दौलतनगर दि.29:- पाटण विधानसभा मतदार संघातील विविध
गावांमधील मुलभूत नागरी सुविधांच्या आवश्यक असणाऱ्या विकास कामांना महाराष्ट्र
शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून तातडीने निधी मंजूर होणेकरीता महाराष्ट्र
राज्याचे राज्य उत्पादन
शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी ग्राम विकास विभागाचे मंत्री ना.गिरीश
महाजन यांचेकडे विविध विकास कामांची शिफारस करुन सातत्याने पाठपुरावा केला होता.पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या
शिफारशीनुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांना सन 2024-25
या आर्थिक
वर्षामध्ये रुपये 06 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचा शासन निर्णय राज्य
शासनाच्या ग्रामविकास विभागाने पारीत केला असल्याची माहिती ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने
प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले
आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत
रस्ते,संरक्षक भिंत तसेच सभामंडप इ. विकास कामांना निधीची आवश्यकता असल्याने
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी या विविध गावांमधील मुलभूत नागरी सुविधांच्या
विकास कामांना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून तातडीने निधी मंजूर
होणेकरीता ग्राम विकास विभागाचे मंत्री ना.गिरीश महाजन यांचेकडे विविध विकास
कामांची शिफारस केली होती. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील
विविध गावांतील विकास कामांना सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये रुपये 06
कोटी रुपयांचा
निधी मंजूर झाला असून यामध्ये तळोशी
रस्ता सुधारणा 15 लाख,तोरणे बौध्दवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख, दवंडेवस्ती बोपोली सभामंडप 13 लाख, मणेरी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, घेरादातेगड स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख, रामेल अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, खडकवाडी वजरोशी ते जानाई मंदिर रस्ता सुधारणा 15 लाख,
जंगलवाडी तारळे अंतर्गत रस्ता सुधारणा 15
लाख, पवारवाडी कुठरे अंतर्गत रस्ता सुधारणा 10
लाख, चिंचेवाडी वजरोशी अंतर्गत रस्ता सुधारणा
15 लाख, डिगेवाडी मुरुड अंतर्गत
रस्ता सुधारणा 15 लाख, धुमकवाडी मुरुड अंतर्गत
रस्ता सुधारणा 15 लाख, खोणोली अंतर्गत रस्ता
सुधारणा 15 लाख, जंगलवाडी जाधववाडी
चाफळ जूनी मराठी शाळा ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा 10 लाख, पाठवडे अंतर्गत रस्ता सुधारणा
10 लाख, केरळ लेाहारवस्ती
संरक्षक भिंत 10 लाख, तामकडे स्मशानभूमी
रस्ता सुधारणा 15 लाख, म्हावशी मोळावडेवस्ती
ते थोरलावडा रस्ता सुधारणा 15 लाख, गणेवाडी ठोमसे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, त्रिपुडी ग्रामपंचायत कार्यालय इमारत 15 लाख, किल्ले मोरगिरी स्मशानभूमी रस्ता सुधारणा 10 लाख, कुसरुंड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, गुरेघर अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, चोपदारवाडी बहुउद्देशीय सभागृह 15 लाख, खांडेकरवाडी सोनवडे येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख,
चोपडेवाडी डावरी येथे सभामंडप 13 लाख,
पापर्डे खुर्द मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता
सुधारणा 15 लाख, पाळेकरवाडी बहुले
अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, भिलारवाडी
समाज मंदिर सुधारणा 15 लाख, मारुलहवेली
अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, नवीवाडी
जिंती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, मोडकवाडी जिंती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, सातर म्हाळुंगेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, करपेवाडी काळगाव अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, मस्करवाडी काळगाव अंतर्गत रस्ता सुधारणा 14 लाख, मोरेवाडी कुठरे कदमवाडी
येथे अंतर्गत रस्ता व संरक्षक भिंत 15 लाख, सुपुगडेवाडी जाधववस्ती व शिंदेवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा
15 लाख, तळमावले येथे अंतर्गत
रस्ता सुधारणा 15 लाख, मौजे साकुर्डी येथे
सभामंडप 15 लाख, शिबेवाडी खालची गुढे
अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, आरेवाडी
उत्तर तांबवे ता.कराड येथे संरक्षक भिंत 15 लाख, पाडळी केसे पाडळेश्वर मंदिरालगत संरक्षक भिंत 15 लाख या 42
कामांना 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून पाटण विधानसभा मतदारसंघातील रस्ते,संरक्षक
भिंत तसेच सभामंडप इत्यादी विकास कामांसाठी
निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी ग्रामविकास मंत्री ना.गिरीश
महाजन यांचे आभार मानले. तर लवकरच या विकास कामांची निविदा प्रक्रिया करण्याची तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत
देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment