होत्या. त्यानुसार हे बनपेठवाडी येराड या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यासाठी परिपुर्ण प्रस्ताव सादर झाला होता. बनपेठवाडी  येराडसह जोतिबाचीवाडी,तामकडे, काळोली, दातेगड, टोळेवाडी, मुळगांव, डोंगरुबाचीवाडी, पिंपळगांव,पाटण, नेरळे, मारुल त.पाटण,वाजेगांव, मिरासवाडी, शिरळ, विठ्ठलवाडी,कराटे, मणेरी, चाफेर, काढोली, तळीये, रिसवड, ढोकावळे, झाकडे लेंढोरी या आस-पासच्या गावासह श्री क्षेत्र येडोबा देवाच्या दर्शनाला येणा-या  भाविक भक्तांची मोठी वर्दळ असते.या भाविकांनाचीही आरोग्य सुविधांची समस्या  सुटणार होती. तसेच बनपेठवाडी येराड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सादर प्रस्ताव मंजूरीबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी विशेष बाब म्हणून मंजूरी मिळणेबाबत केलेल्या विनंतीमुळे श्री क्षेत्र येडोबा देवाची नगरी बनपेठवाडी येराड येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजूरी देण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकताच पारित केला.  पाटण मतदारसंघ हा डोंगरी व दुर्गम असुन मतदारसंघातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा देणेकरीता ना.शंभूराज देसाईंची सातत्याची तळमळ असते. येराडसह परिसरातील गावांना पाटण व हेळवाक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत असल्याने ही आरोग्य सुविधा बनपेठवाडी येराड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र करुन कोयना विभागातील जनतेला मिळवून दयावी याकरीता ना.शंभूराज देसाईंची सातत्याची तळमळ होती. त्यांच्या प्रयत्नातून बनपेठवाडी येराड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करत डोंगरी व दुर्गम कोयना भागातील जनतेसह श्री क्षेत्र येडोबा देवाला येणा-या भाविकांनाही चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यास मोठी मदत होणार आहे. ना.शंभूराज देसाईंनी बनपेठवाडी येराड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूरीकरीता विशेष बाब म्हणून केलेल्या प्रयत्नामुळे मंजूर झाल्याने या विभागातील जनतेने धन्यवाद व्यक्त केले आहेत.

Thursday 1 August 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून सातारा जिल्ह्यासह पाटण तालुक्यातील प्राथमिक शाळा होणार मॉडेल स्कूल मॉडेल स्कूल अंतर्गत विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येणार.


 

दौलतनगर दि.02:- सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून सातारा जिल्हयामध्ये मॉडेल स्कूल ही संकल्पना राबविण्यात येत असून मॉडेल स्कूलसाठी पाटण तालुक्यातील 43 जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली असून सन 2024-25 मध्ये पहिल्या टप्प्यात पाटण तालुक्यातील 29 प्राथमिक शाळांची निवड केली आहे.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 25 जिल्हा परिषद शाळांना नवीन 68 शाळा खोल्यांचे बांधकाम करण्यासाठी सन 2024-25चे जिल्हा वार्षिक आराखडयातून 10 कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून मॉडेल स्कूल या योजने अंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

        प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून सध्या सातारा जिल्हयामध्ये मॉडेल स्कूल ही संकल्पना जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी  राबविली जात असून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी तसेच जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्याला प्राथमिकता देण्यात आली आहे.तसेच मॉडेल स्कूल या योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्ग खोली,मुला मुंलींसाठी शालेय स्वच्छता गृह,पाण्याची व्यवस्था त्यामध्ये शुध्द पिण्याचे पाणी व हँड वॉश स्टेशनची सुविधा,संरक्षक भिंत,पर्यावरण पुरक जलपुनर्भरण,सौर प्रकल्प,कचरा व्यवस्थापन,वृक्ष लागवड व परसबाग,पेव्हर ब्लॉक,संगणक प्रयोग शाळा,स्वागत कमान,विज्ञान प्रयोग शाळा,खेळाचे मैदान व मुलांच्या वयोगटानुसार खेळाचे साहित्य व बाला एलिमेंट्स आणि बोलका शालेय परिसर आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. सर्व सोयीसुविद्यांनीयुक्त असणा-या मॅाडेल स्कूलमुळे मुलांबरोबरच त्यांच्या पालकांनाही आपला पाल्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेत शिकत असल्याचे समाधान मिळणार आहे. भविष्यात या शाळा गावांचा मानबिंदू ठरणार आहेत.  पाटण विधानसभा मतदारसंघातील पहिल्या टप्प्यात 25 जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन 68 शाळा खोल्यांचे बांधकाम करण्यासाठी  सन 2024-25चे जिल्हा वार्षिक आराखडयातून 10 कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.यामध्ये ढेबेवाडी 2 शाळा खोल्या 30.50 लाख, चोपडी येथे 3 शाळा खोल्या 45.75 लाख, माजगाव 3 शाळा खोल्या 45.75 लाख, मानेवाडी मानेगाव 3 शाळा खोल्या 45.75 लाख, साखरी 3 शाळा खोल्या 45.75 लाख, नाटोशी 4 शाळा खोल्या 61 लाख, कोकीसरे 2 शाळा खोल्या 30.50 लाख, हेळवाक 4 शाळा खोल्या 61 लाख, गुढे 2 शाळा खोल्या 30.50 लाख, मेष्टेवाडी 4 शाळा खोल्या 61 लाख, धामणी 1 शाळा खोल्या 15.25 लाख, कसणी 2 शाळा खोल्या 30.50 लाख, सळवे  4 शाळा खोल्या 61 लाख, मोरगिरी 1 शाळा खोल्या 15.25 लाख, मालदन 2 शाळा खोल्या 30.50 लाख, ठोमसे 2 शाळा खोल्या 30.50 लाख, चव्हाणवाडी ना येथे 1 शाळा 15.25 लाख, रासाटी 4 शाळा खोल्या 61 लाख, आंबवणे 4 शाळा खोल्या 61 लाख, मुरुड 2 शाळा खोल्या 30.50 लाख, कळंबे 4 शाळा खोल्या 61 लाख, भारसाखळे 2 शाळा खोल्या 30.50 लाख, जिंती 4 शाळा खोल्या 61 लाख, येराड 2 शाळा खोल्या 30.50 लाख व वस्ती साकुर्डी 3 शाळा खोल्या 45.75 लाख या 68 शाळा खोल्यांच्या कामांचा समावेश आहे.

चौकट :- पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे दुरुस्तीसाठी 01 कोटी निधी मंजूर.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील 7 जिल्हा परिषद शाळांमधील शाळा खोल्यांचे दुरुस्तीसाठी 01 कोटी 07 लाख 63 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये माजगाव 5 शाळा खोल्या दुरुस्ती 17.18 लाख, आवर्डे 6 शाळा खोल्या  दुरुस्ती 26.22 लाख, मानेवाडी 3 शाळा खोल्या  दुरुस्ती 10.86 लाख, साखरी 3 शाळा खोल्या  दुरुस्ती 8.24 लाख, मरळी 4 शाळा खोल्या  दुरुस्ती 11.65 लाख, हेळवाक 2 शाळा खोल्या  दुरुस्ती 8.13 लाख, केरळ 6 शाळा खोल्या  दुरुस्ती 25.35 लाख या जिल्हा परिषद शाळांमधील 29 शाळा खोल्यांच्या दुरुस्तींच्या कामांचा समावेश आहे.