दौलतनगर दि.24:- पाटण विधानसभा मतदार संघातील डोंगर
पठारावरील धनगरवाडा मरड येथील ग्रामस्थांच्या शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न
कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी धनगरवाडा
मरड येथे लघु पाटबंधारे तलावाचे काम मंजूर होण्यासाठी जलसंधारण मंत्री ना.संजय
राठोड यांचेकडे शिफारस केली होती. त्यानुसार धरनगरवाडा मरड येथे लघु पाटबंधारे
तलावाच्या कामाला 12 कोटी 35 लाख 81 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन
निर्णय महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने नुकताच पारित केला असल्याची माहिती
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात
आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा
मतदारसंघातील धनगरवाडा मरड हे गाव डोंगर पठारावर वसलेले गाव असून विशेषत: उन्हाळयामध्ये
या गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासह
शेती व जनावरांच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होत होता.त्यामुळे मरड
परिसरातील सर्व गावे व वाडया-वस्त्यांमधील ग्रामस्थांनी या परिसरातील पाण्याचा
प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागण्यासाठी
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांची भेट घेऊन धनगरवाडा मरड येथे लघु
पाटबंधारे तलावाचे काम मंजूर होण्यासाठी मागणी केली होती.त्यानुसार पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांनी लघुसिंचन व जलसंधारण विभागाचे अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष
कामाच्या ठिकाणची पाहणी करुन आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारा प्रस्ताव तातडीने
सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या.त्यानुसार अप्पर आयुक्त जलसंधारण तथा मुख्य
अभियंता,मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्र,पुणे यांचेकडून 101 ते 250 हेक्टर सिंचन
क्षमतेच्या सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील धनगरवाडा मरड लघु पाटबंधारे तलाव
योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबचा प्रस्ताव महाराष्ट्र जलसंधारण
महामंडळाकडे सादर केल्या नंतर 101 ते 250 हेक्टर सिंचन क्षमतेच्या पाटण
तालुक्यातील धनगरवाडा मरड लघु पाटबंधारे तलावाला मृद व जलसंधारण विभागाच्या सन
2022-23 च्या दरसूचीवर आधारित कामाप्रित्यर्थ
12 कोटी 35 लाख 81 हजार रुपयांचा निधीला महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे
व्यवस्थापकीय संचालक यांचेकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आला असल्याचा शासन
निर्णय महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने नुकताच पारित केला आहे. धनगरवाडा मरड येथील
नियोजित लघु पाटबंधारे तलावाची 524.18 स.घ.मी.एवढी पाणी साठवण क्षमता असून या
तलावातील जलसाठयातून आसपासचे 107 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजित
असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून धनगरवाडा मरड या
परिसरातील जनावरांच्या पाण्यासह शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी
मार्गी लागणार असून शेतकऱ्यांना शेतीमध्ये पीकांचे उत्पन्न वाढीसाठी याचा चांगला
फायदा होऊन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार असल्याने धनगरवाडा,मरड
परिसरातील ग्रामस्थांनी पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचे आभार मानले आहेत.तर मंजूर झालेल्या धनगरवाडा मरड
लघु पाटबंधारे तलावाच्या निविदा प्रक्रियेचे काम तातडीने करण्यात येऊन हे काम पाऊस
कमी आल्यानंतर लगेच हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी
संबंधित अधिकारी यांना केल्या असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे
वतीने प्रसिध्दीपत्रकांत शेवटी देण्यात आली आहे.
चौकट: धनगरवाडा मरड येथील लपा तलावामुळे
पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार.
पालकमंत्री ना.शंभूराज
देसाई यांचे प्रयत्नामुळे धनगरवाडा मरड येथील लघु पाटबंधारे तलावाचे कामाला भरघोस निधी
मंजूर झाला असल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे.डोंगर पठारावरील
या भागामध्ये विशेषत: उन्हाळयामध्ये पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण होते. अनेक गावांमध्ये
पाण्याची टंचाई निर्माण होऊन पिण्याच्या पाण्यासह
जनावरांच्या पाण्याचा प्रश्न प्रत्येक वर्षी निर्माण होतो.धनगरवाडा मरड येथील नियोजन
तलावाच्या कामामुळे या परिसरातील शेती पाण्याखाली
येणार तर आहेत पण पिण्यासह येथील जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न मिटणार असल्याने पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांनी लपा तलावाच्या कामाला भरघोस निधी मंजूर केल्याने येथील पाणी
टंचाईचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे.
No comments:
Post a Comment