Thursday 1 August 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून सातारा जिल्ह्यासह पाटण तालुक्यातील प्राथमिक शाळा होणार मॉडेल स्कूल मॉडेल स्कूल अंतर्गत विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येणार.


 

दौलतनगर दि.02:- सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून सातारा जिल्हयामध्ये मॉडेल स्कूल ही संकल्पना राबविण्यात येत असून मॉडेल स्कूलसाठी पाटण तालुक्यातील 43 जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली असून सन 2024-25 मध्ये पहिल्या टप्प्यात पाटण तालुक्यातील 29 प्राथमिक शाळांची निवड केली आहे.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 25 जिल्हा परिषद शाळांना नवीन 68 शाळा खोल्यांचे बांधकाम करण्यासाठी सन 2024-25चे जिल्हा वार्षिक आराखडयातून 10 कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून मॉडेल स्कूल या योजने अंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

        प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून सध्या सातारा जिल्हयामध्ये मॉडेल स्कूल ही संकल्पना जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी  राबविली जात असून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी तसेच जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्याला प्राथमिकता देण्यात आली आहे.तसेच मॉडेल स्कूल या योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्ग खोली,मुला मुंलींसाठी शालेय स्वच्छता गृह,पाण्याची व्यवस्था त्यामध्ये शुध्द पिण्याचे पाणी व हँड वॉश स्टेशनची सुविधा,संरक्षक भिंत,पर्यावरण पुरक जलपुनर्भरण,सौर प्रकल्प,कचरा व्यवस्थापन,वृक्ष लागवड व परसबाग,पेव्हर ब्लॉक,संगणक प्रयोग शाळा,स्वागत कमान,विज्ञान प्रयोग शाळा,खेळाचे मैदान व मुलांच्या वयोगटानुसार खेळाचे साहित्य व बाला एलिमेंट्स आणि बोलका शालेय परिसर आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. सर्व सोयीसुविद्यांनीयुक्त असणा-या मॅाडेल स्कूलमुळे मुलांबरोबरच त्यांच्या पालकांनाही आपला पाल्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेत शिकत असल्याचे समाधान मिळणार आहे. भविष्यात या शाळा गावांचा मानबिंदू ठरणार आहेत.  पाटण विधानसभा मतदारसंघातील पहिल्या टप्प्यात 25 जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन 68 शाळा खोल्यांचे बांधकाम करण्यासाठी  सन 2024-25चे जिल्हा वार्षिक आराखडयातून 10 कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.यामध्ये ढेबेवाडी 2 शाळा खोल्या 30.50 लाख, चोपडी येथे 3 शाळा खोल्या 45.75 लाख, माजगाव 3 शाळा खोल्या 45.75 लाख, मानेवाडी मानेगाव 3 शाळा खोल्या 45.75 लाख, साखरी 3 शाळा खोल्या 45.75 लाख, नाटोशी 4 शाळा खोल्या 61 लाख, कोकीसरे 2 शाळा खोल्या 30.50 लाख, हेळवाक 4 शाळा खोल्या 61 लाख, गुढे 2 शाळा खोल्या 30.50 लाख, मेष्टेवाडी 4 शाळा खोल्या 61 लाख, धामणी 1 शाळा खोल्या 15.25 लाख, कसणी 2 शाळा खोल्या 30.50 लाख, सळवे  4 शाळा खोल्या 61 लाख, मोरगिरी 1 शाळा खोल्या 15.25 लाख, मालदन 2 शाळा खोल्या 30.50 लाख, ठोमसे 2 शाळा खोल्या 30.50 लाख, चव्हाणवाडी ना येथे 1 शाळा 15.25 लाख, रासाटी 4 शाळा खोल्या 61 लाख, आंबवणे 4 शाळा खोल्या 61 लाख, मुरुड 2 शाळा खोल्या 30.50 लाख, कळंबे 4 शाळा खोल्या 61 लाख, भारसाखळे 2 शाळा खोल्या 30.50 लाख, जिंती 4 शाळा खोल्या 61 लाख, येराड 2 शाळा खोल्या 30.50 लाख व वस्ती साकुर्डी 3 शाळा खोल्या 45.75 लाख या 68 शाळा खोल्यांच्या कामांचा समावेश आहे.

चौकट :- पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे दुरुस्तीसाठी 01 कोटी निधी मंजूर.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील 7 जिल्हा परिषद शाळांमधील शाळा खोल्यांचे दुरुस्तीसाठी 01 कोटी 07 लाख 63 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये माजगाव 5 शाळा खोल्या दुरुस्ती 17.18 लाख, आवर्डे 6 शाळा खोल्या  दुरुस्ती 26.22 लाख, मानेवाडी 3 शाळा खोल्या  दुरुस्ती 10.86 लाख, साखरी 3 शाळा खोल्या  दुरुस्ती 8.24 लाख, मरळी 4 शाळा खोल्या  दुरुस्ती 11.65 लाख, हेळवाक 2 शाळा खोल्या  दुरुस्ती 8.13 लाख, केरळ 6 शाळा खोल्या  दुरुस्ती 25.35 लाख या जिल्हा परिषद शाळांमधील 29 शाळा खोल्यांच्या दुरुस्तींच्या कामांचा समावेश आहे.

  

No comments:

Post a Comment