दौलतनगर
दि. 14 :- बनपेठवाडी येराडसह
आस-पासच्या गावातील आरोग्याची समस्या लक्षात घेता बनपेठवाडी येराड ग्रामपंचायतीच्या
वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर होण्याकरीता पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे मागणी करत गेले अनेक वर्ष सातत्याने पाठपुरावा सुरु होता. मुख्यमंत्री एकनाथजी
शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी बनपेठवाडी
येराड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीकरीता
विशेष बाब म्हणून केलेल्या प्रयत्नामुळे श्री
क्षेत्र येडोबा देवाची नगरी बनपेठवाडी येराड येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्राला
मंजूरी देण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकताच
पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत
दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले
आहे की, बनपेठवाडी येराड परिसरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने येथील रुग्णांना
औषधोपचाराठी पाटण आणि हेळवाक याठिकाणी जावे
लागत असल्याने ग्रामस्थांची आरोग्यविषयक मोठी गैरसोय होत असल्याने या डोंगरी व दुर्गम
विभागातील बनपेठवाडी येराड परिसरातील सर्व गावांतील ग्रामस्थांची प्राधान्याची मागणी
विचारात घेऊन बनपेठवाडी येराड या ग्रामपंचायतीने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर होण्यासाठी
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केला
होता. यासंदर्भात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी उच्चस्तरीय अधिकारी यांच्या बैठका
घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना या बैठकींमध्ये संबंधित अधिकारी यांना
केल्या होत्या. त्यानुसार हे बनपेठवाडी येराड या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर
करण्यासाठी परिपुर्ण प्रस्ताव सादर झाला होता. बनपेठवाडी येराडसह जोतिबाचीवाडी,तामकडे, काळोली, दातेगड, टोळेवाडी,
मुळगांव, डोंगरुबाचीवाडी, पिंपळगांव,पाटण, नेरळे, मारुल त.पाटण,वाजेगांव, मिरासवाडी,
शिरळ, विठ्ठलवाडी,कराटे, मणेरी, चाफेर, काढोली, तळीये, रिसवड, ढोकावळे, झाकडे लेंढोरी
या आस-पासच्या गावासह श्री क्षेत्र येडोबा देवाच्या दर्शनाला
येणा-या भाविक भक्तांची मोठी वर्दळ
असते.या भाविकांनाचीही आरोग्य सुविधांची समस्या
सुटणार होती. तसेच बनपेठवाडी येराड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सादर प्रस्ताव
मंजूरीबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व आरोग्य मंत्री ना. तानाजी
सावंत यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी विशेष बाब म्हणून मंजूरी मिळणेबाबत
केलेल्या विनंतीमुळे श्री क्षेत्र येडोबा देवाची नगरी बनपेठवाडी येराड येथे नव्याने
प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजूरी देण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक
आरोग्य विभागाने नुकताच पारित केला. पाटण मतदारसंघ हा डोंगरी व दुर्गम असुन मतदारसंघातील जनतेला चांगल्या
आरोग्य सुविधा देणेकरीता ना.शंभूराज देसाईंची सातत्याची तळमळ असते. येराडसह परिसरातील गावांना पाटण व
हेळवाक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत असल्याने ही आरोग्य सुविधा बनपेठवाडी
येराड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र करुन कोयना विभागातील जनतेला मिळवून दयावी याकरीता
ना.शंभूराज देसाईंची सातत्याची तळमळ होती. त्यांच्या प्रयत्नातून बनपेठवाडी येराड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर
करत डोंगरी व दुर्गम कोयना भागातील जनतेसह श्री क्षेत्र
येडोबा देवाला येणा-या भाविकांनाही चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यास मोठी मदत होणार
आहे. ना.शंभूराज देसाईंनी बनपेठवाडी
येराड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूरीकरीता विशेष बाब म्हणून केलेल्या प्रयत्नामुळे
मंजूर झाल्याने या विभागातील जनतेने धन्यवाद व्यक्त केले आहेत.
No comments:
Post a Comment